HomeArchiveमुंब्र्यात कब्रस्थानला आणखी...

मुंब्र्यात कब्रस्थानला आणखी जागा उपलब्ध करा – हाजी अरफात शेख!

Details
मुंब्र्यात कब्रस्थानला आणखी जागा उपलब्ध करा – हाजी अरफात शेख!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मुंब्र्यात लवकरच अत्याधुनिक कत्तलखाना आणि उर्दूघर

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या अंत्यविधीचे सोपस्कार योग्य पद्धतीने व्हावेत, तो मानवी अधिकाराचा भाग आहे, असे मत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी व्यक्त केले.

गुरूवारी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील कब्रस्तानला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मुंब्रा येथील मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी एमएम व्हॅली येथील नवीन कब्रस्तानबद्दल तक्रारी करत सदर कब्रस्तान दफन करण्यास योग्य नसल्याचे सांगितले होते. आज स्वतः आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात यांनी या कब्रस्तानला महापालिका अधिकाऱ्यांसह भेट देऊन तेथील माती जेसीबीने बाहेर काढून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ठाणे पालिका आयुक्त, कार्यकारी अभियंता यांची पाठ थोपटत त्यांच्या कामाचे कौतुकही केले. याच जागेत आणखी दोन ते चार फूट भराव टाकावा, महिलांसाठी बसण्यासाठी योग्य जागा, ज्यावर छत्र आणि वझु करण्यासाठी योग्य व्यवस्था असावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मुंब्रा शहरांमध्ये वेगाने सुरू असलेल्या नागरीकरणाच्या तुलनेत अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्मशानभूमींची संख्या फारच तोकडी पडू लागली असून नागरी सुविधांचा महत्त्वाचा भाग असलेली ही व्यवस्था अपुरी पडू लागल्याचे वास्तव ठाणे महापालिकेस उशिरा का होईना लक्षात येऊ लागले आहे. मुंब्रा-कौसा भागातील जुन्या कब्रस्तानमध्ये भराव टाकून तेदेखील सुरू करत आणखी एखादा प्लॉट देण्यात यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली.

अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांच्या दौऱ्यावेळी तांबोळी समाजाने निवेदन देत मुलींसाठी वसतिगृहाची मागणी केली. तीदेखील लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन हाजी अरफात शेख यांनी कासीम तांबोळी यांना दिले. लवकरच मुंब्र्यात उच्च दर्जाचे स्लॉटर हाऊसदेखील तयार करणार असल्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले. या दौऱ्यात ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, प्लानिंग एक्सिक्युटिव्ह श्रीकांत देशमुख, कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी, शरीफ देशमुख, सरफराज अहमद, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या रिदा रशीद समवेत स्थानिक मुस्लिम समाज मोठया संख्येने उपस्थित होता.”
 
“मुंब्र्यात लवकरच अत्याधुनिक कत्तलखाना आणि उर्दूघर

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content