Details
मोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना बेघर करणाऱ्यांवर कारवाई करा – नसीम खान
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 800 रहिवाशांना बेघर करू नका. त्यांना संरक्षण द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी मंगळवारी विधानसभेत केली. माहितीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून मगच पुढील कारवाई होईल, असे आश्वामसन दिले.
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 12 सोसायट्यांमध्ये 800 परिवार गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहतात. मूळ मालक 40 वर्षांपूर्वी ही जागा विकून गेला. ते डॉक्युमेंट रजीस्टर झाले नाही म्हणून आता त्या मालकाच्या नातेवाईकांनी या जागेचे अधिकार संचेती बिल्डरला दिले आहेत. ते अधिकारपत्र दिल्याने त्या नव्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकार्यां शी हातमिळवणी करून जागा खाली करा नाहीतर तोडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पाठवल्या आहेत. अशा बेकायदेशीर नोटीसा पाठवणार्याय आणि रहिवाशांना बेघर करू पाहाणार्या2 महापालिकेच्या अधिकार्यां वर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नसीम खान यांनी सभागृहात केली.
सभागृहात हा विषय येण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची दखल घेत आश्वाेसन दिले. सर्व कागदपत्रांची पडताळणी करू आणि माहिती घेऊनच पुढील कारवाई करू असे फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे रहिवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो