HomeArchiveमृत्यूचे निमंत्रक

मृत्यूचे निमंत्रक

Details
मृत्यूचे निमंत्रक

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
गेल्या तीस वर्षांत आम्ही अनेकदा मुंबई-डोंबिवली प्रवास मोटारने केला आहे. गेल्या तीन दशकांत या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड वाढली आहे. विशेषत: शिळफाटा आणि आसपासच्या परिसरात मोठमोठे टॉवर उभे राहिले आहेत. शिवाय मॉलसंस्कृतीदेखील आली आहे. त्यामुळे वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कल्याण आणि बदलापूरवरून नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईला जाणारे लोक कल्याण-शिळफाटा मार्गाचा वापर करतात. साहजिकच हा फाटा सदैव गजबजलेला असतो. याच फाट्यावर गेल्या रविवारी राज्यस्तरीय कॅरमपटू जान्हवी मोरे ही ट्रकखाली चिरडून ठार झाली.

जान्हवी ही गुणी खेळाडू होती. लवकरच ती राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत सहभागी होणार होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार होती. पण गेल्या रविवारी ही 20 वर्षीय तरूणी कायमची आपल्याला सोडून गेली. तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळेच `मृत्यूचे निमंत्रक’ कसे मोकाट सुटले आहेत हे दिसून आले. कोण आहेत हे मृत्यूचे निमंत्रक? अर्थात कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस. शिळफाटा परिसरातील वाढलेली लोकसंख्या पाहता तेथे पादचारी पूल अथवा भुयारी रस्ते बांधणे अत्यावश्यक आहे. पण गेल्या अनेक वर्षांत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. लोढासारख्या बड्या बिल्डरचे टॉवर तेथे उभे राहत असताना त्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची चिंता लोढानेदेखील केलेली दिसत नाही. महापालिकेची वाट न पाहता या बिल्डरने जरी भुयारी मार्ग बांधले असते तर शिळफाट्यावर वेळोवेळी मृत्यूला निमंत्रण मिळाले नसते.

या परिसरातील लोकसंख्या गेल्या काही वर्षांत पाच लाखांनी वाढली आहे. विशेषत: गेल्या दहा वर्षांत ही प्रचंड वाढ झाली आहे. पूर्वी हा रस्ता निर्जन होता. तेथे रहदारी कमी होती. पण आता मात्र तेथे 24 तास वाहतूक असते. मात्र वाहतूक पोलीस आपले कर्तव्य नीट बजावताना दिसत नाही. दुर्दैवी जान्हवी हिचा बळीदेखील एका वाहतूक पोलिसाच्या निष्काळजीपणामुळे गेला. तिला झालेला भीषण अपघात पाहणाऱ्यांनी सांगितले की, एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकला तेथील ट्रॅफिक पोलिसाने थांबण्याचा इशारा केला. तो ट्रक ड्रायव्हर वेग कमी करून गाडी थांबविण्याच्या तयारीत होता. पण इतक्यात त्या ड्यूटीवरील पोलिसाने बेफिकीरपणे दुसरीकडे मान वळविली. कदाचित तो दुसरे एखादे `सावज’ शोधत असावा. या संधीचा फायदा उठवून त्या ट्रक ड्रायव्हरने पळून जाण्यासाठी ट्रक भरधाव सोडला. तो सरळ जान्हवीच्या अंगावर गेला.

सारांश, त्या दिवशी ड्यूटीवर असलेला तो पोलीस हवालदार `मृत्यूचा निमंत्रक’ ठरला. मुंबई अथवा आसपासच्या वाहतूक व्यवस्थापनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक ठिकाणचे वाहतूक सिग्नल नीट काम करत नसतात. ड्यूटीवर असलेले पोलीस एका कोपऱ्यात उभे असतात. त्यांच्यासमोर अनेक दुचाकी स्वार, मोटार चालक आणि ट्रक चालक सिग्नल तोडून जातात. पण पोलीस त्यांना अडवत नाहीत. शिळफाट्यावरील सिग्नलदेखील अनेकदा बंदच असतो. त्यात जवळच टोलनाका असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढते. पण याचा ना महापालिका प्रशासन विचार करत, ना वाहतूक पोलीस. एखाद्याचे बहुमोल प्राण गेल्यानंतरच या यंत्रणा जाग्या होतात. मग पुढील काही दिवस वेगाने उपाययोजना केल्या जातात. पण नंतर पुन्हा `येरे माझ्या मागल्या’ असे चित्र दिसते. पुन्हा कधीतरी अपघात होतो, पुन्हा कुणाचा तरी बळी जातो. पण `मृत्यूचे निमंत्रक’ मात्र ढीम्म असतात. काय म्हणावे या चांडाळाना!”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content