Details
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार वितरीत!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार आणि साहित्यिकांचे लेखनाचे विषय बघता महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या साहित्याचा प्रभाव समाजावर असल्याचे जाणवते. म्हणून महाराष्ट्र हे प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे राज्य आहे. खऱ्या साहित्याची निर्मिती नेहमीच प्रादेशिक भाषेत होत असते, असे उद्गार सरस्वती सन्मान प्राप्त गुजराती साहित्यिक पद्मश्री सितांशु यशश्चंद्र यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात वार्षिक ग्रंथ पुरस्कार देताना नुकतेच पुण्यात काढले.
यावेळी डॉ. विजया वाड, मुकुंद राज कुलकर्णी, अभिनेता जितेंद्र जोशी, राजीव तांबे, यतीन माझिरे, छाया महाजन, विनायक कुळकर्णी, संतोष शेणई, डॉ. जयश्री तोडकर यांना गौरविण्यात आले. बँकिंगविषयक ग्रंथासाठी देण्यात येणारा कै. सुभाष हरी गोखले पुरस्कार प्रसिद्ध आर्थिक लेखक आणि गुंतवणूक समुपदेशक विनायक कुळकर्णी यांना “अर्थभान- बँकिंग आणि विमा” पुस्तकासाठी गुजराती साहित्यिक सितांशु यशश्चंद्र यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे होते. उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांचीही उपस्थिती होती. कार्यवाह उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.”
“केएचएल न्यूज ब्युरो