Details
राजकारणाने होतोय गृहकलह!
01-Jul-2019
”
विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सर्वेसर्वा आहोत असे बजावणाऱ्या शरद पवारांच्या घरातील कलह चव्हाटयावर आलाय. माढा लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्यासाठी मोठया पवारांनी माघार घेत अजित पवारांचा पुत्रहट्ट पूर्ण केला. तर दुसरीकडे पवारांचे दुसरे नातू रोहित पवार पार्थला अपशकून करण्यासाठी २४ तासांच्या आत सरसावले. आजोबा तुम्ही माढातून लढाच, कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा भावनांचा विचार करा, अशा अर्थाचे व्टिट रोहित यांनी केले. त्यातून पार्थविरोधी रोहित हा कलह पुढे आला. पवारांच्या घराण्यात छुपा कलह होता तो आता उघड झालाय.
शरद पवारांवर राजकारणातील बडया नेत्यांची घरं फोडल्याचा आरोप कायम होत राहिला आहे. आज हा कलह पवारांच्या घरात पोहोचला आहे. काय वाटत असेल अशावेळी त्यांना? माढामध्ये निवडणूक लढण्याचे संकेत देत पवारांनी पार्थ पवार लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत, असे वक्तव्य शरद पवारांनी हसत हसत केले होते. मात्र हे हास्य फार काळ टिकले नाही. अजित पवारांचे पुत्रप्रेम वरचढ ठरले. पार्थच्या मागे अजित पवार ठामपणे उभे राहिले. माढातून विजयसिंह मोहिते पाटील हे विद्यमान खासदार आहेत. त्यांना पुन्हा संधी हवी होती. मात्र मोहिते पाटलांच्या विरोधातील गटाने पवारांचे कान भरले. आपण स्वत: लढत आहोत, असे सांगून पवारांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे पार्थ पवार यांना ते रोखू शकले नाहीत.
अजित पवारांचे पुत्रप्रेम शांत झाले नाही. तरूण नेता म्हणून पार्थ यांना प्रोजेक्ट करण्याचा निर्धार अजित पवारांनी केल्याचे उघड होताच मोठया पवारांवर घरातूनच दबाव आला. अजित पवार म्हणजे दादागिरीच. त्यामुळे सर्वेसर्वा शरद पवारांना त्यांच्यापुढे नमते घ्यावे लागले. हा कलह झाकायचा प्रयत्न वाया गेला. शेवटी एका घरातील किती जणांनी लढायचे असा गंभीर सवाल करून माढातून आपण लढणार नाही. पार्थ मात्र निवडणूक लढतील, हेही त्यांनी सांगून टाकले. पवारांची माघार म्हणजे धाकल्या पवारांचा मोठा विजय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांचीच दादागिरी चालते. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष किंवा अन्य पदाधिकारी नामधारीच असतात. विविध नेते पवारांपुढे निष्ठा दाखवतात. मात्र ते आदेश पाळतात तो अजितदादांचाच. आघाडी सरकार असताना अजितदादाच त्यांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आदेश देत होते. हे सर्वज्ञात आहे. पक्षातील जवळच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणारे अजित पवार त्यांच्या पुत्राला न्याय देण्यास थोडेच कमी पडणार?
सत्तेची चटक वाईट असते म्हणतात. सत्ता माणसं बिघडवते. सत्ता नाती तोडते. तशी वेळ येणे एकप्रकारे पराभवच मानायला हवे. ठाकरे-मुंडे तटकरे अशा बडया नेत्यांच्या घराण्यात राजकीय कलह दिसला. पवार घराणे त्याला अपवाद नाही. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्हयातील कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. मात्र त्यावेळी मोठया पवारांनी विरोध केला होता. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांची पत्नी राजकारणात येणार होती. मात्र तेही घडले नाही. त्या आता कोठेच दिसत नाही. माढा मतदारसंघात निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील नाराज झाले होते. त्यांचे चिरंजीव रणजित मोहिते पाटील भाजपमध्ये वाटेवर आहेत. विजयसिंह हे पवारानंतर त्यांच्या पक्षात ज्येष्ठ नेते. पण त्यांनाच डावलण्याची खेळी पवारांनी केली. म्हणून रणजित नाराज झाले. एकूणच पवारांची रणनीती फेल ठरली. अजित पवार यांची चाल मात्र यशस्वी झाली.
पुत्रप्रेम नेहमीच वरचढ ठरते. कोणताही नेता त्याला अपवाद नाही. पवारांनासुद्धा जाणता राजा म्हटले जाते. मात्र त्यांनाही गृहकलहाला सामोरे जावे लागले. हे खरं तर त्यांचे अपयश म्हणावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये फूट पाडून पवारांनी निर्माण केला. पण काँग्रेसचा विचार आणि तत्त्वं मात्र त्यांनी नाकारली. त्यामुळे पक्षाची वाढ काही होत नाही. पवारांनी शिवसेना-भाजपमधील नेते फोडले. तेच आज भाजप करत आहे. यात गैर काय? शेवटी पेराल तेच उगवणार! आघाडीची भाषा करायची आणि नगरसारख्या एका जागेसाठी न पटणारी ठाम भूमिका घ्यायची याला सहमतीचे राजकारण म्हणायचे काय? पवारांचा भाजपला विरोध की काँग्रेसला अपशकून? नेमकं काय ते तेच सांगत नाही. काँग्रेसला धक्का देताना भाजपला लाभ देण्याचे त्यांचे तंत्र उघड आहे. वारे जसे वाहतील तसे पवारांचे राजकारण बदलत असते. या एका गुणामुळे म्हणा किंवा अवगुणामुळे म्हणा शरद पवार गेली पाच दशके राजकारणात टिकून आहेत. हेच खरे. मात्र, सर्व कलह परवडले तरी गृहकलह वेदनादायक असतो. पवार यांना हे माहित होतेच, आता अनुभव आलाय..”
“विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार