Details
मोडक वाघ पुरस्कार जाहीर!
01-Jul-2019
”
आनंद निकेतन, सुचिता सोळंके मानकरी
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
पद्मभूषण ताराबाई मोडक पुरस्कार – २०१९ साठी आनंद निकेतन (नाशिक) या संस्थेची आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार – २०१९ साठी सुचिता सोळंके (कारंजा- वाशिम) यांची निवड झाल्याची घोषणा नूतन बालशिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांनी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन केलेल्या नूतन बालशिक्षण संघ या संस्थेच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया रचणाऱ्या देशाच्या बालशिक्षणतज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक व त्यांना सावलीची साथ देणाऱ्या समाजसेविका पद्मश्री अनुताई वाघ यांचे कार्य सर्वश्रूत आहे व मागास समाज पूर्वप्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये या भूमिकेतून त्यांनी आधीच्या ठाणे नि आताच्या पालघर जिल्ह्यातील डहाणूसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात मोठे योगदान दिले. अंगणवाडीच्या जनक ताराबाई यांनी अनुताईंच्या साथीने डहाणू तालुक्यातील कोसबाड टेकडीवरून केलेले शिक्षणाचे प्रयोगही सर्वपरिचित आहेत. त्यांच्या कार्यामुळे शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींना प्रेरणा मिळत असते. त्यांच्या या गौरवशाली कार्याचा वारसा त्यांच्यानंतरही संस्था पुढे चालवित आहे. त्यांच्यापासून स्फूर्ती आणि उर्जा घेऊन शिक्षण क्षेत्रात अशाच प्रकारचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा गौरव करून त्यांचे कार्य सर्वदूर पोहोचावे व त्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच शिक्षण क्षेत्राला ऊर्जा मिळावी या हेतूने पुरस्कार दिले जातात.
संस्थेतर्फे पद्मभूषण ताराताई मोडक यांच्या १२५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून सन २०१७ पासून ताराबाईंच्या स्मरणार्थ एक संस्था व पद्मश्री अनुताई वाघ यांच्या स्मरणार्थ एक व्यक्ती यांना प्रत्येकी २५ हजार रूपये आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येते. दरवर्षी ताराबाईंच्या जयंती दिनी १९ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही माहिती देण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार तथा झी २४ तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक विजय कुवळेकर आणि मॉर्डन कॉलेज (पुणे) चे माजी प्राचार्य अनंत गोसावी यांच्या २ सदस्यीय निवड समितीने पुरस्कारार्थीची निवड करण्याची जबाबदारी पार पाडली.
पुणे येथे २०१७ मध्ये पार पाडलेल्या कार्यक्रमात प्रमोद देशमुख संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी (नांदेड) या संस्थेस पद्मभूषण ताराबाई मोडक पुरस्कार व वामनराव अभ्यंकर (पुणे) यांना पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून मीना चंदावरकर व प्रा.मीनाताई गोखले उपस्थित होत्या. मुंबई येथे २०१८ मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात सरस्वती मंदीर ट्रस्ट (ठाणे) या संस्थेस पद्मभूषण ताराबाई मोडक पुरस्कार व रेणू राजाराम दांडेकर (दापोली) यांना पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. विजया वाड व प्रा. डॉ. वीणा सानेकर प्रमुख पाहूणे उपस्थित होते.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यात
सदर २०१९ च्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन सहयोग मंदीर हॉल, घंटाळी (ठाणे) येथे सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.
पुरस्कारार्थींची संक्षिप्त माहिती
नाशिकच्या आनंद निकेतनमधून अहिंसक, समता, न्याय व शाश्वत समाजाच्या निर्मितीसाठी पारंपरिक गुण स्पर्धेला फाटा देऊन परसबाग आणि दैनंदिन व्यवहाराचे शिक्षण दिले जाते. श्रम आधारीत अनुभवातील शिक्षण देण्यावर भर देणारी आनंद निकेतन ही शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशाळा म्हणून नावाजलेली असून ती पाहण्यास पालक मुलांसह आवर्जून भेट देतात. सुचिता सोळंके यांना उपक्षिेत फासेपारधी समाजात जन्माला आल्यानं गरीबीमुळे ७ वी पर्यंतचे शिक्षण घेता आले. मात्र, त्याने हार न मानता हिंमत धरून त्यानंतर फासेपारधी मुलांसाठी झाडाखाली अंगणवाडी सुरू करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. समाजासाठी सर्व स्तरातून केलेल्या प्रयत्नांतून सुचिता यांना गावच्या सरपंच होण्याचा मानदेखील मिळाला होता अशी माहिती चंद्रगुप्त पावसकर यांनी दिली.”
“आनंद निकेतन, सुचिता सोळंके मानकरी