Details
मुंबईच्या नॅशनल पार्कमधल्या २७ हजार कुटुंबांना म्हाडाची घरे! सभापती मधू चव्हाण यांची घोषणा
01-Jul-2019
”
मुंबईतल्या बोरिवली येथील नॅशनल पार्कमधील दोन हजार आदिवासी व २४ हजार ९५९ पात्र झोपडी धारकांच्या पुनर्वसनाचा आराखडा म्हाडाने तयार करून म्हाडाच्या मुंबई मंडळाने त्यासाठी निविदा जारी केल्या आहेत, अशी माहिती मुंबई म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांनी बुधवारी दिली. या पुनर्वसनाचे बांधकाम विकासकांना टीडीआर देण्याच्या अटीवर देण्यात आले असल्याने म्हाडाला यासाठी निधी उपलब्ध करावा लागणार नाही. यामुळे नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि तेथील झोपडी धारकांचा अनेकवर्षे रखडलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे. सुमारे ९० एकर जागेवर आदिवासी आणि झोपडी धारकांसाठी घरे बांधली जाणार आहेत, असे ते म्हणाले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात यापूर्वी आदिवासी व झोपडी धारकांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले असून आता दुसऱ्या टप्प्यात नॅशनल पार्कमधील दोन हजार आदिवासी आणि २४ हजार ९५९ पात्र झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यात येईल. या पुनर्वसनाचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने येथील पुनर्विकासाच्या कामाला सुरूवात केली. नॅशनल पार्कमधील आदिवासींचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर आता तेथील घरांच्या बांधकामासाठी म्हाडाने निविदा मागविण्यास सुरूवात केली आहे, असे मधू चव्हाण म्हणाले.
या निविदानुसार आदिवासींना ३०० चौरस फुटांचे बांधकाम असलेले एक मजली घर बांधून देण्यात येणार आहे. ४३ एकर जागेवर हीघरे बांधली जाणार आहेत तर झोपडी धारकांचे पुनर्वसन एसआरए योजनेंतर्गत केले जाणारआहे. त्यासाठी ४७ एकर जमिनीवर त्यांच्यासाठी बहुमजली इमारती बांधल्या जातील.आदिवासी आणि झोपडीधारकांसाठी एकूण ९० एकर जागेवर पुनर्वसनाचे काम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.”
“मुंबईतल्या बोरिवली येथील नॅशनल पार्कमधील दोन हजार आदिवासी व २४ हजार ९५९ पात्र झोपडी धारकांच्या पुनर्वसनाचा आराखडा म्हाडाने तयार करून म्हाडाच्या मुंबई मंडळाने त्यासाठी निविदा जारी केल्या आहेत, अशी माहिती मुंबई म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांनी बुधवारी दिली. या पुनर्वसनाचे बांधकाम विकासकांना टीडीआर देण्याच्या अटीवर देण्यात आले असल्याने म्हाडाला यासाठी निधी उपलब्ध करावा लागणार नाही. यामुळे नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि तेथील झोपडी धारकांचा अनेकवर्षे रखडलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे. सुमारे ९० एकर जागेवर आदिवासी आणि झोपडी धारकांसाठी घरे बांधली जाणार आहेत, असे ते म्हणाले.