Details
मुंबईत आता रस्ता ओलांडण्यासाठी सरकता जिना!
01-Jul-2019
”
खासदार राहुल शेवाळेंच्या संकल्पनेतील प्रकल्पाचे भूमिपूजन
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या रस्ते वाहतुकीत क्रांती घडविणाऱ्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा सायन येथे नुकताच पार पडला. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सुकर व्हावे, यासाठी सायनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सरकते जिने लावण्यात येणार आहेत. खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाने मुंबईची रस्ते वाहतूक खरोखरीच ‘हायटेक’ होणार, यात शंका नाही.
मुंबईतील सायन-ट्रॉम्बे रस्ता हा विनासिग्नल व्हावा आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सुकर व्हावे, या हेतूने खासदार राहुल शेवाळे यांनी शहरातील 5 ठिकाणी सरकत्या जिन्यांचा फूटओव्हर ब्रिज करण्याची संकल्पना सर्वप्रथम मांडली. याचच एक भाग म्हणून सायन येथील फूटओव्हर ब्रिजच्या कामाचा भूमिपूजन सोहळा खासदार राहुल शेवाळे, भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांच्या हस्ते पार पडला.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी 2 कोटी 62 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असून येत्या दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यामुळे सायन रूग्णालयाजवळच्या सिग्नलची गरज भासणार नाही आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोयीचे होणार आहे. मुंबईला खऱ्या अर्थाने हायटेक करण्यासाठी शिवसेना-भाजपा सातत्याने प्रयत्नशील आहे. वाहनांना विनासिग्नल प्रवास करता यावा आणि पादचाऱ्यांना सहजरित्या फूटओव्हर ब्रिज ओलांडता यावा, यासाठी हा हायटेक प्रकल्प अतिशय महत्त्वाचा ठरेल, से शेवाळे म्हणाले.”
“खासदार राहुल शेवाळेंच्या संकल्पनेतील प्रकल्पाचे भूमिपूजन