Details
लोकशाहीचा उत्सव की तमाशा?
01-Jul-2019
”
विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
कोल्हापुरात अंबादेवीला साकडं घालून शिवसेना-भाजप महायुतीने रविवारी लोकसभेच्या निवडणुकीचा नारळ वाढवला. यानिमित्ताने एकप्रकारे शक्तीप्रदर्शनही झाले. कोल्हापुरात प्रचाराचा मुहूर्त करण्याचा पायंडा बाळासाहेब ठाकरेंचा. पूर्वी बिंदू चौकात शिवसेनेच्या जाहीर सभा होत होत्या. मात्र यावेळी युतीचा मेळावा असल्याने प्रचंड असे तपोवन मैदान निवडले गेले. प्रचाराच्या सभेला अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाली होती. ही गर्दी म्हणजे विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला धडकी भरवणारी होती, हे मान्य करायलाच हवे. त्याचवेळी साताऱ्यात कराड येथे महाआघाडीचा मेळावा होता. तेथे शरद पवार हेच सभेचे आकर्षण होते. मात्र चर्चा झाली ती शिवसेना-भाजपच्या जाहीर सभेचीच.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेच युतीचे स्टार प्रचारक आहेत. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने रिपाई नेते रामदास आठवले यांना जाहीर किंवा प्रचाराच्या सभांत शिघ्र कविता करण्यास भरपूर संधी मिळणार आहे. आठवलेंच्या चारोळी हा प्रकार आता चेष्टेचा विषय बनला आहे. पण त्यांना सुनावणार कोण?
गेली साडेचार वर्षे सत्तेत राहून शिवसेनेने विरोधी पक्षाचीच भूमीका बजावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला करण्याची संधी कधीच सोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या टेकूने सत्तेवर बसलेल्या भाजपने आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला इतके अवमानित केले होते की वाघाची शेळी झाली की काय असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला तर नवल नव्हे. बाळासाहेब ठाकरे असताना थरथर कापणारे भाजपचे नेते शिवसेनेवर कायम कुरघोडी करत होते. शिवसेनेचा पाणउतारा, अवमान कायमच झाला. सत्तेतील शिवसेनेला दुजाभाव केला जात होता.
दुसरीकडे शिवसेना सोबत राहील. युती होणारच असे भाजपचे नेते आत्मविश्वासाने सांगत होते. तर आमचा निर्णय ठाम आहे. आम्ही प्रस्ताव द्यायला बसलेलो नाही. स्वबळाचा निर्णय कायम आहे असे शिवसेनेचे नेते, प्रवक्ते आणि स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमकपणे सांगत सुटले होते. आज मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठीच भाजपला उपरती झाली आणि शिवसेनेची अतिशय गरज भासली. नको नको असताना शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या. खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे हे भाजपने सिध्द करून दाखवले. भाजपने शिवसेनेला रोखण्याची एकही संधी गमावली नाही. इकडे हे सारं सोसून शिवसेनेने शेवटच्या क्षणी भाजपशी घरोबा केला. हिंदुत्वासाठी युती असं गोंडस नामकरण ठाकरेंनी करून टाकलं. नेत्यांची राजकीय पक्षांची युती झाली. मात्र कार्यकत्यांचे मनोमीलन दोन्हीही पक्षात झालेच नाही. नाराजीचा नारा आणि बंडखोरीचा वारा या दोन्ही राजकीय पक्षांना भोगावा लागत आहे.
शिवसेनेला तर भाजपकडून उमेदवारांचीही उसनवारी करावी लागली. हे तर न कळण्यापलीकडचे राजकारण झाले. सामान्य कार्यकर्त्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागते. त्याचा विचार कोण करतोय? स्वाभिमान, अस्मिता यांचे काय झाले, त्यांची उत्तरे कोणी द्यायची? कोणी सवाल करीत नाही, म्हणून सोयीचे स्वार्थाचे राजकारण करायचे काय? तेही किती करायचे? असो.
कोल्हापूरची युतीची महासभा विक्रमी झाली. मात्र गाजलेल्या या जाहीर मेळाव्यास जिल्ह्याबाहेरून माणसं आणली होते असे बोलले जातेय. सरकारी प्रशासकीय यंत्रणा यांचाही वापर मेळाव्यात झाला असे सांगण्यात येते. सभेला गर्दी होती, पण दर्दी श्रोते नव्हते असा आरोपही होतोय. उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीची कराडची जाहीर सभा सहज आणि जिव्हाळयाने भारलेली होती. युतीने शक्तीप्रदर्शन केले. आघाडीने वास्तव स्वीकारून प्रदर्शन केले नाही. त्यामुळे सहानुभूती अर्थातच महाआघाडीकडे जाते.
भाजपच्या नरेंद्र पाटील आणि राजेंद्र गावित या नेत्यांना ठाकरेंनी शिवसेनेत घेतले. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मान्यताही घेतली. या दोघांसाठी मतदारसंघही मुख्यमंत्र्यानीच सुचविले. स्वत:कडील मतदारसंघ आणि उमेदवारही भाजपने सोडले. याचा अर्थ एकच आहे. तो म्हणजे दोन्ही मतदारसंघ सेफ नाहीत आणि दोन्ही उमेदवार सक्षम नाहीत, हेच भाजपने मान्य केले आणि त्यांचे पुनर्वसन शिवसेनेत केले. आतबट्ट्याचा हा व्यवहार शिवसेने का आणि कशासाठी केला, याची उत्तरे जनता जाणून आहे.
थोडक्यात काय? राजकारण हे स्वार्थी आणि सोयीचे असते. बोलायचे एक आणि कृती वेगळी. राजकारणात काही किमान प्रामाणिकता किमान साधनशुचिता हवी की नको? पक्षाकडे तगडे नेते नाहीत, जनतेतील चेहरा नाही म्हणून नेत्यांची, उमेदवारांची पळवापळवी करावी लागते. वर्षानुवषे पक्षात राबणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी झेंडेच नाचवायचे काय? त्यांच्यावर अन्याय झाला की ते बंडखोरी करणारच. हे वातावरण सर्वच राजकीय आता पाहयला मिळते. यालाच लोकशाही म्हणायचे काय? आता प्रचारास सुरूवात होईल. एकमेकांचे वाभाडे काढले जातील. आपण याला लोकशाहीचा उत्सव म्हणायचे. लोकशाहीत प्रबोधन अपेक्षित असते. सध्या दोन्ही बाजूनी जे काही सुरू आहे त्याला उत्सव म्हणायचे की तमाशा?”
“विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार