Details
विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टचे `जॉय ऑफ गिविंग’!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टचा जॉय ऑफ गिविंग अर्थातच माणुसकीचे देणे ह्या सामाजिक उपक्रमाचा प्रथम वर्धापनदिन साजरा करण्यात आला. राजपुरीया वानप्रस्थाश्रम, उत्तन भाईंदर येथील वृध्दाश्रमात त्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी वृध्दाश्रमातील २०० आजी-आजोबांसाठी त्यांना उपयुक्त असणाऱ्या विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला गुरूवर्य शशिकांत खामकर, हर्षा भट, रेखा करकेरा, गजेंद्र जुईकर, आश्रमातील सभासद सामंत तसेच विनर्स परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी बोलताना शशिकांत खामकर यांनी सांगितले की, आजी-आजोबा यांनी समाज घडविण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केलेले असतात. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. आजी-आजोबांचा जीवनाकडे पाहण्याचा, जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणी त्यांची ऊर्जा पाहुन आपणही प्रोत्साहित झाले पाहिजे व जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.”
“केएचएल न्यूज ब्युरो