Details
भ्रष्टाचार्यांचा कर्दनकाळ!
01-Jul-2019
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तुपे यांनी लिहिलेले ‘ट्रॅपस्-अँटी करप्शन’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी हे पुस्तक प्रकाशित करताना तुपे यांचे कौतुक केले. ‘तुपे हे केस तयार करण्यात इतके निपूण होते की, त्यांना कागदावरील एनकाऊंटर स्पेशलिस्ट म्हटले पाहिजे’, असेही शिवानंदन म्हणाले. तुपे हे पोलीस सेवेत असताना एक कर्तबगार आणि स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी म्हणून ओळखले जात. त्यांनी ज्या-ज्या विभागात काम केले त्या-त्या विभागात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवला. अशा कर्तबगार अधिकार्याची अँटी करप्शन विभागात नेमणूक केली जाते. तुपे यांची या विभागात बदली झाली आणि ते भ्रष्ट सरकारी कर्मचार्यांचा कर्दनकाळ ठरले.
भ्रष्टाचाराची चीड असलेल्या तुपे यांनी अनेक लाचखोर सरकारी कर्मचार्यांना आणि अधिकार्यांना गजाआड केले. त्या विविध प्रकरणांच्या सत्यकथा तुपे यांनी साध्या आणि सोप्या भाषेत मांडल्या आहेत. त्या वाचताना समाजात भ्रष्टाचार किती खोलवर रूजला आहे याची कल्पना येते. या पुस्तकात रेशनिंग ट्रॅप, खोटी तक्रार, रेव्हेन्यू बिल कलेक्टर ट्रॅप, पोलीस प्रशिक्षण केंद्र ट्रॅप, इतकेच नव्हे तर प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणार्या पोस्टमार्टम डॉक्टर ट्रॅपसारख्या सापळ्यांच्या कथा तुपे यांनी रसाळ भाषेत कथन केल्या आहेत. यातील ‘मयत पार्टी’चा किस्सा मनोरंजक आहे. तुपे यांची अँटी करप्शन ब्युरोमध्ये नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या ट्रॅपच्या वेळी अनुभवी एसीपी अब्दुल रौफ शेख त्यांना म्हणाले, ‘मी मयत पार्टी बनवित आहे.’ ‘सर, हा मयत पार्टी काय प्रकार आहे?’ असा निरागस प्रश्न नवख्या तुपे यांनी विचारला असता रौफ म्हणाले, ‘ट्रॅपसाठी 10 ते 12 अधिकारी, कर्मचारी, साक्षीदारांची टीम करावी लागते व त्यांनी लाच मागणार्या सरकारी/निमसरकारी नोकरास लाच घेताना रंगेहात पकडल्यावर त्याचा पब्लिक सर्व्हंट म्हणून तात्पुरता मृत्यू होत असतो. जिवंत असून तो मेल्यासारखाच असतो. दुसर्या दिवशी तो पैसे खाल्ल्याबद्दल, लाचखाऊ अधिकारी/कर्मचारी म्हणून प्रसिद्ध होतो. सेवेतून तो कमीत कमी 6 महिने तत्काळ निलंबित होतो. म्हणून ही मयत पार्टी.’
तुपे यांना या ‘मयत पार्टी’चे प्रमुख बनविण्यात आले. ते प्रकरण होते महापालिकेतील जनार्दन पाटील नावाच्या मुकादमाचे. त्या मुकादमाने एका झोपडीधारकाकडून झोपडीची रूंदी वाढविण्याकरिता 30 हजार रूपयांची लाच मागितली होती. फुटपाथवर बसून दिवसातून 25 ते 30 रूपये कमविणार्या त्या गरीबासाठी ही रक्कम कितीतरी मोठी होती. अखेर त्याने 500 रूपये महिना असे सहा हफ्ते देण्याचे नाईलाजास्तव कबूल केले. मग त्याने क्रिसेंट हाऊस, बॅलार्ड पिअर येथे जाऊन त्या मुकादमाची अँटी करप्शनमध्ये तक्रार केली. तुपे यांनी सापळा रचून त्या मुकादमाला अटक केली. पुढे या मुकादमाला दोन वर्षे कैदेची शिक्षा झाली. 57 वर्षे वय असलेल्या त्या मुकादमाची तुपे यांना आधी दया आली होती. पण कर्तव्यापुढे सारे काही दुय्यम मानणार्या कर्तबगार तुपे यांनी त्याला गजाआड पोहोचविले. नंतरच्या काळात त्यांना असे अनेक ‘मुकादम’ भेटले. तुपे यांनी त्यांच्या नाकात दम आणला.
त्यांच्याविरोधात भक्कम केस तयार करून त्यांना तुरूंगात टाकले.
‘ट्रॅपस्-अँटी करप्शन’ हे पुस्तक तुपे यांनी केवळ हौस म्हणून लिहिलेले नाही. एकदा पकडले गेल्यानंतर होणारा मनस्ताप, बदनामी, तुरूंगवास याचा विचार करून सरकारी कर्मचारी हे पुस्तक वाचून आपल्या दैनंदिन कामामध्ये भ्रष्ट्राचार करणे थांबवतील अशी तुपे यांना आशा वाटते. 176 पृष्ठे असलेल्या या पुस्तकाची किंमत 150 रूपये आहे. पण तुपे यांनी व्यवसाय करण्यासाठी ते लिहिलेले नाही. प्रकाशन समारंभात सर्व उपस्थितांना हे पुस्तक विनामूल्य वाटण्यात आले. यावरून तुपे यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि तळमळीची कल्पना येते. हे पुस्तक सर्वांनी, विशेषत: भ्रष्ट सरकारी बाबूंनी आवर्जून वाचावे, अशी आम्ही शिफारस करत आहोत…”
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर