HomeArchiveराहुल यांचे पाय...

राहुल यांचे पाय दोन दगडांवर!

Details
राहुल यांचे पाय दोन दगडांवर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणुका सध्या सुरू असल्याने राजकीय बातम्यांनी आणि नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी रोजच्या बातम्यांमध्ये गर्दी केली आहे. कोणता नेता कोठून निवडणूक लढविणार आणि तिथे त्याच्या विजयाची शक्यता किती आहे, यासंबंधीच्या बातम्या रोजच प्रसिध्द होत आहेत. यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या निवडणुकीत एक नवा प्रयोग सुरू केला आहे. त्यांनी उत्तरेतील एक आणि दक्षिणेतील एक अशा दोन दगडांवर एकदमच पाय ठेवण्याचे ठरवले आहे. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या राहुल यांच्या निर्णयाने एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी हे दोन मतदारसंघ हे जणू गांधी घराण्याची परंपरागत मिरासदारी मानले जातात. या दोन मतदारसंघांतूनच आजवर या घराण्यातील व्यक्तींनी निवडणूक लढविली असून त्यात त्यांना कधी अपयश आलेले नाही.

स्वत: राहुल गांधी आता चौथ्यांदा अमेठीमधून निवडणूक लढविणार आहेत. पण यावेळी त्यांनी अमेठीबरोबरच वायनाडमधूनही निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी या दोन्ही मतदारसंघांमधून उमेदवारी अर्जही भरले आहेत. दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या या निर्णयाने त्यांच्यावर टीका होत आहे. अमेठी या परंपरागत मतदारसंघातून त्यांना यंदा विजयाची खात्री वाटेनाशी झाली असल्यानेच त्यांनी वायनाड या काँग्रेससाठी अगदी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघाची निवड केल्याची टीका होत आहे. या टीकेत निश्चितच तथ्य आहे. 2014 मध्ये अमेठीतून राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने स्मृती इराणी यांना उभे केले होते. त्यांची उमेदवारी काहीशी उशिरा जाहीर झाली होती. तरीही त्यावेळी स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना चांगलीच लढत दिली होती. त्या राहुल गांधी यांना हरवतील, अशी अपेक्षा कोणीच व्यक्त केली नव्हती आणि त्याप्रमाणेच राहुल गांधी विजयीही झाले. मात्र 2004 मधील निवडणुकीच्या तुलनेत 2014 मध्ये त्यांचे मताधिक्य तर मोठ्या प्रमाणावर घटलेच, पण स्मृती इराणी यांच्या मताधिक्यातही लक्षणीय वाढ झाली. निवडणूक हरल्यावरही स्मृती इराणींना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. आता यावेळेसही भाजपने पुन्हा एकदा स्मृती इराणी यांनाच या मतदारसंघात उभे केले आहे. मात्र 2014 आणि 2019 या काळात शरयू नदीतून बरेच पाणी वाहून गेले आहे.

दरम्यानच्या काळात उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दोन तृतियांश बहुमत मिळाले असून अमेठी लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचे चांगलेच नियंत्रण आले आहे, असे चित्र दिसते. अर्थात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करताना मतदार नेहमीच वेगवेगळा विचार करतात, हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळेच यावेळीही राहुल गांधी हेच विजयी होतील, याची दाट शक्यता असली, तरी त्याची छातीठोकपणे खात्री मात्र कोणी देऊ शकत नाही. स्वत: राहुल गांधी यांच्याच मनात ही शंका उपस्थित झाली आहे, हेच त्यांची वायनाडमधील उमेदवारी दाखवून देते. या शंकेला कारणही तितकेच आहे. गेली निवडणूक हरल्यानंतरही स्मृती इराणी यांनी या मतदारसंघाशी असलेला आपला संपर्क कमी होऊ दिला नाही. किंबहुना तो अधिकच दृढ होईल, या दिशेने काम केले. या काळात त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक योजना या मतदारसंघात सुरू केल्या आणि अमेठीमध्ये एका सरकारी शस्त्रास्त्र कारखान्याची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करवून घेतली. राज्यात भाजपाचे सरकार असल्याने त्यांना सरकारी स्तरावर सर्वतोपरी सहकार्य मिळाले आणि स्मृती इराणी यांनी या मतदारसंघात आपला जम बसविल्याचे दिसून आले. याचा अर्थ त्या यंदाची निवडणूक जिंकतील, असा होत नसला, तरी निवडणुकीत नक्की काय होईल, याची खात्रीही कोणाला देता येत नाही. हे त्यांचे यश आहे, यात शंकाच नाही.

एकाच वेळी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविणे हे आपल्या विजयाची खात्री नसल्याचे लक्षण मानले पाहिजे. मात्र अनेक दिग्गज नेत्यांनी यापूर्वी दोन दोन मतदारसंघांतून निवडणुका लढविल्या असल्याने राहुल गांधी यांचा निर्णय अगदीच वेगळा आहे, असे म्हणता येणार नाही. यापूर्वी गांधी घराण्यातील इंदिरा गांधी यांनी 1980 मध्ये रायबरेली आणि मेडक या दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढविली होती आणि दोन्ही ठिकाणी त्या विजयीही झाल्या होत्या. सोनिया गांधी यांनीही अमेठी आणि बेल्लारी येथून निवडणूक लढविली असली, तरी त्या दोन वेगवेगळ्या वेळी लढविल्या होत्या. पण निवडणुकीतील हार होण्यास राहुल गांधी घाबरतात, हा समज वायनाडमधील उमेदवारीमुळे निर्माण झाला आहे. भारतीय मतदारांनी आजवर अनेक दिग्गज आणि नामवंत उमेदवारांना निवडणुकीत पराभवाचा ‘हार’ घातला आहे. यात खुद्द इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मायावती यासारख्या वेगवेगळ्या पक्षांतील मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. पण त्यामुळे या नेत्यांचे नेतृत्त्व संपुष्टात आले नाही.

निवडणुकीतील विजय-पराभव हे तत्कालिक असतात आणि त्यातून नेतृत्त्व तावून सुलाखून निघते. पण आजवर केवळ ऐषोआराम आणि हुजरेगिरी यांचाच अनुभव घेतलेल्या राहुल गांधी यांची मानसिक बैठक पराभवासाठी तयार झालेली नाही आणि त्यांनी हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न केला असल्याचेच सिध्द होते. पण त्यांनी हार-जीत इतकी मनाला लावून घेण्याचे कारण नाही. कोणत्याही राष्ट्राच्या जीवनात कधी अनपेक्षितपणे, तर कधी पूर्वनियोजित घडामोडींमुळे नेतृत्त्वाचा उदय होतो. हे नेतृत्त्व मूलत: परिस्थितीतून निर्माण होत असते. अमुक एका पध्दतीचा नेता आपण तयार करू, असे म्हणून तो निर्माण होत नसतो. त्यामुळे ठोकून ठाकून एखाद्या व्यक्तीला नेता बनविण्याचे प्रयत्न हे बहुतांशी असफलच होतात. नेता हा जसा जन्मावा लागतो, तसाच तो आधी एखाद्या व्यक्तीच्या मनात जन्मावा लागतो. जागतिक स्तरावरील एक अत्यंत यशस्वी आणि महान नेते म्हणून ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे मान्यता पावलेले आहेत. चर्चिल यांचे व्यक्तिमत्व हे केवळ राजकीय नव्हते तर त्यात एका अभ्यासू इतिहासकार, संवेदनशील लेखक आणि जिज्ञासू व्यक्तीचाही समावेश होते. पण राजकारणातील अधिकारपदामुळे त्यांच्या या अन्य गुणांकडे सामान्य माणसाचे जावे तितके लक्ष जात नाही. अशा या महान नेतृत्त्वालाही सामान्य मतदारांकडून पराभवाचा दणका देण्यात आला होता. आणि तोही कधी? तर दुसऱ्या महायुध्दाच्या अत्यंत खडतर आणि प्रतिकूल कालखंडातून ब्रिटनला यशस्वीरीत्या बाहेर काढून आणि युरोपातील नाझी नेतृत्त्वाचा नि:संशय बीमोड केल्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत!

युरोपमध्ये हिटलरच्या आत्महत्त्येनंतर एप्रिलमध्येच युध्द संपुष्टात आले होते. त्यानंतर 5 जुलै 1945 रोजी ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. युध्दात ब्रिटनने दणदणीत विजय मिळविल्यामुळे तत्कालिन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा पक्ष सहज आणि भरघोस मतांनी निवडून येईल, अशीच कोणीही अपेक्षा केली असती. किंबहुना तीच जगाची अटकळ होती. पण या निवडणुकीत चर्चिल यांच्या हुजूर पक्षाला सपशेल पराभव पत्करावा लागला आणि क्लेमंट एटली यांच्या मजूर पक्षाने प्रथमच निर्णायक बहुमत संपादन करून सत्ताग्रहण केले. याचा धक्का जसा चर्चिल यांना बसला, तसाच तो जगालाही बसला. असे का व्हावे? कारण चर्चिल यांचे नेतृत्त्व लढवय्या नेत्याचे होते यावर सर्वांचे एकमत होते. पण बदललेल्या जागतिक आणि राजकीय स्थितीला योग्य असा समन्वयवादी नेता आला आणि चर्चिल यांच्यासारख्या महान नेत्याची हार झाली. जर अशी स्थिती चर्चिल यांची होऊ शकते, तिथे राहुल गांधी यांची काय कथा! अर्थात राहुल गांधी यांना आपण चर्चिल किंवा आपली आजी इंदिरा गांधी यांच्यापेक्षा मोठे नेते आहोत, असे वाटत असल्यास गोष्ट निराळी.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...
Skip to content