HomeArchiveमोबाईलयुक्त यात्रींनो ‘फटक्या’पासून...

मोबाईलयुक्त यात्रींनो ‘फटक्या’पासून सावधान!

Details
मोबाईलयुक्त यात्रींनो ‘फटक्या’पासून सावधान!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
मोबाईल प्रेमात आकंठ बुडालेले आपण आपल्या आजूबाजूला कायं चाललं आहे, काय घडत आहे याच्याशी काहीएक देणघेणं ठेवत नाही. लोकल प्रवासात तर दारावर लटकत असलो तरी कानात हेडफोनच्या दोर्याे घालून आपण आपल्याच धुंदीत राहण्यासाठी मुके-बहिरे होतो. लोकल प्रवासात उभं राहयला जागा नसली तरी मोबाईलचा स्क्रीन खालीवर सरकवत आपल्यातील अनेकांच्या जिवाचा कमालीचा आटापिटा सुरू असतो. याचदरम्यान आपल्यासोबत नेमका आपल्याला अचानक फटका बसतो. या टोळीचं नावही गेल्या काही वर्षांत दहशत माजवत आहे, ती फटका गँग. चड्डी बनियान, दुप्पटा गँगनंतर आता लोकलमध्ये शिरून अथवा लोकलबाहेर दबा धरून मोबाईलवर बोलणार्याग अथवा दरवाजावर लटकणार्या प्रवाशांच्या हातातील ऐवजावर फटका मारणारी ही गँग मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली ते अगदी हार्बर मार्गावर पनवेल, नवी मुंबईपर्यंत प्रवाशांत दहशत माजवत आहे.

आजघडीला प्रत्येक रेल्वेस्थानकांत फलाटांवर व लोकल गाडीतही सीसीटीव्हीचे जाळे असताना या गँगचा कायमचा बंदोबस्त करणे आपले रेल्वे पोलीस, आरपीएफ जवानांना का बरे जमत नसावे? मुंबई ते ठाणे मार्गावरील लोकल प्रवासात आतापर्यंत अनेकांनी याच फटका गँगमुळे आपला जीव गमावला आहे तर अनेकांना आयुष्यभराचं अपंगत्व आलं आहे. मुंबई, ठाण्यात सतर्कतेचा इशारा मिळाल्यानंतरच झुंडीने फिरणारे रेल्वे पोलीस माणसांच्या जिवावर उठलेल्या फटका गँगला आवर घालण्यात ढिलाई का दाखवत आहेत, हा प्रश्न कुणालाही पडावा. रेल्वे पोलिसांकडे या गँगचा अतापता मिळत नाही का? लोकल प्रवासात झुंडशाही, गुंडशाही करणार्याड याच फटका गँगमधील मोबाईल चोरांनी धावत्या लोकलमधून डॉ. अख्तर अली खान यांना ढकलल्याने पाय गमवावा लागल्याची घटना 30 एप्रिल 2019 रोजी हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकात घडली आहे.

मोबाईलला नेटवर्क नसल्याने लोकलच्या दरवाजाजवळ गेलेल्या उत्तर प्रदेशातील डॉ. खान यांना फटका गँगने आपले टार्गेट बनवले. खान फोनवर बोलत असताना रे रोड स्थानकात दोघे जण लोकलमध्ये चढले. त्यातील एकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि खाली उतरून तो पळून गेला. त्याचवेळी त्याच्या दुसर्यार सहकार्याखला अख्तर अली खान यांनी पकडले. स्वत:ची सुटका करण्याचा नादात त्याने खान यांना धावत्या लोकलबाहेर ढकलले. खान हे स्टेशनवर कोसळले आणि उतारावरून सरपटत रूळांवर आले. त्याचवेळी पाठीमागून येणार्यान भरधाव लोकलखाली चिरडून खान यांचा डावा पाय कापला गेला. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेले खान मदतीसाठी जोरजोराने ओरडून याचना करत होते. त्यांना कुणीतरी रूग्णालयापर्यंत न्यावे अथवा पोलिसांना कळवावे. पण त्याउलट असंवेदनशील मोबाईल प्रवासी त्यांचे फोटो काढण्यात व व्हीडिओ बनवण्यात मग्न होते.

मुंबईत गेल्या काही वर्षांत अशा असंख्य घटना घडत आहेत. तेथे माणूसपण हरवलेल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडत आहे. दुसर्यां च्या मदतीसाठी कायम धावून जाणारा मुंबईकर इतका माणुसकीशून्य कसा होऊ शकतो? डॉ. अख्तर अली खान यांना लोकल प्रवासात बसलेला हा फटका आपल्यापैकी कुणालाही बसू शकतो. इतपत मुंबईचा मोबाईलयुक्त लोकल प्रवास असुरक्षित झाला आहे? मुंबई उपनगरीय लोकल सेवेत 2012 ते 2018 पर्यंत 22,920 मोबाईल फोन चोरीच्या आणि फटका मारून मोबाईल पळवल्याच्या घटना घडल्या आहेत. फेब्रवारी 2018 मध्ये द्रविता सिंह या कॉलेज तरूणीला याच फटका गँगमुळे जबर दुखापत झाल्याने कायमचे अपंगत्व आले. सँडहर्स्ट रोड रेल्वेस्थानकात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने लोकलच्या दाराशी बोलत असलेल्या द्रविताच्या हातावर व डोक्यावर चोरट्याने बांबूचा जोरदार फटका मारला. यामध्ये द्रविताच्या हाताची बोटे निकामी झाली तर उजवा पायालाही गंभीर दुखापत झाली. या जबर मानसिक धक्क्यातून सावरण्याचा ती प्रयत्न करत आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकलने सीएसएमटीकडे निघालेल्या दव्रितावर असा प्रसंग ओढवेल, अशी कल्पना तरी तिच्या मनात डोकावली असेल? या आघातावर द्रविताने जिद्दीने मात केली. मात्र मुंबईत दररोज सकाळ, संध्याकाळ जीव मुठित धरून लोकल प्रवास करणार्या अशा असंख्य द्रवितांना रेल्वे पोलीस आणि इथली यंत्रणा कधी व कोणती सुरक्षेची हमी देईल?

देशाच्या सर्व राज्यांतील लोक आधारकार्डप्रमाणे मुंबईत रोजीरोटीसाठी दररोज दाखल होत असले तरी या मुंबईच्या व मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी करणारे सरकार वगैरे आहे का, हा जाब आजही झोपेच सोंग घेऊन बसलेल्या तमाम मुंबई, ठाणे व वसई विरारकरांनी मतांचा जोगवा मागण्यासाठी त्यांच्या दारावर येणार्याी लोकप्रतिनिधींना विचारावा. ऑगस्ट 2018 मध्ये प्रतिभा त्रिपाठी या 58 वर्षीय महिलेला मोबाईल चोरांच्या फटका गँगचा फटका बसला होता. मशिद आणि सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान लोकलच्या महिला डब्यात शिरलेल्या चोरट्यांनी या महिलेकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला होता.

ठाणे लोकल ट्रेनने प्रवास करत असाल तर फटका गँगपासून सावधान राहा, असे आवाहन आपण नेहमीच ऐकत असतो. 19 ऑगस्ट 2018च्या मध्यरात्री नाशिकहून मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दिवा येथे आलेला चेतन अहिरराव हा तरूणही याच फटका गँगचा बळी ठरला. 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.54 वाजता सीएसटीएमहून कल्याणच्या दिशेने जाण्यार्या1 लोकलच्या दरवाज्यात फोनवर बोलणार्यार चेतनच्या हातावर मोबाईल चोराने फटका मारला. यात चेतनचा तोल गेल्याने तो धावत्या लोकलमधून कळवा स्थानकात पडल्याने चेतनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणात आरोपीला अटक झाली असली तरी चेतनचा गेलेला जीव आता परत येईल का? त्यामुळे कधीही, केव्हाही आणि कुठेही या फटका गँगचा फटका दररोज लाखोंच्या संख्येने लोकल प्रवास करणार्या मुंबई, ठाणेकरांना बसू शकतो.”
 
“विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content