HomeArchiveमुंबई म्हाडाच्या २७६...

मुंबई म्हाडाच्या २७६ गाळ्यांसाठी अर्जनोंदणीस सुरूवात!

Details
मुंबई म्हाडाच्या २७६ गाळ्यांसाठी अर्जनोंदणीस सुरूवात!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
म्हाडा मुंबई मंडळाच्या वतीने विविध गृहनिर्माण प्रकल्पातील २१७ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी, अर्ज करणे, या प्रक्रियेचा शुभारंभ मुंबई म्हाडा मंडळाचे सभापती, मधु चव्हाण यांच्या हस्ते तर मंडळांतर्गत दुकानांच्या गाळ्यांचे ई लिलावसाठी अर्ज करण्याचा शुभारंभ कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला.

वांद्रे येथील गृहनिर्माण भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते. म्हाडा मुंबई मंडळाची सदनिका सोडत २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात होणार आहे. यासंदर्भातील माहिती पुस्तिका व अर्जाचा नमुना म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबई व कोकण मंडळातर्गत दुकानांच्या गाळ्यांचा लिलाव ८ एप्रिलला सकाळी ११ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

मुंबई मंडळातील सोडतीकरिता अर्जदारांची नोंदणी व अर्ज करण्यासाठी ७ मार्चला दुपारी २ वाजल्यापासून १३ एप्रिल रात्री ११.५९ पर्यंत मुदत राहील. एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम ७ मार्च ते १३ एप्रिलदरम्यान बँकेत भरता येईल. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारा अनामत रक्कम ७ मार्च ते १३ एप्रिल रात्री ११.५९ पर्यंत भरता येईल.

सदनिका सोडतीत अल्प उत्पन्न गटांसाठी सहकार नगर-चेंबूर येथील १७० सदनिका तर मध्यम उत्पन्न गटांसाठी सहकार नगर-चेंबूर, कोपरी-पवई येथील ४७ सदनिकांचा समावेश आहे. या सर्व सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मधु चव्हाण यांनी केले आहे.

ई लिलावात म्हाडा मुंबई मंडळातर्फे प्रतीक्षा नगर, सायन, न्यू हिंद मिल – माझगाव, विनोबा भावे नगरसह स्वदेशी मिल-कुर्ला, तुर्भे-मंडाले-मानखुर्द, तुंगा पवई, गव्हाणपाडा-मुलुंड, मजासवाडी-जोगेश्वरी, शास्त्रीनगरसह सिद्धार्थ नगर-गोरेगाव, चारकोप, मालवणी-मालाड येथील २०१ गाळ्यांचा समावेश आहे. कोकण मंडळांतर्गत विरार बोळींज, वेंगुर्ला येथील सदनिकांचा समावेश असल्याचे मधु चव्हाण व बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

दुकानांच्या गाळ्यांच्या ई लिलावासाठी ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ई लिलाव संकेतस्थळावर नोंदणी अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे व अनामत रक्कम भरता येईल. २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून ई लिलाव (ऑनलाइन बोली) सुरू होणार असून ५ एप्रिलला दुपारी २ वाजेपर्यंत ई लिलावासाठी मुदत देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content