Details
मनसेच्या पाठपुराव्याला यश!
01-Jul-2019
”
डॉ. शिरोडकर शाळेला अखेर सीबीएसई मान्यता
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईच्या परळ येथील के. एम. एस. इंग्लिश माध्यम (डॉ. शिरोडकर शाळेला) अखेर केंद्रीय शिक्षण मंडळाची (सीबीएसई) मान्यता मिळाल्यामुळे त्या शाळेतील ८४ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांचा परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना आणि पालकांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
परळ येथील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई संचलित शिक्षण संस्थेने २००८ मध्ये के. एम. एस. ही सीबीएसई शाळा सुरू केली. या शाळेला राज्य शासनाकडून आवश्यक ती कागदपत्रे मिळाली होती. मात्र सीबीएसईचे ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने या शाळेतून दहावीची परीक्षा देणाऱ्या ८४ विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती पालकांमध्ये होती. के. एम. एस. इंग्लिश माध्यम (डॉ. शिरोडकर शाळेला) सीबीएसई मान्यता मिळण्याबाबत पाठपुरावा करावा यासाठी पालकांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भेट घेतली होती.
मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, विभागाध्यक्ष नंदकुमार चिले, मनविसे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, मनीष पाथरे, सचिन परब, उजाला यादव आदी पदाधिकारी तसेच पालकांच्या शिष्टमंडळाने शाळा व्यवस्थापनाची भेट घेतली. शाळेकडून काही कागदपत्रांची पूर्तता बाकी असून ती झाल्यावर शाळेला सीबीएसईकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे, असे शाळेतर्फे सांगण्यात आले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची जबाबदारी आमची आहे, असेही या संस्थेने सांगितले. याविषयी संस्थेकडून मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांना लेखी आश्वासन देण्यात आले होते.
मनविसे शिष्टमंडळाने पालकांसह राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन सीबीएसईची परीक्षा जवळ आली तरी विद्यार्थ्यांचे परीक्षाअर्ज न भरले गेल्याने शाळेतील दहावीच्या ८४ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने के. एम. एस. इंग्लिश माध्यम (डॉ. शिरोडकर शाळेला) मान्यता मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली. शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधून शाळा व्यवस्थापनाने तीन वर्षांपूर्वीच सीबीएसईसाठी मान्यता प्रक्रिया सुरू केली होती. मात्र विविध प्रशासकीय अडचणींमुळे शाळेला मान्यता मिळाली नव्हती. त्यामुळे शाळेला मान्यता मिळण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंडळा निर्देश द्यावेत अशी विनंती केली. अखेर मंडळाच्या वेबसाइटवर शाळेला मान्यता मिळाल्याचे जाहीर झाले. यामुळे आता या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.”
“डॉ. शिरोडकर शाळेला अखेर सीबीएसई मान्यता