HomeArchiveलोकप्रतिनिधींना लाज नाही,...

लोकप्रतिनिधींना लाज नाही, गावांत पाण्याचा थेंब नाही!

Details
“लोकप्रतिनिधींना लाज नाही, गावांत पाण्याचा थेंब नाही!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
मुरबाडच्या एसटी डेपोला मागे टाकून पहिलंच वळण घेतलं की आपण म्हसा यात्रेसाठी फेमस रस्त्याला लागतो. तिकडे एका प्रोजेक्टसाठी अख्ख्या गावाचे पुनर्वसन झालंय. गाव उभं राहिलं पण पाणी नाही. म्हसाच्या रस्त्याला अनेक छोटी गावं आहेत. पण पाण्याची सोय जेमतेम. मुरबाड रोडनेच सरळ पुढे सरकले की धसई येतं. हे धसई म्हणजे पहिले कॅशलेस व्यवहार करणारं गाव म्हणून प्रसिद्धीस आलेलं. प्रत्यक्षात तिथला हा कॅशलेसचा प्रयोग फक्त जाहिरातबाजीपुरता झाला आणि फसला.. दोनवेळा या कॅशलेसचा गाजावाजा झाला पण ग्रामीण भाग, वीजेचा वारंवार लपंडाव, लोड शेडींग (सर्व गावांत वीज दिलीय म्हणायचं पण ती आहे का, असते का, तिथले दिवे उजळतात का याबद्दल चकार शब्द काढायचा नाही), पीओएस मशीन नाहीत, बँकेतही नीट व्यवहार होत नाहीत, दुकानदार कार्ड घेईनात, त्यांच्याकडेही मशीन नाही,

छायाचित्रे- अशोक गुप्ता

बँक व्यवहारांची किचकट आणि प्रसंगी जाचक ठरणारी प्रक्रिया यामुळे ग्रामस्थांची नकारात्मक मानसिकता अशा बऱ्याच कारणांमुळे धसईचं कॅशलेस बोंबलंल ते बोंबललंच. तेव्हा धसईमुळे मुरबाडचे नाव बातम्यांत आलं होतं आता पाण्यामुळे नव्हे पाणीच नसल्यामुळे येतंय.. मुंबई, ठाण्याला पाणी पुरवणारा तालुका म्हणून फेमस असलेल्या शेजारच्याच शहापूरचंही तेच. धरण उशाला, कोरड घशाला.. धरणांचे घसे कोरडे, मुरबाड तालुका तहानलेला, शहापूर तालुक्याचा घसा सुकला.. अशा एक ना अनेक बातम्या दरवर्षी नित्यनेमाने येतात. मुंबईतून बातम्या दिल्या जातात, छायाचित्रे प्रसिद्ध केली जातात, तिथल्या ग्रामीण भागातील वार्ताहर मंडळी पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामीण मायभगिनींचे दु:ख बातम्यांमधून, छायाचित्रांमधून मांडतात. इकडे मुंबईत, ठाण्यात डेस्कवर बातम्यांना, लेखांना, छायाचित्रांचे पूर्ण पान करायला एकदम झकास विषय मिळतो, पानभर छायाचित्रे प्रसिद्ध केली जातात, बातम्या लागतात, वार्ताहर, छायाचित्रकार यांची वाहवा होते. झालं. संपलं. लाज वाटत नाही आपल्याला. लाज वाटत नाही लोकप्रतिनिधींना, लाज वाटत नाही सरकारला, लाज वाटत नाही तळागाळातल्या शेवटच्या माणसाचं हित आम्ही बघतो, त्याचं दु:ख आम्हाला पिळवटून टाकतो, त्याच्यासाठीच आम्हाला सत्ता हवी असते, त्याचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही सत्ताकारण करतो म्हणत मिरवणाऱ्या कुठल्याच राजकीय पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना.

ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भागच कशाला, आपल्या राज्यात निम्म्याहून अधिक ग्रामीण भाग याच यातना सहन करतोय पाण्यासाठी. दरवर्षी याच्या बातम्या होतात, अशीच छायाचित्रे प्रसिद्ध होतात, तरीही ही समस्या दूर होत नाही. याची कुणालाच लाज वाटत नाही, खंत वाटत नाही. कुठल्याच टेबलवरच्या फायली हलत नाहीत, नियोजन होत नाही, अर्धवट पडलेल्या, सोडून दिलेल्या नळपाणी योजना, जलसंचय योजना पूर्ण होत नाहीत, मार्गी लावल्या जात नाहीत. तलाव खोदले जात नाहीत, विहिरी उपसल्या जात नाहीत. काही काही होत नाही. निवडणुका आल्या की मतं मागायला सर्वजण याच ग्रामीण भागात धाव घेतात. इथली जनताही अशी विसरभोळी की पाण्यासाठी एप्रिल-मेमध्ये केलेली वणवण, काट्याकुट्यांतून लहान पोरीबाळींनी शाळा बुडवून घागरभर पाण्यासाठी रानोमाळ केलेली पायपीट सारं काही पाऊस पडायला लागला की विसरून जाते. समोर येणाऱ्या पांढऱ्या टोप्यांखाली निर्लज्जपणे हसणाऱ्या चेहऱ्यांना नमस्कार चमत्कार करते. कुणीच लोकप्रतिनिधींना खडसावून विचारत नाही की, आमच्या गावात पाणी कधी येणार, रखडलेली योजना कधी पूर्ण होणार? गेल्यावेळी तोंड भरून जी आश्वासनं दिलीत त्याला पाच वर्षे उलटून गेली, पाण्याचा थेंब नाही पंचक्रोशीत त्याचे काय? भातसा नदीचे पाणी प्रदुषणाने काळं पडलंय, इतर ठिकाणी खड्ड्यांतून पाणी प्यायचं तर नाना आजार, साथी पिच्छा पुरवतात, डॉक्टर लुटतात. काय करायचं तरी काय या गरीब लोकांनी?
 
पण हे प्रश्न कुणालाच पडत नाहीत किंवा विचारण्याची हिंमत होत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कितीतरी आंदोलने होतात, पण पाण्यासाठी एखादे दुसरेच पेटून उठणारे आंदोलन होते. तेही तात्पुरते. मागे शहापूरला असे आंदोलन झाले होते. पण पुढे काही नाही. सारे थंड. यंदाच्या निवडणुकीत काही गावांमध्ये पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भाषा झाली. पण पुढे सर्व गप्प. गेली काही वर्षे महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पाण्यासाठी ग्रामीण महाराष्ट्र टाहो फोडतोय. जलसंधारण योजना, तलाव, चर खोदाई यासाठी स्वयंसेवी संस्थांना वॉटर कपसारखे उपक्रम हाती घ्यावेसे वाटतात. पण याच उपक्रमाची वाखाणणी करणारे, बक्षिसे देणारे सरकारमधील नेते, धुरीण मात्र राज्यातील पाणीपुरवठा योजनांबाबत, विविध जलसंचय योजनांबाबत ढिम्म आहे. शेकडो योजना अर्धवट बंद, काही केवळ कागदावर. एकाही योजनेचे घोडे धड पुढे सरकलेले नाही. संबंधित यंत्रणाही हलत नाहीत. जनतेची पाण्यासाठी वर्षानुवर्षे सुरू असलेली तडफड राजकारण्यांना घायाळ, अस्वस्थ करत नाही. कुठल्या काळात असे फरफटत जगण्याची शिक्षा या लोकांना ठोठावली गेली आहे तेच कळत नाही.

कुठलाही तालुका घ्या. मुरबाड तालुक्यातील पाटगाव पठार तागवाडीत एकमेव विहिरीने खोल तळ गाठलाय. तिथल्या त्या तशा विहिरीत दगडींवर पाय ठेवून आणि जीव तळहातावर घेऊन खोल उतरायचं तर कुठे मापटाभर पाणी मिळण्याची आशा. मोकवाडी, भुईपाडा, दुर्गपूर सगळीकडे हीच दशा. शहापूर तर धरणांचा तालुका.. तानसा, भातसा वैतरणा मोठे जलाशय. इथली सुमारे दीडेकशे गावे-पाडे किती वर्षे झाली तहानलेलीच असतात उन्हाळ्यात. कुठलीतरी रानावनातली पडकी विहीर गाठायची. रात्री नंबर लावायचा, तर सकाळी पाणी मिळालं तर मिळालं अशी अवस्था. तीन चार किलोमीटर रान पालथे घालून चढण चढून पाणी आणायचे. म्हाताऱ्याकोताऱ्यांचे आणखी हाल. सखुबाई ठोंबरे नावाच्या सत्तरीतल्या आजीबाई दररोज थरथरणारी कुडी सावरत काठीच्या आधाराने ही चढण चढत उतरत असतात केवळ हंडाभर पाण्यासाठी. राईची वाडी, दापूर, सुसरवाडी, पिंगरवाडी, कुंभेपाडा सगळीकडे भयाण स्थिती आहे. शेजारी पालघर जिल्ह्यातही हीच दशा आहे. सोमोखाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी सर्वच तालुक्यांत लोक पाण्यासाठी तरसतायत.

चीड याची वाटते की जे लोकप्रतिनिधी, जो पक्ष इथल्या लोकांच्या तोंडात पाण्याचा थेंब घालू शकत नाही अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधींना निवडून दिले जाते. भरमसाट आश्वासने देऊन निवडून आल्यावर कोण कुणाकडे बघत नाही. मागील पानावरून सारे सुरू राहाते. एकेकाळी मुरबाड, शहापूरचा भाग वनसमृद्ध होता. जंगल होतं, वन्यप्राणी होते. आता जंगलतोड झालीय, हिरवी सावली नावाला उरलीय. विकासाच्या नावाखाली भकास, उजाड परिसराला नैराश्याची बुरशी लागलीय. जंगल नाही, झाडांची बेसुमार तोड झालेली, त्यामुळे निसर्ग देतो ते पाणी तरी कसे जमीनीत मुरणार आणि विहिरी, नद्यानाले भरून वाहणार?
 
या सगळ्याची जाणीवच नसल्यागत या भागातील रहिवाशांचे जीवनचक्र कमालीचे काबाडकष्ट उपसत सुरू आहे. इथल्या पाणलोट क्षेत्रात तरी निदान जलसंधारणाची कामे व्हावीत, चर खोदले जावेत, पाणी टिकून राहील अशा उपायांची अमलबजावणी व्हावी यासाठीचे कार्यक्रमही हाती घेण्याची गावांचीही इच्छा नाही, सरकारचीही नाही. पावसाळा सुरू झाला की बंधाऱ्यांची कामे केली म्हणून पोत्यांच्या ढिगावर उभे राहून फोटो तेवढे काढले जातात. पण अशी कामेही अगदी तुरळक ठिकाणी. बाकीच्यांनी जणू पाण्यासाठी दैवावर भरवसा ठेवलेला आहे. पावसाळ्यात पाणी मिळेल, उन्हाळ्यात मैलोंगणती वणवण करून कुठल्यातरी डबक्यातून पाणी खरवडून भरून आणायचे, खोल विहीरीत पाय घसरला तर खाली दगडांवर आपटून कपाळमोक्ष ठरलेला अशा ठिकाणी उतरून महिलांनी, शाळकरी मुलींनी पाणी भरायचे हे जणू प्राक्तनाचे भोग म्हणून या परिसराने स्वीकारले आहे.

या परिस्थितीत बदल व्हावा असे राजकारणविरहीत इच्छाशक्ती दाखवणारे नेतृत्त्वही या भागात नाही. गावांमध्ये सामुहिक क्रियाशीलता नाही, छोट्याशा आदिवासी, कातकरी पाड्यांवरील गरीबांना तर कुणीच वाली नाही. दरवर्षी येणारी छायाचित्रे, पाण्याच्या दुर्भीक्ष्याच्या बातम्या बंद व्हायलाच पाहिजेत, पाण्यासाठी वणवण थांबलीच पाहिजे, अर्धवट योजना, नव्या जलसंधारण योजना कार्यान्वीत झाल्याच पाहिजेत, असे वाटणारा, त्यासाठी लढणारा कुणीही लोकप्रतिनिधी या भागात नाही. या भागातील पत्रकारांनीच आता काही तरी करायला हवे. सर्वच पक्षाच्या मिरवणाऱ्या पांढऱ्या टोप्यांना जाब विचारायला हवा, कामाला लावायला हवे. सारेच चीड आणणारे, उद्वेग वाढवणारे. सरकारी उपाययोजना काय तर, टँकर वाढवा, मागेल त्या गावाला टँकर द्या. हे असले थुकरट उपाय करणारे नियोजनकर्ते असल्यावर असेच होत राहणार. दरवर्षी तीच छायाचित्रे, त्याच बातम्या. लाजही वाटते आणि चीडही येते!”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content