HomeArchiveयंदाच्या प्रजासत्ताकदिनी बायोजेट...

यंदाच्या प्रजासत्ताकदिनी बायोजेट इंधनाच्या पहिल्या विमानाचे उड्डाण!

Details
यंदाच्या प्रजासत्ताकदिनी बायोजेट इंधनाच्या पहिल्या विमानाचे उड्डाण!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशातील हवाई दलासमोर विविध आव्हानं असूनही कुशल मनुष्यबळाचा वापर करीत नवनवी साहसं करीत असतात. अगदी सियाचीन असो की अरुणाचल प्रदेशातील कमी लांबीच्या धावपट्टीवर अजस्त्र मालवाहू विमान C -17 उतरवणे असो, कोणतीही पूरस्थिती अथवा केदारनाथ प्रलय असो, हे दल जीवावर उदार होऊन शांततेच्या काळातही भारतीयांच्या सेवेसाठी तत्पर असते, ‘अहर्निश सेवा महे’ म्हणाना!

यंदाच्या २६ जानेवारीला राजमार्गावरील पथसंचालनवेळी हवाई कसरतीबरोबरच नेहमीच्या इंधनाऐवजी बायो इंधनाचा वापर करून विशेष उड्डाण हे खास आकर्षण आहे. जैव इंधनाला उत्तेजन देण्यासाठी अजस्त्र मालवाहू AN-32 प्रकारचं विमान दहा टक्के जैव इंधनाचं वापर करून उडवलं जाईल, हे हवाईदल प्रमुख बी. एस. धानोआ यांनी जुलै महिन्यात जाहीर केलं होतं. त्याच्या काही चाचण्या हवाई संशोधन केंद्रातून होत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. हे पहिलं लष्करी विमान असेल जे जैव इंधनाचा उपयोग करून उडवलं जाईल. हा प्रयोग, चाचण्या, डीआरडीओ, हवाई दल, डायरेकटर जनरल अरोनॉटिकल क्वालिटी अश्युरन्स (डीजीएक्यूए) आणि सीएसआयआर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम यांनी एकत्रितपणे आयोजित कलेल्या एका परिसंवादात बोलतांना धानोआ यांनी हे जाहीर केलं. या प्रयोगाने पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार खनिज क्रूड तेलावर असलेलं आपलं अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. २०२१पर्यंत तेल आयात १० % कमी करून खर्चात कपात नी परकीय गंगाजळीची बचत हा हेतू साध्य होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमान संचलनात भारतीय हवाई दलाच्या ३३ विमानांचा नि भारतीय लष्कराच्या हवाई विभागातील चार हेलिकॉप्टरचा समावेश असेल. हवाई दलाची १८ लढाऊ विमानं, आठ मालवाहतूक विमानं आणि ११ हेलिकॉप्टर असा ताफा आहे. हा नयनरम्य परेड प्रकार दोन टप्प्यात होईल. मुख्य पहिला टप्पा Y आकारात साकारला जाईल. याला वाईन ग्लास आकार ही म्हणू शकता. त्यांचं उड्डाण हे राष्ट्रीय तिरंगा ध्वज नि तिन्ही दलाचे झेंडे यासह असेल. त्यामागोमाग चार ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव नि लष्कराचे दोन हत्यारबंद ए एल एच – रुद्र असेल. जमिनीवरील ‘डेअर डेव्हील’ या बुलेट पथकाचं आगमन प्रदर्शन झाल्यावर हवाई उड्डाणाला सुरुवात झालेली असेल. त्यात वायूदलाची एम के IV WSI बनावटीची चार हेलिकॉप्टर सामील होतील.

त्यापाठोपाठ ‘सतलज’ नावाने तीन C- 130 J सुपर हर्क्युलस आणि नव्या प्रयोगाची तीन AN-32 विमानं जी बायो जेट फ्युएल मिश्रित इंधनाची राहतील. दोन SU-30 नेत्र संबोधली जाणारी, ग्लोब मास्टर C-17 अवतरतील. लढाऊ विमानाचा ताफा चित्तथरारक कवायतीसाठी नभांगणात येईल. पाच जग्वॉर बाणाकृती सादर करून निघताच उन्नत मिग-२९, सुखोईतील SU-30 MKI प्रसिद्ध ‘त्रिशूल’ चिन्हाकृती सादर करतील. यात वेगवान गतीनं जमिनीकडे सूर मारत त्याच गतीनं आकाशात झेपावणे अशा कसरती दाखवत राष्ट्रपती नि उपस्थितांसमोर सलामी देतील. जमिनीपासून ६० ते ३०० मीटर उंचीच्या या कसरती असतील. राष्ट्रपती भवनावरून आलेली विमानं इंडिया गेटच्या दिशेनं जातील. जट्रोफा तेलमिश्रित इंधनाच्या विमानाचं नेतृत्त्व स्क्वाड्रन लीडर मेहताब सोंड करतील. नेहमीच्या विमान इंधनात दहा टक्के हे तेल मिसळले जात आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, डेहराडून यांनी हे प्रयोग केलेत. स्क्वाड्रन लीडर गौतम बजाज, विंग कमांडर अरुण चंदन त्यांना साथ देतील. छत्तीसगड बायो डिझेल डेव्हलपमेंट अथोरिटी यांची संशोधनात साथ लाभली.

दरम्यान व्यापारी तत्त्वावर बायो फ्युएलचा वापर करून विमानोड्डाणाचं श्रेय स्पाईस जेट विमान कंपनीला जात. २५ % जट्रोफा तेल आणि उर्वरित नेहमीचं हवाई इंधन याचा वापर करीत २७ ऑगस्टदरम्यान ही चाचणी झाली. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका इथे या चाचण्या झाल्याचा दावा कंपनीने यावेळी केला होता. इंधनाच्या वाढत्या किमती लक्षात घेता पर्यायी मार्ग आवश्यक असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीला लॉस एंजिल्सवरून मेलबर्नला जाण्यास अशा प्रकारच्या पहिल्या विमानाने उड्डाण भरलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बायो फ्युएल धोरण जाहीर केलं असून त्यानुसार वाढता वापर झाल्यास १२ हजार कोटी रुपयांच्या बचतीबरोबरच वातावरणातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content