HomeArchiveराष्ट्रवादीतील 'सरदारकी’ संपवा!

राष्ट्रवादीतील ‘सरदारकी’ संपवा!

Details
राष्ट्रवादीतील ‘सरदारकी’ संपवा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
[email protected] gmail.com
शरद पवार नावाचे राजकीय वादळ म्हणजे बंडखोर. या बंडखोरीने मात्र आजपर्यंत नुकसान झाले ते पवारांचेच. कारण राज्यातली काँग्रेस संपविता-संपविता आता राष्ट्रवादीच संपत चालली आहे. हे जेव्हा साहेबांना समजले त्यावेळी डोक्यावरून बरेच पाणी गेले होते. राज्यात काँग्रेसची पूर्णतः वाताहत झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषः सांगली, कराड, कोल्हापूर या भागामध्ये काँग्रेसचे अस्तित्त्व असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला पुणे वगळता एकदेखील जागा सोडली नाही. याचा अर्थ काँग्रेस पूर्णपणे संपवणे हाच हेतू असल्याचे स्पष्ट होते. बारामतीत आपल्या कन्येचा पराभव होतो की काय याची शंका आल्यामुळे आपला निवडणूक यंत्रणेवर विश्वास राहणार नाही, असे वक्तव्य ते करतात आणि सुप्रिया सुळे पावणे दोन लाख मताधिक्याच्या फरकाने निवडून येतात. याचा अर्थ भाजपच्या नेत्यांनाही कळून चुकले हा पराभव झाला तर मोठी अडचण होईल. त्यामुळे त्यांनी हा विजय सुकर केला तेही जनतेला माहित आहे.

संपूर्ण देशात गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळेस भाजपची वाट बिकट असताना भाजप स्वतंत्ररित्या बहुमत गाठते. याचा अर्थ निश्चित यंत्रणेमध्ये गडबड होती हे सिध्द झाले असतानादेखील याविरोधात विरोधी पक्षाने ज्या पध्दतीने आवाज उठविण्याची गरज होती ती केली गेली नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी थेट भाजपला आव्हान देऊन जे वादळ उठविले ते आजही शमले नाही. ही वस्तुस्थिती असताना कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतपत्रिकेव्दारे मतदान झाले. हा निकाल काँग्रेस क्रमांक एक, क्रमांक दोनवर जेडीएस तर तिसर्यान क्रमांकावर भारतीय जनता पक्ष गेला. याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजेच ईव्हीएममध्ये गडबड आहे हे यावरून स्पष्ट होते. सांगण्याचे तात्पर्य निवडणूक यंत्रणा कोणत्या थराला गेली आहे याचे भान राष्ट्रवादी काँग्रेसने तरी ठेवणे गरजेचे आहे. कारण, एकमेकांना संपविता-संपविता दोन्ही पक्ष संपले तर मग भाजपला रोखणार कोण?

भोसरीमध्ये पवार साहेबांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा बैठकीचा आढावा घेतला असता या बैठकीत कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी पक्षाशी एकनिष्ठ काम केले का, असा सवाल उठवला. यावेळी जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. आता खर्याा अर्थाने भाकरी फिरवा अस सल्लाच कार्यकर्त्यांनी दिला. साहेबांनीदेखील हे सर्व शांतपणे ऐकून घेतले. मात्र, खरेच साहेब भाकरी फिरवणार की पुन्हा भाकरी करपिवणार हे येणार्याऐ काळात स्पष्ट होईल. दुसर्याह बाजूला मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी राष्ट्रवादीनेच काँग्रेस संपवली, असा थेट आरोप करून येणार्याच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीशी युती न करता वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करावी, असा आग्रह धरला. याचा अर्थ काँग्रेसमध्येदेखील राष्ट्रवादीबद्दल नाराजी आहे. राष्ट्रवादीबद्दल काँग्रेसमध्येही अशाप्रकारची भावना असेल तर पवार यांनी आता समतोल साधत आपल्याच कार्यकर्त्यांनी आपल्यासमोर ज्या वेदना मांडल्या त्या वेदनांचा गांभीर्याने विचार करून येणार्याम विधानसभा निवडणुकीत खरा ’राष्ट्रवाद’ जागृत करावा.

देशात भाजपला सत्ता मिळाल्यानंतर राज्यात भाजप-सेनेला 226 जागा मिळतील असे भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविले. एवढेच काय लोकसभा निवडणुकीत 42 जागा युतीला मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता आणि तेवढ्याच जागा त्यांना मिळाल्या. एवढा आत्मविश्वास असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीला येणारी विधानसभा निवडणूक धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या व्यक्तव्याची गंभीर दखल या दोन्ही पक्षांनी घेतली नाही तर लोकसभेसारखाच पुन्हा हा निकाल लागू शकतो. सांगण्याचे तात्पर्य एका अर्थाने मुख्यमंत्र्यांनी अगोदरच धोक्याची घंटा वाजविल्यामुळे येणार्यात या तीन महिन्याच्या कालावधीत आपल्याला योग्य ती पावले उचलता येतील.

या बैठकीत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या मांडणे गरजेचे आहे. कारण, अनेक वर्षांपासून निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भावनांना यानिमित्ताने वाट मोकळी करता आली. विशेष म्हणजे साहेबांनीदेखील प्रत्येकाला बोलू दिले. त्यामुळेच पक्षामध्ये किती आलबेल आहे, याचा अनुभव त्यांना मिळाला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते वसंत लोंढे यांनी भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही विधानसभेत आपण किती मागे गेलो आहोत, हे सांगितले. आपण लोकसभेला काय दिवे लावले आहेत, ते समोर आले आहे. येणार्यां विधानसभा निवडणुकीत अचूक माणसे द्या, राष्ट्रवादीचे काम शहरात असताना मते का कमी मिळतात याचाही कुठेतरी विचार केला पाहिजे. आपली क्षमता पाहून निवडणूक लढविली पाहिजे. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. त्यामुळे साहेबांनी आता विचारपूर्वक पक्षहिताचा निर्णय घ्यावा, असे लोंढे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज ही अवस्था का झाली, यावर ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी खडेबोल सुनावले. नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा संवाद राहिला नाही. याचा अर्थ पूर्वीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या जिवावर होत होत्या. आताच्या निवडणुका पैशांच्या जिवावर होतात हे तर भोईर यांना अप्रत्यक्षरित्या सांगावयाचे नाही ना? पक्षसंघटनेत एखाद्या फॅक्टरीत तयार केल्याप्रमाणे पदे वाटली जातात. पदे वाटूनही पक्षसंघटनेसाठी कोणीही प्रयत्न करत नाही. निवडणुकीत पराभव हा त्या व्यक्तीचा होतो. येणार्यास विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणालाही द्या, सर्वांनी एकदिलाने काम करू, असे आश्वासन दिले जाते. मात्र, ज्यावेळी उमेदवारी जाहीर केली जाते त्यावेळी मी आमदार नाही झालो तरी चालेल तुलाही होऊ देणार नाही, अशा भावना प्रत्यक्षात कृतीत आणल्या जातात. त्यामुळे या भावना प्रत्येकांनी मनातून काढून टाका, अशी कळकळीची विनंती भोईर यांनी केली.

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शहरातील विविध प्रश्न असून पाणी, कचरा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, विशेष म्हणजे महापालिकेच्या ज्या विकासकामांच्या निविदा प्रसिध्द केल्या जातात त्यात आमदार, नगरसेवकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट केले. याचाच अर्थ राष्ट्रवादीच्या काही मंडळींचा निविदांमध्ये सहभाग असल्यामुळे अशा चुकीच्या कामाविरोधात आवाज उठविल्यास भाजपच्या नेत्यांना फायद्याचे होते. हेच साने यांना यातून स्पष्ट करावयाचे होते. विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर ठेपली असताना उमेदवारी अगोदर जाहीर केली तर त्या उमेदवाराला काम करता येईल. मग कोणालाही उमेदवारी द्या, चालेल तशी कोणाची तक्रार राहणार नाही. किमान येणार्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत लोकहिताच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात ताकदीने आंदोलन केले जातील, असेही साने यांनी सांगितले.

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांनी आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत असे सांगत आपण विधानसभेला इच्छूक नाही. कोणालाही उमेदवारी द्या. त्यांचे प्रामाणिकपणे काम करू, त्यांना निवडून आणू, आपणास भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी मिळाली असती मात्र, मी उमेदवारी घेतली नाही. आपणास पक्ष बदलण्यास आवडत नाही. कारण, आपली विचारधारा, निष्ठा पवारसाहेबांबरोबर आहे, असे सांगितले. पवारसाहेबांनी भोसरीमध्ये मनासारखे काम झाले नाही, असे म्हणताच 2009 पासून आजपर्यंतच्या मतांची आकडेवारी त्यांनी साहेबांना पटवून दिली. आता 37 हजारांनी मागे आहोत. थोडा फरक कमी झाला आहे. ही सगळी मते त्यांची नाहीत. प्रामाणिकपणे आणि योग्य नियोजन केले तर यापुढे अडचण भासणार नाही. येणार्या. निवडणुकीत राष्ट्रवादीचाच विजय निश्चित असेल. पराभवामुळे आपणास ठेचा लागल्या आहेत. त्यामुळे येणार्याक निवडणुकीत कोणालाही उमेदवारी द्या त्यांना निश्चित विजयी करू, अशा भावना लांडे यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी तर आपण कमी पडलो आहोत याची कबुलीच साहेबांसमोर दिली. राष्ट्रवादीने जी कामे केली ती जनतेपर्यंत पोहेचविण्यास आम्ही कमी पडलो. पक्ष संघटना उभारताना ’केडर बेस’ ठेवून काम करायला हवे होते. काम करताना सर्वांनी मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. इच्छुकांनी पक्षसंघटना वाढविण्यास काम करावे. साहेब जो निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही झपाटून काम करू, असे आश्वासन वाघेरे यांनी दिले.

राष्ट्रवादीची आढावा बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडल्या. साहेबांनी त्या ऐकून घेतल्या. मात्र, आज राष्ट्रवादीची ही अवस्था कशामुळे आहे याचे आत्मचिंतन कधी तरी होणार आहे की नाही? राष्ट्रवादीचे स्वःतला शिलेदार समजणारे अलिशान मोटारीतून खाली न उतरता, कार्यकर्त्यांच्या व्यथा न जाणता, काम करणार्याा कार्यकर्त्याशी कधीच संवाद न साधता काम करतात. त्यामुळे कार्यकर्ता राहिला नाही. संघटन राहिले नाही. केवळ पैशांच्या जिवावर आपण निवडणूक जिंकू शकतो, हा मस्तवालपणा वाढीस लागल्यामुळे राष्ट्रवादीची ही अवस्था झाली आहे. अजितदादांनी सामान्य कार्यकर्त्याला पदे न देता एकाच घरात वर्षांनुवर्षं पदे दिल्यामुळे घराणेशाही रूढ झाली. सामान्य कार्यकर्ता हा केवळ निवडणुकीपुरताच उरला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेचे काम केले. ज्यांना अजितदादांनी मोठे केले त्यांनी राष्ट्रवादीसाठी निवडणूक कार्यालयासाठी जागा खाली नसल्याचे सांगितले. यावरून दादांवर किती प्रेम आहे हे लक्षात येते. केवळ साहेब आणि दादा शहरात आले की गर्दी करायची आणि ते गेल्यानंतर ’जैसे थे’ परिस्थिती.

दत्ता सानेंसारखा विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे विरोधी पक्ष जिवंत आहे हे वर्षभर पाहिला मिळाले. कार्यालयात कार्यकर्ते, नगरसेवक यांची वर्दळ वाढली. अनेक प्रश्नांवर त्यांनी भाजपला कोंडीत पकडले. मात्र, त्यांचे हे काम पाहून पक्षातल्याच काही मंडळी विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडून काढून घ्यावे, यासाठी राजकारण करू लागले. पक्षाच्या बैठकीत अप्रत्यक्षरित्या माजी आमदार विलास लांडे यांच्याविरोधात वक्तव्य केली. सेवा दलाचे शहराध्यक्ष आनंदा यादव यांनी तर थेट हल्लाच चढविला. त्यामुळे बैठकीत वेगळे वातावरण तयार झाले. बैठक संपल्यानंतर यादव आणि नगरसेवक संजय वाबळे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. मात्र, कार्यकर्त्यांनी हा वाद शमविला. राष्ट्रवादीतील या बैठकीचे सार पाहता कार्यकर्त्यांमध्ये उदिग्न भावना होत्या. त्या भावनेला पवार यांनीच वाट मोकळी करून दिली. साहेबांनी आतातरी जातीने लक्ष घालून पक्षसंघटना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पावले उचलली नाहीत तर पुढील काळ बिकट आहे.”
 
“विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी

Continue reading

नितंब, मनगट, कण्यातले फ्रॅक्चर हे ठिसूळ हाडांचे लक्षण

जगभरात जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन साजरा होत असताना, आयुष मंत्रालयाने लाखो लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या ऑस्टिओपोरोसिसच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सुरुवातीपासूनच घ्यायची प्रतिबंधात्मक काळजी आणि जीवनशैलीच्या गंभीर गरजेवर भर दिला आहे. हाडांच्या आरोग्याबद्दल आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजाराला तोंड देण्यासाठी आयुर्वेद कसे उपयोगी ठरू शकते हे...

बिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची पहिली फेरी पूर्ण

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आयोगाने 121 सर्वसाधारण निरीक्षक आणि 18 पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली असून दुसऱ्या टप्प्यासाठी 122 सर्वसाधारण निरीक्षक आणि 20 पोलिस निरीक्षक नेमले आहेत. तसेच, यादरम्यान सुरू असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी 8 सर्वसाधारण आणि 8 पोलिस निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आपापल्या मतदारसंघांमधील नियुक्तीनंतर सर्व निरीक्षकांनी त्यांच्या पहिल्या भेटी पूर्ण...

तुतीकोरिन बंदरात 5 कोटींचे चिनी फटाके जप्त!

दीपावलीपूर्वी फटाक्यांची बेकायदेशीर आयात रोखण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 'ऑपरेशन फायर ट्रेल' या मोहिमेत, तुतीकोरिन बंदरात चाळीस फुटाचे दोन कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये 83,520 चिनी फटाके असल्याचे आढळून आले. अभियांत्रिकी वस्तू म्हणून ते पाठवण्यात येत होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची...
Skip to content