Details
माणिक मुंडेलिखित `मीरा – भक्ती का अमिरस’ आणि ‘हंस का दंश’चे प्रकाशन
01-Jul-2019
”
मीराचे समर्पण हे विश्वातील विरळा उदाहरण – संत रमेशभाई ओझा यांचे विवेचन
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मीरासारखे समर्पण कुणालाच शक्य नाही. तिने कन्हैय्याचा ध्यास सोडावा, यासाठी अनेक अघोरी प्रयत्न झाले. पण तिने कुणालाच दाद दिली नाही. इतकी ती समर्पित होती. पूर्ण विश्वात तिच्या भक्तीचा महिमा अगाध आहे, असे निरूपण संत रमेशभाई ओझा यांनी माणिक मुंडेलिखित ‘मीरा – भक्ती का अमिरस’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना केले.
कालजयी प्रकाशनतर्फे मुंबईच्या मुलुंड येथे ट्रान्सकॉन स्कायसिटी येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ‘मीरा – भक्ती का अमिरस’ आणि ‘आणि हंस का दंश’ या ग्रंथांचे प्रकाशन महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी आणि संत श्री रमेशभाई ओझा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
हृदयाची स्पंदने ओळखली तर शब्दाची गरज नाही. भावतरंग पकडले आणि तादात्म झालो तर त्यापुढे शब्दही व्यर्थ ठरतात. बुद्ध आणि मीरा यांच्यात आपल्याला विरोधाभास दिसतो. कारण आपली दृष्टी विभाजित झालेली असते, असेही विवेचन यावेळी माणिक मुंडे यांनी केले.
मीराच्या जीवनात एक दर्द आहे. तिच्यात अनंताचा महासागर आहे. ब्रम्हस्वरूप मीरा त्यात डुंबली. तिच्या जीवन चरित्रातून प्रेमाची धारा वाहिली. हे सारे मीरा – भक्ती का अमिरस, हा ग्रंथ वाचताना पानोपानी जाणवते, असे महामंडेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी यावेळी म्हणाले. ‘हंस का दंश’ या ग्रंथाबाबत ते म्हणाले, हंसांचा दंश झाल्याचे कधी कुणाला दिसले नाही. दंश झाले त्यांनी कधी आपल्या वेदना प्रकट केल्या नाहीत. दंश झाल्यानंतरही आनंदरस देतात ते खरे संत.
यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिषकुमार चौहान म्हणाले की, संतपरंपरेने काय पाहिलं? त्यांना स्वत:चं भान नव्हतं. अनंतात ते लीन होतात. मीराबाई त्यातील एक. अनंत पाहण्याची खूप जणांची इच्छा असते. पण सर्वांनाच ते पाहण्यास मिळत नाही.
यावेळी आहारवेदाचे हरीश शेट्टी म्हणाले की, आहारवेदाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अभियानात शरीरासाठी आणि ज्ञानासाठी असे दोन उपक्रम चालवले जातात. आपण निसर्गासोबत राहिलो तर निसर्ग आपणास सांभाळेल.”
“मीराचे समर्पण हे विश्वातील विरळा उदाहरण – संत रमेशभाई ओझा यांचे विवेचन