Details
मोडी लिपी स्पर्धेचे निकाल जाहीर
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोडी लिपी स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून शीघ्र मोडीलिपी लिप्यंतर स्पर्धेत मधुकर खाडीगावकर यांना तर सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धेत भाऊराव घाडीगावकर यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
शीघ्र मोडिलिपी लिप्यंतर स्पर्धेत भाऊराव घाडीगावकर आणि रिद्धी गुरव यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाले आहेत. मधुकर खाडीगावकर व पंकज भोसले यांना सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. विजेत्यांचे अभिनंदन स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी केले आहे. राजेश खिलारी तसेच सुहास पटवर्धन यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.”
“केएचएल न्यूज ब्युरो