Details
मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत – मधु चव्हाण
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
म्हाडाच्या वसाहतींमधील इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. मुंबईत म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत. यामध्ये एकूण ११४ लेआऊट्स आहेत. आता म्हाडामार्फत या वसाहतींमधील इमारतींचा पुनर्विकास करता येईल आणि त्यामुळे मुंबईमध्ये घरांचा तुटवडा दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
म्हाडा वसाहतींमधील हा पुनर्विकास ३३(५) अंतर्गत करण्यात येईल. या निर्णयामुळे म्हाडाला मोठा हाऊसिंग स्टॉक उपलब्ध होईल आणि ही घरे सोडत काढून सामान्यांना परवडणाऱ्या दराने विक्री करण्यात येणार आहे. म्हाडाच्या वसाहतींमधील इमारतींचा पुनर्विकास खाजगी विकासकाकडून करण्यात येत असल्याने या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणारा विक्रीचा हिस्सा विकासकाला जात होता. मात्र आता या निर्णयामुळे विक्रीचा हिस्सा म्हाडाला मिळणार आहे. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा निर्णय असल्याचे मधु चव्हाण यांनी सांगितले.
गृहनिर्माण सोसायट्या म्हाडाकडे आल्यावर त्यांना विकासकामार्फतही त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास करता येईल किंवा स्वयंपुनर्विकासाचा पर्यायही त्यांना उपलब्ध असेल. पुनर्विकास करताना तात्पुरत्या बांधण्यात येणाऱ्या संक्रमण शिबिरांचे भाडे किती असावे, कार्पोस निधी किती असावा, पुनर्विकासबाबत नियमावली तयार करणे अशा बाबतीत विचार करण्यासाठी सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
म्हाडाच्या ५०० चौ.फु.पर्यंतच्या घरांचाही मालमत्ता कर माफ
मुंबई महापालिकेने ५०० चौ. फु. पर्यंतच्या घरांचे मालमत्ता कर माफ केल्याने म्हाडाच्याही ५०० चौ.फु. पर्यंतच्या घरांना हा नियम लागू करण्याचा तत्त्वतः प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात असली असून पुढच्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये यावर अंतिम निर्णय होणार आहे. १९९८ पासून थकीत असणाऱ्या या सेवाशुल्कावरील १८ टक्के आकारण्यात आलेल्या व्याजापैकी १० टक्के व्याज रद्द करावे, अशी मागणी राहिवाशी, आमदार, खासदार यांनी केली होती, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांनी व्याजाला स्थगिती दिली आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
गिरणी कामगारांसाठी ३,८३५ घरे
लोअर परळ सेनापती बापट मार्ग येथील श्रीनिवास मिल, वडाळा येथील बॉम्बे डाइंग मिल या दोन्ही मिलच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. या घरांपैकी ३ हजार ८३५ घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती मधु चव्हाण यांनी दिली.”
“केएचएल न्यूज ब्युरो