HomeArchiveवृक्षारोपण कार्यक्रमांचे लेखापरीक्षण...

वृक्षारोपण कार्यक्रमांचे लेखापरीक्षण व्हावे – डॉ. श्रीकांत शिंदे

Details
वृक्षारोपण कार्यक्रमांचे लेखापरीक्षण व्हावे – डॉ. श्रीकांत शिंदे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जंगलात आगी लागण्याचे प्रमाण गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले असून यासंदर्भात काही कडक कायदे तसेच शिक्षा आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे केंद्र सरकारकडून नियमित लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली.

केंद्र सरकारचे राष्ट्रीय वन्य धोरण देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३३ टक्के हिस्सा वनांखाली आणि हरितकरणाखाली आणण्यासाठी आखले गेले आहे. महाराष्ट्र सरकारच्या वन मंत्रालयांची धोरणे यासाठी सुसंगत आहेत. जागतिक तापमानवाढीला तसेच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षारोपण हे याबाबत एक अत्यंत परिणामकारक पाऊल आहे. परंतू या वनीकरणाची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण तब्बल ४९ टक्क्यांनी वाढले आहे. २०१६ साली अशाप्रकारच्या २४ हजार ८१७ घटना घडल्या होत्या तर २०१८ साली हे प्रमाण ३७ हजार ५९ वर गेले आहे. आगीच्या घटना केवळ राष्ट्रीय उद्यानांमध्ये घडलेल्या नाहीत तर मुंबईसारख्या ठिकाणी शहरी वनांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये अशाप्रकारच्या तब्ब्ल १००० घटना घडल्या असून यात तब्बल साडेसहा हजार हेक्टर वनसंपत्तीचा तसेच ११०० कोटी रूपयांचा चुराडा झाला आहे. ९० टक्के आगीच्या घटना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मानवी हस्तक्षेपामुळे घडतात असे शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

आपणही अनेक वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतले आणि त्यात हजारो नागरिकांनी सहभागही घेतला. परंतू अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अशा ठिकाणीही आगी लागण्याचे प्रकार घडले असून त्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. यासंदर्भात वनविभाग अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले जाऊन निष्काळजी अधिकाऱ्यांना शिक्षा व्हावी तसेच वृक्षारोपण कार्यक्रमांचे केंद्र सरकारकडून नियमित लेखापरीक्षण व्हावे, ज्यायोगे वृक्षारोपणातल्या वृक्षांची संख्या लक्षात घेतली जाऊन अशा स्वरूपांच्या कार्यक्रमांचे फलित लक्षात येईल, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content