HomeArchiveमागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ...

मागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ नागरिक चालले काशी विश्वनाथ यात्रेला!

Details
मागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ नागरिक चालले काशी विश्वनाथ यात्रेला!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आपल्या मुलाने आयुष्यात एकदातरी काशीला घेऊन जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. हा योग मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खुलले आहे. चलो काशी यात्रेला असा पुकार करत मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिक आज खास रेल्वेने काशी विश्वनाथ यात्रेला रवाना झाले.

मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 2000 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वानाथ यात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. रेल्वेने बोरिवली ते वाराणसी असा 36 तासांचा प्रवास केल्यावर येत्या रविवारी पहाटे हे ज्येष्ठ नागरिक वाराणसी स्टेशनला पोहोचतील. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी तेथील पोलीस आयुक्तांनी येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची खास दर्शनाची व्यवस्था केली आहे असे आमदार सुर्वे यांनी सांगितले.

यात्रेदरम्यान खास गंगा स्नान, संध्याकाळी गंगा आरती असा भरगच्च कार्यक्रम आहे. प्रवासादरम्यान या ज्येष्ठ नागरिकांची नाष्टा, चहा तसेच जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेणारे 7 डॉकटर्स तसेच सुमारे 100 शिवसैनिक व महिला प्रत्येक डब्यात तैनात राहून त्यांची बडदास्त ठेवतील असे आमदार सुर्वे यांनी सांगितले. त्याचदिवशी रात्री 11 वाजता हे ज्येष्ठ नागरिक परतीच्या प्रवासाला मुंबईकडे रवाना होऊन मंगळवरी 36 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर दुपारी मुंबईला पोहचतील अशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या आईने मला एकदा तरी काशी यात्रेला घेऊन जा असे सांगितले. आईची इच्छा मी पूर्ण केली. माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकदेखील आई वडिलांप्रमाणे असून कलीयुगातील या श्रावण बाळाने येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची काशी विश्वनाथ दर्शनाची इच्छा पूर्ण केली. गेले एक महिना आम्ही या यात्रेची तयारी करत होतो. यापूर्वी येथील जेष्ठ नागरिकांना नाशिक त्र्यंम्बकेश्वर, शिर्डी, पालघरची महालक्ष्मी यांची दर्शनयात्रा आपण आयोजित केली होती असेही सुर्वे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

अखेर इराणपुढे अमेरिकेने हात टेकले! युद्धविराम!! शुक्रवारी पाकिस्तानात चर्चा!!!

४८ तासांत होर्मूझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराण बेचिराख करू, असा अत्यंत गंभीर इशारा देणाऱ्या अमेरिकेने अखेर इराणपुढे हात टेकले. इराणच्या १० अटींच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करण्याचे मान्य करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांकरीता एकतर्फी युद्धविराम...

आहात तिथेच थांबा! इराणमधल्या भारतीयांना सरकारचे निर्देश!!

मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात वाढता तणाव पाहता, केंद्र सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' (मार्गदर्शक सूचना) जारी केली आहे. "पुढील ४८ तास तुम्ही जिथे आहात, तिथेच सुरक्षित राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा," असे स्पष्ट आदेश...

उद्या पहाटेपासून मीरा-भाईंदर ते चेंबूरपर्यंतच्या प्रवाशांसाठी मेट्रो!

मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने मंगळवारी एक मोठे पाऊल पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्गिका ९ (टप्पा १) आणि मेट्रो मार्गिका...
Skip to content