HomeArchiveरसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी...

रसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी हजारो तरूणांची शिवाजी पार्कवर गर्दी

Details
रसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी हजारो तरूणांची शिवाजी पार्कवर गर्दी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

आज किसानदिनानिमित्त आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि रासायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे मानवी आरोग्य कसं धोक्यात आलं आहे, याची समाजाला जाणीव करून देण्यासाठी अंबागोपाल फाऊंडेशन तसेच टाटा मेमोरीयल हॉस्पिटल यांच्या वतीने “शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर” होश किसान दौडचं आयोजन करण्यात आलं होतं.

सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून सुदृढ जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क येथे ‘होश वॉकेथॉन’चं आयोजन करण्यात आलं होतं. या वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या कॅन्सर पेशंट्ससह खासदार राहुल शेवाळे आणि ‘अंबागोपाल फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी.

दिवसेंदिवस शेतीमध्ये वाढत चाललेला खतांचा वाढता वापर, अन्नभेसळ, भाज्या-फळं ताजी दिसावीत किंवा लवकर पिकावीत म्हणून वापरण्यात येणारी रसायनं या सगळ्यात कुठंतरी माणूसच माणसाचा भक्षक बनत चालला आहे. या सगळ्याला कुठंतरी आळा बसावा याकरीता रविवारी सकाळी “किसान दौड” या जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण 10 हजार लोकांनी तसंच मावळमधील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून वॉकेथॉनमध्ये सहभाग दर्शवला. यासोबतच या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून अंबागोपाल फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश शेट्टी स्वत: उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे, टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यावेळी सिक्कीम राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यदेखील 100 टक्के सेंद्रीय शेती असलेले राज्य करू असा निर्धार हरीश शेट्टी यांनी व्यक्त केला. विषेश बाब म्हणजे यावेळी टाटा हॉस्पिटलमधील गुणवंती संघवी या कँसर पीडितेने कार्यक्रमाचे उद्घाटन करून भेसळयुक्त अन्नापासून दूर राहण्याचा संदेश दिला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content