Details
मोदी है तो मुमकीन है!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
“मोदी है, तो सब मुमकीन है!” हे आता भारतीय जनता पक्षाच्या प्रचार मोहिमेचे ब्रीदवाक्य तर झालेच आहे. पण मोदींच्या धडक, बेधडक स्वभावामुळे त्यांनी सैन्य दलांना तसेच संरक्षण सिद्धता यंत्रणेलाही जो आत्मविश्वास मिळवून दिला आहे त्यामुळे यापुढे, “मोदी है तो अवकाशमे भी.. सब मुमकिन है!” अशा नव्या उद्घोषणेलाही मान्यता मिळायला हरकत नाही. याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आणखी एक सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पहिला सर्जिकल स्ट्राईक त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या अतिरेक्यांच्या छावण्यांवर २०१६ मध्ये केला. भारतीय लष्कराची तुकडी रात्रीच्या अंधारात पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसली व तीन अतिरेकी तळांवर भारतात घुसण्याच्या तयारीत असणाऱ्या पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांचा खात्मा करून सुखरूप भारतीय हद्दीत परतली.
ऊरीमध्ये त्याआधी पाक पुढाकाराने घडलेल्या झालेल्या अतिरेकी हल्ल्याला ते खणखणित उत्तर होते. “हाऊ इज द जोश” हा पाकला दणका होता. पण त्यातून शहाणपण न शिकलेल्या या खोडकर शेजाऱ्याला दुसरा हादरवणारा, दचकवणारा दणका पंतप्रधान मोदींनी गेल्या महिन्यात हाणला. भारतीय केंद्रीय सुरक्षा जवानांच्या तुकडीवर पाक पुरस्कृत जैश ए मुहंमदच्या अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ला पुरवामा इथे घडवला. त्या घटनेला दहा-बारा दिवस होत असतानाच भारतीय लढाऊ विमानांनी पुन्हा पहाटेच चढाई केली आणि पाकिस्तानच्या मुख्य भूमीत, डोंगरदऱ्यात वसलेल्या बालाकोट या, जैशच्या प्रशिक्षण तळावर अचूक महास्फोटक अशा स्मार्ट बाँबचा मारा केला. त्यात किमान तीनशे दहशतवादी तसेच त्यांचे प्रशिक्षक व नेतृत्त्व करणारे जैशचे कमांडर व म्होरके ठार झाले. हे आता सर्वमान्य झाले आहे. 26 फेब्रुवारीच्या त्या रात्री त्या टेकड्यांमध्ये किमान तीनशे मोबाईल फोन सुरू होते व बाँबहल्ल्यानंतर ते सारे फोन थंड पडले, हे पुढे आले. त्या अतिरेकी तळावरचा नवा प्रशिक्षणाचा कर्यक्रम दोनच दिवस आधी सुरू झाला होता याचे पुरावे पुढे आले आहेत.
बालाकोटच्या टेकड्यांमध्ये अतिरेक्यांचा मोठा अड्डा होता हे तिथल्या स्थानिक लोकांनी परदेशी पत्रकारांना सांगितले आहे. त्या तळाची उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे प्रकाशित झाली आहेत. त्या तळाच्या परिसरातील बालाकोट गावामधून तीस-पस्तीस अँब्युलन्स त्यारात्री तळाकडे धावल्या हे पुढे आले आहे. इतके सारे परिस्थितीजन्य पुरावे जैशला किती मोठा दणका बसला याचेच प्रत्यंतर देतात. त्या घटनेला एक महिना पूर्ण होत असतानाच मोदींनी ऑपरेशन अंतरिक्ष शक्ती, याची घोषणा केली असून त्यायोगे भारतीयांची मान जगात आणखी ताठ झाली आहे. देशाच्या एका कोपऱ्यातून उडवलेल्या क्षेपणास्त्राने अवकाशात थेट तीनशे किलोमीटरची झेप घेतली आणि अवघ्या तीन मिनिटांतच एक फिरता उपग्रह गारद करून दाखवला हे अतिशय मोठे व अत्यंत अभिमानास्पद असे काम होते. या उपग्रह नष्ट करण्याच्या मोहिमेचे महत्त्व मोठे आहे. जगातील फक्त तीन राष्ट्रांनी ती क्षमता याआधी मिळवली होती. त्यात अमेरिकेकडे पन्नास वर्षांहून अधिक काळ हे तंत्रज्ञान होतेच. पण चीनने 2007 मध्येच ती क्षमता मिळवली. रशियाने 2015 मध्ये उपग्रह नष्ट करण्याच्या तंत्रावर हुकूमत सिद्ध केली. भारत हा जगातील असे तंत्रज्ञान मिळवणारा फक्त चौथा देश आहे.
अवकाश तंत्रज्ञानात भारताने मोठी झेप घेतली आहे. 1960 मध्ये भारतीय अवकाश संशोधन केंद्राची इस्त्रोची स्थापना पंडित नेहरूंच्या प्रेरणेमधून झाली. तर 1980 च्या दशकात क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा विकास सुरू झाला. भारताने या साऱ्या क्षेत्रात केवळ स्वबळावरच प्रगती साधलेली आहे. संपूर्णतः देशी बनावटीच्या तंत्रज्ञानामुळे भारताची अवकाश मोहीम ही अन्य देशांतील अशा मोहिमांच्या तुलनेत स्वस्त दरात साध्य झाली. हे भारतीय वैज्ञानिकांच्या कौशल्याचे, बुद्दीसामर्थ्याचे व कष्टाचे यश होय असे अभिमानाने नमूद करावे लागेल. अवकाश संशोधनाला लष्करी सामर्थ्याचीही एक बाजू असतेच. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेने, डीआरडीओने, इस्त्रोच्या हातात हात घालून अग्निबाण व क्षेपणास्त्रांचे तंत्र हस्तगत केले. भारताचे प्रमुख अणुशास्त्रज्ञ व भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हेही डीआरडीओचे नेतृत्त्व काही काळ करत होते. अनेक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, वैज्ञानिक अशांनी गेल्या तीन-चार दशकात जे भरीव काम केले त्याचाच परिपाक म्हणजे भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम होय.
डीआरडीओने पोखरणमध्ये 1974 मध्ये तसेच 1998 मध्ये दोन अणुस्फोट घडवले. पोखरण दोन या मोहिमेचे नावही ऑपरेशन शक्ती असेच होते. त्यात भारताने लहान क्षमतेचे हायड्रोजन बाँबचे स्फोट घडवले. विविध क्षमतेच्या पाच फ्युजन बाँबचे स्फोट घडवून भारताने अणु तंत्रज्ञानातील आपल्या प्रगतीची चुणूक जगाला दाखवली. अशा चाचण्यांची गरज काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसाच तो आताही उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर विचारला जातोच आहे. पण अण्वस्त्र असेल वा उपग्रह भेदनाचे असेल हे सारेच तंत्रज्ञान अतिशय गुंतागुंतीचे आहे. त्यातील बारीक चूकही क्षम्य असू शकत नाही. केवळ कागदावर वा प्रयोगशाळेत त्यांच्या चाचण्या होऊ शकत नाहीत. प्रत्यक्षात असे स्फोट घडवल्याशिवाय शास्त्रज्ञांना व देशालाही विश्वास वाटू शकत नाही. मात्र असे निर्णय घेणे हे धाडसी व तितक्याच मोठ्या व्यक्तिमत्वाच्या नेत्यांनाच जमू शकते. लेच्यापेच्या नेत्यांचे ते कामच नाही. भारताचे दोन्ही अणुस्फोट व आताचे उपग्रह विध्वसांचे तंत्र यात एक मोठेच साम्य आहे, ते नेतृत्त्वाचे. या तीन्ही वेळी देशाचे नेतृत्त्व करणारी व्यक्तिमत्त्वे कणखर म्हणूनच प्रसिद्ध होती व आहेत.
1974 मध्ये इंदिरा गांधींच्या हाती देशाचे नेतृत्व्उ होते. “केंद्रीय मंत्रिमंडळातील एकमेव पुरुष!” असे त्यांचे यथार्थ वर्णन व्यंगरेषांमधून विख्यात चित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी केले होते. एकाचवेळी तरल मनाचे कवी आणि राजकीय नेता म्हणून चतूर व कणखऱ असे अटल बिहारी वाजपेयी १९९८ मध्ये देशाचे नेतृत्त्व करत होते. मोदींनी कालच्या उपग्रह भेदक अग्निबाणाच्या चाचण्यांचे आदेश दिले त्यातही तेच धाडस व तोच कणखर नेतृत्त्वाचा स्पर्श होता. माधवन नायर, व्ही. के. सारस्वत अशा डीआरडीओ व इस्त्रोच्या माजी प्रमुखांनी तसेच या क्षेत्रातील अन्य सर्वमान्य तज्ज्ञांनी सांगितलेच आहे की अशा चाचण्यांचे निर्णय हे राजकीयच असू शकतात. डीआरडीओ वा इस्त्रोचा कारभार सर्वोच्च केंद्रीय नेतृत्त्वाच्याच इशाऱ्यावर चालत असतो. अशा चाचण्यांना शेकडो कोटींचे खर्चाचे कलमही असते. तो खर्च केंद्र सरकारचे प्रमुख मान्य करतात तेव्हा चाचण्यांची तयारी सुरू होऊ शकते. अशा चाचण्यांना संरक्षणविषयक तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनेक कक्षा व पैलू असतात. त्यावर संबंधित विभाग वा शास्त्रज्ञ नाही तर केंद्रीय मंत्रिमंडळाची संरक्षण व सुरक्षाविषयक उपसमिती व थेट पंतप्रधान हेच निर्णय करतात. पोखरणच्या दोन्ही स्फोटांची माहिती देशाला देण्याचे काम पंतप्रधानांनीच केले होते. भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अवकाशात गेला तेव्हा अन्य कुणी विभागप्रमुखांनी नाही तर पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधींनी त्याच्याशी संवाद साधला होता. याहीवेळी ती जबाबदारी पंतप्रधानांचीच होती व ती त्यांनी पार पाडली. आता सारा प्रश्न उभा राहिला आहे तो देशात सुरू असणाऱ्या निवडणुकांमुळे. या चाचण्यांचा राजकीय फायदा भाजपाला होईल का? त्यांची मते वाढतील का? ही भीती विरोधकांच्या पोटात आहेच. त्यातून सरकारवर टीका सुरू झाली आहे.
दुसरा मुद्दा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग मोदींनी देशाला उद्देश्यून केलेल्या भाषणामुळे झाला आहे का? काँग्रेसचे म्हणणे “हे तंत्रज्ञान आमच्याच राजवटीत विकसित झाले होते. फक्त चाचण्या घेण्याचे काम बाकी होते. ते काम मोदींनी २०१५ वा २०१६ मध्ये का केले नाही? त्यांनी मुद्दाम २०१९ ची निवडणूक सुरू होण्याची वाट पाहिली का?” यातील पहिला भाग खरा आहे. दुसरा खोटा आहे. २०१० पासून डीआरडीओ एकेक पायरी पार करत होती. २०१२ मध्ये व्ही के. सारस्वत डीआरडीओचे प्रमुख असताना त्यांनी तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह सरकारकडे परवानगी मागितली. चाचण्या घेणे हा राजकीय व देशस्तरावरचा महत्त्वाचा निर्णय होता. तो सारस्वत घेऊच शकत नव्हते. ती परवानगी त्यांना २०१२ सरकारने दिलीच नाही. २०१४ मध्ये नवे सरकार आल्यानंतर त्यांनी अन्य खात्यांप्रमाणेच डीआरडीओचा व इस्त्रोचाही आढावा घेतला. त्यांनी अशा चाचण्यांची तयारी करण्याचे आदेश दिले. आदेश दिले म्हणजे लगेच चाचण्या घेता येतात असेही नाही. बंदुक उचलायची, नेम धरायचा व गोळी झाडायची इतका हा सोपा प्रयोग नक्कीच नव्हता. उपग्रह ही अतिशय वेगाने फिरणारी व अतिशय लहान आकाराची वस्तू असते. तिचा वेध जमिनीवरून घेऊन ती नष्ट करण्याचे गणित भरपूर गुंतागुंतीचे असते. सर्व गोष्टींची माडणी, जुळणी करण्यात दोन वर्षे गेली. मागच्या सहा महिन्यांत या मोहिमेची प्रत्यक्ष तयारी सुरू झाली. तीनशे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ दिवसरात्र या मोहिमेत कम करत होते. ज्याचा वेध घेऊन भेद करण्यात आला तो उपग्रह २४ जानेवारीला अवकाशात सोडण्यात आला. या मायक्रोलाईट उपग्रहाचा वेध घेणाऱ्या अग्निबाणाचे वजन होते १८ टन. उपग्रह ९० मिनिटांत पृथ्वी प्रदक्षिणा करत होता तर तो भारताच्या भूमीवर फक्त दहा मिनिटेच दिसत होता. त्याचा वेग ताशी २७०० किलोमीटर इतका प्रचंड होता. अवघ्या दोन सेकंदात त्याची व अग्निबाणाची टक्कर होणार होती. काळ-काम-वेगाचे गणित सेकंद व सेंटीमीटरपर्यंत नेमके जुळणे अत्यावश्यकच होते. ते कौशल्य आपल्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले.
बालासोरच्या अग्निबाण प्रक्षेपण केंद्रातून उडाल्यापासून आकाशात २७४ कितलोमीटर उंचावरील उपग्रहाचा नेमका लक्ष्यभेद अवघ्या तीन मिनिटांतच केला गेला. पण त्या तीन मिनिटांनी अनंत काळासाठी भारताला गौरवाचे स्थान मिळवून दिले आहे. मोदींवरची टीका ही त्याचसाठी व्यर्थ ठरते. दुसरा मुद्दा निवडणूक आचारसंहितेचा. पण सत्ताधीशांनी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करून आपला पक्षीय प्रचार करू नये इतकीच आचारसंहितेची अपेक्षा आहे. मोदींनी दूरदर्शन वा आकाशवाणीच्या यंत्रणेचा वापर देशाशी संवाद साधण्यासठी केलाच नाही. त्यांनी नमो टीव्ही या युट्यूब चॅनेलचा वापर केला आणि ट्वीटरवरून आपल्याला काहीतरी महत्त्वाची घोषणा करयाची आहे हे जाहीर केले. या दोन्ही बाबी आचारसंहिताभंगाच्या ठरू शकणार नाहीत. मोदी, “मेरे प्यारे देशवसियों” असा संवाद पुन्हा एकदा साधणार आहेत या बातमीमुळे मात्र तासभर गोंधळ उडाला. मोदी पाकवर हल्ला करणार असे काहींना वाटले. याआधी एकदाच त्यांनी देशाशी असा संवाद साधला होता तो, २०१६ च्या नोव्हेंबरमध्ये, नोटबंदीची घोषणा करतेवेळी. त्यामुळे त्याची आठवण अनेकांना झाली. “मोदीजी, कुछतो हिंट देदो, बंकर की तरफ भागे या एटीमएम की तरफ?” असे विनोदही समाजमाध्यमांतून व्हायरल झाले. शेअर बाजाराची झोप उडाली. पण त्या साऱ्या शंकाकुशंका विफल ठरल्या आणि एक अभिमानस्पद बातमी मोदींनी देशाला दिली. त्याचीच चर्चा पुढे सुर राहणार आहे हेही खरे!”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी