Details
शरद पवारांच्या माघारीचे गूढ!
01-Jul-2019
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अखेर शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. आपला नातू पार्थ पवार याच्यासाठी लोकसभेचा मार्ग मोकळा केला आहे. आपला पुतण्या अजित पवार याच्या मर्जीनुसार पार्थला लोकसभेत जाण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. आपली कन्या सुप्रिया यांना लोकसभेत त्यांच्या भाच्याची सोबत मिळावी, अशी तजवीज केली आहे. शरदराव स्वत: राज्यसभेत असतीलच. तेव्हा भविष्यात संसदेत एक नव्हे, दोन नव्हे तर तीन `पवार’ दिसतील, हे उघड आहे.
वास्तविक येथून पुढे आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे शरदरावांनी यापूर्वीच जाहीर केले होते. पण अचानक घूमजाव करून त्यांनी माढातून निवडणूक लढण्याची घोषणा का केली हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! अर्थात ही घोषणा त्यांच्या गूढ स्वभावानुसारच होती. आपले वडील हे अनप्रेडिक्टेबल आहेत, असे विधान शरदरावांच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कन्या सुप्रिया यांनी केले होते. त्यावेळी ते खूप गाजले होते. पवारांचे राजकारण कधीही समजू न शकणाऱ्या अनेकांना ते पटले होते.
राजकारणात तावून-सुलाखून निघालेले आणि चांगलेच मुरलेले शरद पवार कधी काय करतील, हे सांगणे भल्या-भल्यांना जमत नाही. त्यांच्या मनात काय आहे हे ओळखणे त्यांच्या निकटवर्तीयांनादेखील शक्य होत नाही. मग इतरांची तर गोष्टच सोडा. माढामधून माघार घेताना त्यांनी जे कारण दिले, ते पटण्यासारखे आहे. एकाचवेळी पवार घराण्यातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले तर त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल. ते नाराज होतील असे पवारांना वाटत होते. म्हणूनच बारामतीतून सुप्रिया आणि मावळमधून पार्थ निवडणूक लढत असताना माढातून स्वत:ची संभाव्य उमेदवारी त्यांनी अर्ज भरण्याआधीच मागे घेतली आहे.
अर्थात त्यामुळे माढासंदर्भातील त्यांची डोकेदुखी संपलेली नाही. माढामधून विजयसिंह मोहिते-पाटील उभे राहिल्यास त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा असेल. पण विजयसिंहांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील, हेदेखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. माढाची जागा त्यांना मिळावी, अशी मोहिते-पाटीलांची इच्छा आहे. पण, रणजितसिंहांना पक्षातूनच मोठा विरोध आहे. तेव्हा त्यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीत मोठी बंडाळी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर दस्तूरखुद्द पवार अथवा विजयसिंह हेच माढासाठी, राष्ट्रवादीच्या दृष्टीने, योग्य उमेदवार ठरले असते. त्यातही खुद्द पवारांची उमेदवारी ही हमखास विजय मिळवून देणारी ठरली असती. मग असे असताना घराणेशाहीचे कारण पुढे करून शरद पवार मागे का हटले?
आगामी लोकसभा निवडणुकीत एक-एक जागा महत्त्वाची असताना माढाच्या उमेदवारीवर त्यांनी पाणी का सोडले? पवारांनी लढावे असा आग्रह त्यांचे कार्यकर्ते आणि कुटूंबीय करत असताना मराठा स्ट्राँगमॅन रणांगणातून बाजूला का झाले? या साऱ्या प्रश्नांमुळे शरदरावांच्या माघार घेण्यामागील गूढ वाढले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत विजयाची हमी नसल्यामुळेच पवारांनी माघार घेतली, असे म्हणण्यास त्यांच्या विरोधकांना वाव मिळाला आहे. शरद पवार हे आतापर्यंत तीनवेळा मुख्यमंत्री झाले. त्यांनी 14 निवडणुका लढविल्या आणि या सर्व निवडणुकांत प्रचंड मोठा विजय मिळविला.
इंदिराजींच्या निधनानंतर देशात काँग्रेसची लाट आली असतानाही शरदराव बारामतीतून साडेचार लाखांच्या विक्रमी मताधिक्क्याने लोकसभेवर निवडून गेले. माढा हा मतदारसंघ त्यांच्यासाठी कठीण नाही. किंबहुना, बारामतीनंतर, तो मतदारसंघ त्यांच्यासाठीच सर्वाधिक अनुकूल आहे. शिवाय पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून शरदराव बाहेर पडलेले नाहीत. भविष्यातील राजकीय समीकरणे काय असतील याचे उत्तर काळाच्या उदरात दडले आहे. अर्थात, ही समीकरणे गृहीत धरूनच शरद पवार यांनी निवडणुकीपासून दूर राहणे ठरविले असावे. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंह लोकसभेची निवडणूक न लढतादेखील पंतप्रधान झाले होते. हा इतिहास नजरेसमोर ठेवूनदेखील शरद पवार यांनी स्वत: मतदारसंघात अडकून राहण्याऐवजी राज्यात आणि देशात फिरणे पसंत केले असावे. शरद पवार यांच्या माघारीचे हेच कारण असावे. अर्थात, तसे आम्हाला वाटते. पवार साहेबांना काय वाटते हे ब्रह्मदेवदेखील सांगू शकणार नाही!”
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर