Details
मासेमारी बंदीच्या काळातील नुकसानभरपाई द्या – रमेश पाटील
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा काळ आहे. या काळात समुद्र खवळलेला असून हा मत्स्य प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे मत्स्यव्यवसाय खात्याने या काळात मासेमारीवर कायद्याने बंदी घातली आहे. या दोन महिन्यांच्या काळात मासेमारी पूर्णपणे बंद असल्याने कोळी समाजावर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे कोळी समाजाला राज्यशासनाने उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करून नुकसानभरपाई द्यावी अशी आग्रही मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे आमदार रमेश पाटील यांनी केली आहे.
आपण हा महत्वाचा मुद्दा विधान परिषदेतदेखील मांडला अशी माहिती त्यांनी दिली. मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या काळात खोल समुद्रात मासेमारी करणारे कोळी बांधव, खलाशी व मासे विक्री करणाऱ्या कोळी महिला आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हाताला काम नसल्याने आर्थिक ते विवंचनेत असतात. घरखर्च चालण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मासेमारी करणाऱ्या गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतील कोळी बांधवांना मासेमारी बंदीच्या या काळात गेली अनेक वर्षे आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे राज्य सरकारनेही मासेमारी बंदीच्या काळात आर्थिक नुकसानभरपाई देण्याची तरतूद करावी अशी मागणी रमेश पाटील यांनी केली आहे. राज्यात मासेमारी करणाऱ्या मत्स्य व्यवसायिकांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो