Details
म्हाडा काढणार मुंबई व उपनगरातील २३८ घरांची लॉटरी!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई व उपनगरातील २३८ घरांची म्हाडातर्फे लॉटरी काढण्यात येणार असून यामध्ये कमी उत्पन्न व उच्च उत्पन्न गटातील लोकांना ही घरे देण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ही लॉटरी काढण्यात येईल, असा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि मुंबई दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर उपस्थित होते.
मुंबई व उपनगरात १०८ व्यावसायिक गाळे आहेत त्यांचीही लॉटरी काढण्यात येणार असून म्हाडाच्या कन्नमवार नगर, टिळक नगर, चेंबूर, टागोरनगर येथे ५६ मोकळ्या जागा आहेत. त्यावर काही लोकांनी एक मजल्याची घरे तसेच झोपडया उभ्या केल्या आहेत. त्यांच्यावर एमआरटीपी कायद्याखाली कारवाई करून जागा मोकळ्या करण्यात येणार आहेत, असे सांगताना चव्हाण यांनी म्हाडाचे अधिकारी याबाबत दुर्लक्ष करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
गोरेगाव पहाडी येथे तसेच मोतीलाल नगर याठिकाणी म्हाडा ७००३ घरे बांधणार आहे. काही जागांवर आरक्षणे आहेत, त्याबाबतीतही संबंधित आधिकाऱ्यांना लक्ष देण्यास सांगितले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.”
“केएचएल न्यूज ब्युरो