HomeArchiveराष्ट्रीय लगोरी स्पर्धेत...

राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्र तृतीय स्थानी!

Details
राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्र तृतीय स्थानी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
अॅम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने, दिल्ली लगोरी संघटनेच्या वतीने लगोरीचे जनक क्रीडारत्न संतोष गुरव यांच्या जयंतीनिमित्त आठवी सिनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद व एशियन निवड चाचणी स्पर्धा नुकतीच न्यू कृष्णा मॉडेल पब्लिक स्कूल, रावता व्हिलेज, नवी दिल्ली येथे पार पडली. या स्पर्धेत १५ राज्य सहभागी झाले होते. या स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेचे उदघाटन नवी दिल्लीच्या महापौर सुमन डागर, भारतीय लगोरी संघटनेचे अध्यक्ष संदीप गुरव (महाराष्ट्र राज्य एकलव्य पुरस्कार विजेते) यांच्या हस्ते संतोष गुरव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत दीप प्रज्वलन तसेच लगोरी फोडून करण्यात आले. उदघाटनाप्रसंगी लगोरी खेळाच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी महाराष्ट्रातील लगोरीचे जनक संतोष गुरव यांनी प्रसार केल्यामुळे भारतातील सर्व राज्यांसह जगभरातील तीस देशांमध्ये आज तो मोठ्या प्रमाणात खेळला जात असून त्यांचे हे कार्य संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार अनेक वक्त्यांनी यावेळी काढले. नवी दिल्लीत असणाऱ्या सर्व सार्वजनिक तसेच खासगी शाळांच्या ज्या क्रीडा स्पर्धात होतात त्यात लवकरच लगोरी खेळाचाही समावेश समावेश केला जाईल व नवी दिल्लीत भविष्यात लगोरीचा खेळ लोकप्रिय केला जाईल, अशी ग्वाही दिल्ली स्कूल्स असोसिएशनचे सचिव विनोद जैन यांनी यावेळी दिली.

स्पर्धेत पुरूषांच्या गटात दिल्ली संघाला विजेते पद तर उपविजेतेपद पाँडेचरी, तृतीय स्थान महाराष्ट्र व तेलंगणा संघाला मिळाले. महिलांमध्येसुद्धा दिल्ली संघाने सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपद मिळविले. उपविजेतेपद तामिळनाडू, तर तृतीय स्थान दिल्ली एन सी आर व चंदीगड संघाला मिळाले. टार्गेट लगोरी प्रकारात गोवा संघाला प्रथम, छत्तीसगड संघाला द्वितीय स्थान, मिक्स डबलमध्ये पॉण्डेचेरीने अजिंक्यपद मिळविले. या स्पर्धेतून निवडलेला संघ, थायलंड येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय लगोरी स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत. बक्षीस वितरण समारंभ आ. कंवलजीत सहरावत, दिल्ली मनपाचे नगरसेवक दीपक मेहरा, विनोद जैन, दिल्ली संघटनेचे अध्यक्ष मनोज कुमार, सचिव अविनाश साहू, प्राचार्य हवा सिंह, संदीप गुरव, तामिळनाडू लगोरी संघटनेचे सचिव कलावती अय्यानार, तांत्रिक मार्गदर्शक तुषार जाधव आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून भरत गुरव यांनी, तर सहपंच श्रीधर तरूपल्ला, राजू, धनंजय, अरूण, मित्तल, सोमवीर, राकेश, विटकर, सुधीर, तन्वेष वेणगुरकर, नितीन परसकर यांनी काम पाहिले.

या राष्ट्रीय स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंची नावे खालील प्रमाणे- सिद्धांत संतोष गुरव, भूषण राऊत, दिवेश महाकाल, रोहन काळे, हेरंब गर्दे, कुणाल जाधव, रितेश पेणोरे, प्रियांशू खोडके, प्रशिक अंबाडे, अर्सलान सय्यद, स्वप्नील मालेवर, साईराज वीटकरे आणि प्रतीक बी. संघ प्रशिक्षक संजय यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र लगोरी संघटनेचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content