Details
राणीच्या बागेत ‘महापूर’..
01-Jul-2019
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
राणीच्या बागेतील वाघाने मोठ्याने डरकाळी फोडली आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. त्याने आपल्या दरबारातील सेवेकऱ्यांना, बागेतील सर्व प्राण्यांना हजर राहण्यासाठी दवंडी पिटा आणि आता ताबडतोब निघा, असा आदेश दिला. काही क्षणातच दरबारात माकडे, कोल्हे, स्पीड पोस्ट स्पेशलिस्ट हरिणी, अस्वल, हत्ती, काही पक्षी हजर झाले.
`काय हुकूम आहे, राजे?’.. सर्व प्राण्यांनी वाघाला विचारले.
‘तुम्हाला माहीत असेलच?’.. वाघाने सर्वांकडे नजर टाकत विचारले..
‘नाही महाराज’.. कोल्ह्याने नेहमीप्रमाणे चापुलसी करण्यास सुरुवात केली..
‘माहीत नाही, राजे..’ माकडाने जागच्याजागी उडी मारत विचारले..
‘हे पाहा, आपल्या बागेत नवीन पाहुणे येणार आहेत.. ते उद्या आणि तेही कायम राहयला..’ वाघाने मिशीवर हात फिरवत फिरवत चारी बाजूला नजर टाकली.
‘म्हणजे तुम्हाला काही खतरा नाही ना?’.. कोल्हा पुढचे दोन पाय आपटत म्हणाला.
‘नाही, मला काही धोका किंवा खतरा नाही, आमच्याच वंशावळीतला आहे तो.. जसं प्राण्यामध्ये मी तुमचा प्रमुख तसा तो माणसातला वाघ आहे.. वाघाने स्पष्टीकरण देतानाच बाजूला असलेल्या सेवेकऱ्याला पाणी आणण्याची ऑर्डर दिली.
‘राजे, आज नळाला पाणी आले नाही..’ सेवेकऱ्याने असे सांगताच माकडाने टुणकन उडी मारून ‘राजे, काळजी करू नका, मी आणतो समोरच्या टॉवरमधून.. असे सांगितले.
हे ऐकून राजेंना हायसं वाटलं आणि कोरडा घसा खाकरत त्याने उजवा हात उंचावत माकडाला ‘जा घेऊन ये..’ असे फर्मावले.
‘राजे… मी बोलू का?’ कोल्हा दात विचकावत आपली चीड व्यक्त करत होता..
‘बोलाsss.. बोला, कोल्होबा बोला? काहीही मनात किंतु, परंतु ठेवू नका.. उद्या येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर प्राण्यांचा तमाशा नको..’
वाघोबाने फुल परवानगी दिल्यानंतर कोल्ह्याच्या अंगात हत्तीचं बळ आलं..
‘आभारी आहे, राजे.. बीएमसी पाणी एक दिवस आड करून सोडते. त्यामुळे आम्हाला समोरच्या चाळीतील लोकांसमोर भिकाऱ्यासारखे उभे राहवे लागते. आपण महापौरांना हे एकदा सुनावले पाहिजे..’ कोल्होबाने काही सेकंदात सर्वांची व्यथा मांडली. त्याबरोबर जमलेल्या सर्व प्राण्यांनी होकार दिला. वाघोबाला काय बोलावे तेच सुचेना. शेवटी त्याने सर्वांना शांत केले.
‘माझ्या तमाम..’ वाघाने बोलण्यास सुरूवात करताच सर्व प्राण्यांनी त्याचं एका तालात ओरडून व टाळ्या वाजवत स्वागत केलं. वाघोबाने दोन्ही हात वर करत सर्वांना शांत राहण्यास सांगितले.. तेवढ्यात गाढवाने मागचे पाय ऊडविण्यास सुरूवात केली. वाघोबाने त्याला स्पष्ट सांगितले, `उद्यापासून असे उड्या मारणे आणि बेसूर ओरडणे चालणार नाही..’
‘का, राजे?..’ आपण राजे असताना?..’ एका माकडाने खवचटासारखा प्रश्न विचारून खरी परिस्थिती काय आहे, कोण तो नवीन पाहुणा येणार आहे याची माहिती घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
‘हे, पाहा, उद्या जे पाहुणे येणार आहेत, ते मुंबईचे प्रथम नागरिक आहेत..’ वाघोबाने अतिशय गांभीर्याने सांगितले.
‘आम्हाला हे माहीतच आहे..’ कोल्होबाने मोठ्या चतुराईने आपली खेळी करून वाघोबाची विकेट घेतली.
‘ठिक आहे..’ मुंबईचे महापौर आपल्या बागेत राहयला येणार आहेत. त्यामुळे आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. त्यांची झोपमोड होईल असा वातरटपणा कोणीही करायचा नाही..’ वाघोबा राजे बोलत असताना प्राण्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली.
‘हे कसे शक्य आहे?..’ हरिणीने प्रश्न विचारला. पुढे म्हणाली.. `आम्हाला धावल्याशिवाय चैन पडत नाही.. आणि आम्ही उड्या मारल्यावरच तंदुरुस्त राहतो. आम्ही स्लीम आहोत म्हणून तर मनुष्यप्राण्यांना आमचा हेवा वाटतो. आम्ही धावलो नाही तर शरीरातील चरबी वाढेल मग कोणाला तोंड दाखवायलाच जागा राहणार नाही..’
‘मग असं करा, सर्व हरिणांनी पाणघोड्यासारखे पाण्यामध्ये राहून उड्या माराव्यात..’ कधी तोंडातून ब्र न काढणाऱ्या पाणघोड्याने, हरिणीने आपल्या कळपात यावे म्हणून लाईन मारण्याचा प्रयत्न केला..
‘हे पाहा..,’ राजे वाघोबा ओरडले.. आजचा दिवस आहे, उद्या महापौरसाहेब येतील. ते माझ्या भेटीला येणार आहेत.. हाय टी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या पुढ्यात जे असेल ते निमूटपणे खायचे. राजकारणी लोकांसारखी खाबूगिरी करायची नाही.. समजलं?.. आता सर्वांनी आपापल्या घरी निघा. जय राणीचा बाग, जय जिजाऊ..’ सर्वजण घरी जातात.
दुसऱ्या दिवशी..
महापौर आपल्या नव्या घरात जातात. नुकतेच ते आजारातून सुखरूप बाहेर आल्याने त्यांना नव्या घरातही प्रसन्नता वाटली. आपण आपल्या राजासाठी महापौर बंगला खालसा केल्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. समोरच बाळासाहेबांच्या फोटोला वाकून नमस्कार करून ते आतल्या खोलीत गेले व कुलदेवतेचे आशीर्वाद घेतले. त्यांनी पीएला विचारले आता पुढचा कार्यक्रम काय?..
‘सर, आपण आता राणीच्या बागेत राहयला आलोत.. तर कार्यक्रमानुसार या बागेतील राजेंची भेट घेण्याचे ठरले आहे..’ पीएने महापौरांना सांगितले.
‘अरे, हो.. बरं झालं आठवण केलीस ती.. मला अजून तो समोरचा समुद्रच दिसतोय.. त्या उसळणाऱ्या लाटा, त्यांचा आवाज.. आकाशात सुरेल आवाज करत उधळणारे पक्षी, समुद्रातून उंच उड्या घेत माझी करमणूक करणारे मासे.. आहाहाsss, काय त्या आठवणी! फक्त आठवणीच उरल्यात!.. चला निघूया.. भेटीला जाऊ या बागेतील राजेंना भेटायला..’ महापौर म्हणाले.
महापौर राणीच्या बागेत येतात..
‘जय महाराष्ट्र..’ महापौर राजेंसमोर नमून बोलतात.
‘जय महाराष्ट्र, जय जिजाऊ..’ वाघोबाने असे बोलताच सर्व प्राणी वेगवेगळे आवाज काढून महापौरांचं स्वागत करतात. (सर्वांचा किलकिलाट ऐकून महापौर थोडेसे नाराज झाले. त्यांना भविष्यात काय वाढून ठेवले हे लक्षात आले.)
‘आपली भेट घेण्यासाठी आलो, लोभ असावा, लोभ वाढवावा..’ महापौरांनी राजेंना सांगितले.
महापौरांना सर्व प्राण्यांनी एका सुरात नमस्कार केला आणि पुढील स्वागतगीत गायले..
आले, आले.. आमुच्या दारी महापौर
दिवाळी, दसऱ्याचा आला महापूर
आले, आले… आमच्या दारी महापौर
कसे वर्णन करावे त्यांचे..
जगात पसरता लाचार
समोर उसळता सागर
तरीही ते नांदती आमुच्यात
कलियुगात नाही सापडणार
साधी राहणी, उच्च विचार..
उच्च विचार, उच्च विचार..
(महापौर चहा न घेताच तेथून निघाले.. आणि डोळ्यातील अश्रू पुसत, पुसत त्यांनी सर्वांना निरोप दिला.)”
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार