HomeArchiveभीष्माचार्यांचे भवितव्य!

भीष्माचार्यांचे भवितव्य!

Details
भीष्माचार्यांचे भवितव्य!

    21-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
 
अनिकेत जोशी..
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
 
 
“दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान.. म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान!”, हे प्राचीन काळातील व्यंगगीत लोकप्रिय होते. ज्या नाटकात ते गाजले होते त्या शारदा नाटकाचे वयोमानही शंभरीच्या पुढे गेले आहे. पण सध्या तेच पद्य पुन्हा एकदा महाराष्ट्रातील, “सर्वात तरूण” राजकारणी गुणगुणत आहेत. शरद्चंद्र गोविंदराव पवार यांनी त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शनाचा कार्यक्रम गेल्या वर्षीच पार पाडला आहे. पण त्यांच्या ऐंशीच्या घरातील वयोमानाचा उल्लेख व्यासपीठावरून झाला तेव्हा पवारसाहेबांनी बोलणाऱ्या नेत्याला खडसावले की, “मी काही अजुनी म्हातारा झालो नाही. अजुनी पुष्कळांना आपल्याला आडवे करायचे आहे..” पवारसाहेबांच्या बोलण्यातील आडवे करायचे आहे या उल्लेखाला साताऱ्यातील उपस्थित जनतेने मोठी खळखळून हसून दाद दिली. कारण शत्रूंना आडवे करण्यातच साहेबांची राजकीय हयात गेली असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. राजकीय आखाड्यातील तेल लावलेले अनेक पैलवान दिसत असले तरी त्या सर्वांना धोबीपछाड करणारे नेते अशीच पवारसाहेबांची प्रतिमा आहे. बरे हा धोबीपछाड ते कसा करतील हेही कुणाला सांगता येणार नाही. पण एखाद्या उमेदवाराला ठरवून निवडणुकीत पाडण्याचा कार्यक्रम करण्याची क्षमता पवारसाहेबांमध्ये होती व आहे.
 
 
विलासराव देशमुखांनी एका निवडणुकीमध्ये साहेबांशी पंगा घेतला होता. १९९५ची विधानसभा निवडणूक आठवा. त्यावेळी पवारसाहेब काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठतम नेते होते. पण राजीव गांधींबरोबर त्यांचे विशेष जमत नव्हते. पवारांच्या विरोधात राज्यात काम करणाऱ्या नेत्यांमध्ये विलासराव देशमुख आघाडीवर होते. १९९५च्या निवडणुकीत लातूर मतदारसंघामध्ये देशमुखांचा सामना जनता दलाचे शिवाजीराव कव्हेकर यांच्याशी झाला. तेव्हा कव्हेकर कसे निवडून आले याचे किस्से स्वतः विलासरावच सांगत असत. हे आडवे करणे, कात्रजचा घाट दाखवणे हा सारा पवारसाहेबांच्या डाव्या हाताचा मळ होता. त्यांनी राजकारणात सातत्याने एक संघर्ष केला. कधी वसंतदादांच्या विरोधात, कधी बाळासाहेब विखेंच्या विरोधात. प्रत्येक जिल्हयात, मागच्या पिढीतील असे दोन-चार तरी राजकीय नेते असतील, ज्यांनी शरद पवारांच्या या आडवे करण्याच्या प्रकरणाचा धसका घेतलेला असेल. पण जेव्हा शरदराव अधिक तरूण होते तेव्हा हा अडवाअडवीचा उद्योग त्यांना कदाचित झेपला असेल. तरी आता ते शक्य होणार आहे का? शरदरावांची साथसंगत सोडून इतरत्र वळलेल्या सर्वांना आडवे करण्याचा चंग जरी त्यांनी बांधलेला असला तरी पळणाऱ्यांची संख्याच इतकी मोठी आहे की किती जणांना आणि कुठे कुठे आडवे करावे लागणार आहे हेही ठरवणे वा सांगणे कठीणच आहे!
 
 
कोणी काही म्हटले तरी शरदरावांसारखा नेता निवृत्त होऊन घरी स्वस्थ बसेल वा हरी हरी करीत राहील हे शक्य वाटत नाही. काही वर्षांपूर्वी त्यांनी थोडी निरवानिरवीची भाषा सुरू केली होती. लोकसभा निवडणूक यापुढे लढवणार नाही असे त्यांनी २०१४च्या निवडणुकीच्या वेळी जाहीर केले होते. २००९च्या निवडणुकीत पवारसाहेबांनी पारंपरिक बारामती लोकसभा मतदारसंघ सोडला. तिथे कन्या सुप्रियाताई या खासदार बनल्या. स्वतः पवारसाहेब शेजारच्या माढा मतदारसंघामधून लढले. सोलापूर जिल्ह्यातील माढा हा लोकसभा मतदारसंघ मोक्याच्या जागी आहे. पुणे व सातारा जिल्हयांना लागून असणाऱ्या या मतदारसंघावर सोलापूरप्रमाणेच साताऱ्याचा मोठा प्रभाव आहे. कारण यातील तीन विधानसभा मतदारसंघ प्रत्यक्षात साताऱ्यात येतात. सहाजिकच माढा लढवताना शरदरावांना साताऱ्यातील उदयनराजेंची मदत घेणे क्रमप्राप्तच होते. त्या निवडणुकीवेळीही उदयनराजे राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांशी भांडतच होते. साताऱ्यातून उदयनराजेंऐवजी अन्य कुणाला तिकीट देता येईल का अशी चाचपणी अजितदादांनी सुरू केली तेव्हा राजेंनी माढ्यातून लढयाची तयारी करतो असे जाहीर करून पवारांना चार पावले मागे रेटलेच होते. त्यामुळे राजेंच्या या अडवाअडवीच्या उद्योगांपासून स्वतःचा बचावही पवारसाहेबांना करावा लागला होता. त्यावेळी त्यांना सोलापूरचे मोठे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची मोठी मदत झाली होती. पण मग माढ्याची खासदारकी पवारसाहेबांनी पुढे, २०१४मध्ये, का बरे सांभाळली नाही?
 
 
त्यावेळी त्यांनी अशी भूमिका घेतली की, मी आता लोकांच्या सभागृहात न जाता ज्येष्ठांच्या सभागृहात जाईन. ते राज्यसभेवर गेले व विजयसिंह मोहितेंना त्यांनी माढा लढवायला सांगितले आणि मग माढ्याचे खासदार २०१४पासून पाच वर्षे मोहिते पाटील राहिले. तिथले कार्यकर्ते सांगतात की, २०१४मध्ये स्थानिक जनतेने पवारसाहेबांना विरोध सुरू केला होता. कारण त्यांचा पाण्याचा प्रश्न खासदार पवारसाहेबांनी सोडवला नव्हता. २००४पासूनचे केंद्रात मंत्री राहूनही दुष्काळी माढ्यातील पाण्याचा मोठा प्रश्न पवारसाहेबांनी सोडवला नाही हा जनतेचा आक्षेप होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेवर जाण्याचा निर्णय झाला होता. पण जर तुम्ही राज्यसभेवर जाताय, निवृत्तीच्या गोष्टी करताय, तर मग २०१९मध्ये पुन्हा एकदा माढ्याच्या खासदारकीसाठी तुमची उमेदवारी कशी काय पुढे येत होती? हा सवाल पवारसाहेबांना केलात तर त्याचे उत्तर असे असू शकेल की, २०१९मध्ये मोहिते पाटलांची आडवाआडवी करण्याची तयारी सुरू झाली होती!
 
 

 
 
 
२००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या अपेक्षा होत्या. पवारसाहेबच भावी पंतप्रधान आहेत असे आर. आर. पाटील यांच्यासारखे लोकनेते सांगू लागले होते. पण त्याही निवडणुकीत स्वतः पवार व त्यांची कन्या असे लढूनही राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या दहाच्या पुढे जाऊ शकली नाही. तिकडे सोनिया गांधींच्या नेतृत्त्वात मनमोहन सिंहांचे सरकार पुन्हा सत्तेत परतले. भाजपाचीही डाळ त्यावेळी शिजली नव्हती. २००९मध्ये दबल्या गेलेल्या पवारांच्या पंतप्रधानपदाच्या आकांक्षाना पुन्हा २०१४ला धुमारे फुटले होते. पण नंतर पवारसाहेबांनी सूर बदलला व पुढच्या पिढीच्या हातात राजकारण दिले पाहिजे अशी भाषा सुरू केली. प्रत्यक्षात २००९ ते २०१४ आणि पुन्हा २०१४ ते २०१९ या कालावधीत शरद पवारांनी पुढच्या पिढीच्या हातात राजकीय सूत्रे दिली का हा प्रश्नच आहे. घरात असणाऱ्या किरकिऱ्या म्हातारीने सुनेच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालीवर डोळा ठेवावा आणि खडसावत राहवे असा सासुरवास राष्ट्रवादीमध्ये सुरू राहिला का, या प्रश्नाचे उत्तर अजितदादंनाच विचारावे लागेल.
 
 
अजित पवारांचा पूर्ण उदय राष्ट्रवादीमध्ये या कालावधीत होईल अशी जी अपेक्षा होती ती पूर्ण होताना दिसली नाही. अजित पवारांच्या अनेक निर्णयांमध्ये पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केले. दिल्लीच्या संदर्भात सुप्रिया सुळे तर महाराष्ट्राच्या संदर्भात अजितदादांचा शब्द अंतिम राहील अशी जी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती तीही सफल झाली नाही. विशेषतः पक्ष गेल्या पाच वर्षांत राज्यात व केंद्रात विरोधी बाकांवर पक्ष बसला तेव्हा निवृत्तीकडे जाणारी पवारसाहेबांची पावले पुन्हा एकदा पक्षाच्या दैनंदिन कामकाजात सक्रीय होताना दिसली. अजितदादांचे राज्यासंदर्भातील महत्त्व क्रमशः कमी होताना दिसले. विशेषतः २०१९च्या लोकसभा निवडणकीमध्ये अजितदादांच्या मुलाच्या उमेदवारीवरून जो घोळ पक्षात झाला त्यानंतर दादा व पवारसाहेब हे सातत्याने एकमेकांच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. ईव्हीएमवरून तेच झाले. अलिकडे झेंड्याचा वाद रंगला. दादा म्हणाले की, पक्षाच्या झेंड्याबरोबर महाराजांचा भगवा फडकवला जाईल. तेव्हा झेंडा बदलण्याचे काही ठरले नसल्याचा खुलासा करत पवारांनी फुग्याला टाचणी लावण्याचे कार्य पार पाडले. सिने कलावंत व शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्त्वाखाली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक प्रचाराची यात्रा सुरू झाली. त्यात तरूण नेत्यांपेक्षा पवारसाहेबच अधिक चमकताना दिसत आहेत. एका बाजूला सेनेतून आलेले कोल्हे तर दुसऱ्या बाजूला भाजपातून आलेले धनंजय मुंडे यांना सोबत घेत राष्ट्रवादी सोडणाऱ्यांवर पवारसाहेब तोंडसुख घेत आहेत, हा त्यातला आणखी गंमतीचा भाग. पण विजयसिंह, सचिनभाऊ अहीर, पद्मसिंह, पिचड, उदयनराजे, सोपल, भास्कर जाधव.. असे मोहरे एका मागोमाग एक सेना, भाजपात गेल्या नंतर आता तर स्वतः पवारच भीष्माचार्याच्या आवेशात मैदानात उतरताना दिसत आहेत. काय असेल या भीष्माचार्याचे भवितव्य?”

 
 

 
 
 
“अनिकेत जोशी..
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com”
 
 

““दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान.. म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान!”, हे प्राचीन काळातील व्यंगगीत लोकप्रिय होते. ज्या नाटकात ते गाजले होते त्या शारदा नाटकाचे वयोमानही शंभरीच्या पुढे गेले आहे. पण सध्या तेच पद्य पुन्हा एकदा महाराष्ट्रातील, “सर्वात तरूण” राजकारणी गुणगुणत आहेत. शरद्चंद्र गोविंदराव पवार यांनी त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शनाचा कार्यक्रम गेल्या वर्षीच पार पाडला आहे. पण त्यांच्या ऐंशीच्या घरातील वयोमानाचा उल्लेख व्यासपीठावरून झाला तेव्हा पवारसाहेबांनी बोलणाऱ्या नेत्याला खडसावले की, “मी काही अजुनी म्हातारा झालो नाही. अजुनी पुष्कळांना आपल्याला आडवे करायचे आहे..” पवारसाहेबांच्या बोलण्यातील आडवे करायचे आहे या उल्लेखाला साताऱ्यातील उपस्थित जनतेने मोठी खळखळून हसून दाद दिली. कारण शत्रूंना आडवे करण्यातच साहेबांची राजकीय हयात गेली असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. राजकीय आखाड्यातील तेल लावलेले अनेक पैलवान दिसत असले तरी त्या सर्वांना धोबीपछाड करणारे नेते अशीच पवारसाहेबांची प्रतिमा आहे. बरे हा धोबीपछाड ते कसा करतील हेही कुणाला सांगता येणार नाही. पण एखाद्या उमेदवाराला ठरवून निवडणुकीत पाडण्याचा कार्यक्रम करण्याची क्षमता पवारसाहेबांमध्ये होती व आहे.”
 
 
“विलासराव देशमुखांनी एका निवडणुकीमध्ये साहेबांशी पंगा घेतला होता. १९९५ची विधानसभा निवडणूक आठवा. त्यावेळी पवारसाहेब काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठतम नेते होते. पण राजीव गांधींबरोबर त्यांचे विशेष जमत नव्हते. पवारांच्या विरोधात राज्यात काम करणाऱ्या नेत्यांमध्ये विलासराव देशमुख आघाडीवर होते. १९९५च्या निवडणुकीत लातूर मतदारसंघामध्ये देशमुखांचा सामना जनता दलाचे शिवाजीराव कव्हेकर यांच्याशी झाला. तेव्हा कव्हेकर कसे निवडून आले याचे किस्से स्वतः विलासरावच सांगत असत. हे आडवे करणे, कात्रजचा घाट दाखवणे हा सारा पवारसाहेबांच्या डाव्या हाताचा मळ होता. त्यांनी राजकारणात सातत्याने एक संघर्ष केला. कधी वसंतदादांच्या विरोधात, कधी बाळासाहेब विखेंच्या विरोधात. प्रत्येक जिल्हयात, मागच्या पिढीतील असे दोन-चार तरी राजकीय नेते असतील, ज्यांनी शरद पवारांच्या या आडवे करण्याच्या प्रकरणाचा धसका घेतलेला असेल. पण जेव्हा शरदराव अधिक तरूण होते तेव्हा हा अडवाअडवीचा उद्योग त्यांना कदाचित झेपला असेल. तरी आता ते शक्य होणार आहे का? शरदरावांची साथसंगत सोडून इतरत्र वळलेल्या सर्वांना आडवे करण्याचा चंग जरी त्यांनी बांधलेला असला तरी पळणाऱ्यांची संख्याच इतकी मोठी आहे की किती जणांना आणि कुठे कुठे आडवे करावे लागणार आहे हेही ठरवणे वा सांगणे कठीणच आहे!”
 
 
“कोणी काही म्हटले तरी शरदरावांसारखा नेता निवृत्त होऊन घरी स्वस्थ बसेल वा हरी हरी करीत राहील हे शक्य वाटत नाही. काही वर्षांपूर्वी त्यांनी थोडी निरवानिरवीची भाषा सुरू केली होती. लोकसभा निवडणूक यापुढे लढवणार नाही असे त्यांनी २०१४च्या निवडणुकीच्या वेळी जाहीर केले होते. २००९च्या निवडणुकीत पवारसाहेबांनी पारंपरिक बारामती लोकसभा मतदारसंघ सोडला. तिथे कन्या सुप्रियाताई या खासदार बनल्या. स्वतः पवारसाहेब शेजारच्या माढा मतदारसंघामधून लढले. सोलापूर जिल्ह्यातील माढा हा लोकसभा मतदारसंघ मोक्याच्या जागी आहे. पुणे व सातारा जिल्हयांना लागून असणाऱ्या या मतदारसंघावर सोलापूरप्रमाणेच साताऱ्याचा मोठा प्रभाव आहे. कारण यातील तीन विधानसभा मतदारसंघ प्रत्यक्षात साताऱ्यात येतात. सहाजिकच माढा लढवताना शरदरावांना साताऱ्यातील उदयनराजेंची मदत घेणे क्रमप्राप्तच होते. त्या निवडणुकीवेळीही उदयनराजे राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांशी भांडतच होते. साताऱ्यातून उदयनराजेंऐवजी अन्य कुणाला तिकीट देता येईल का अशी चाचपणी अजितदादांनी सुरू केली तेव्हा राजेंनी माढ्यातून लढयाची तयारी करतो असे जाहीर करून पवारांना चार पावले मागे रेटलेच होते. त्यामुळे राजेंच्या या अडवाअडवीच्या उद्योगांपासून स्वतःचा बचावही पवारसाहेबांना करावा लागला होता. त्यावेळी त्यांना सोलापूरचे मोठे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची मोठी मदत झाली होती. पण मग माढ्याची खासदारकी पवारसाहेबांनी पुढे, २०१४मध्ये, का बरे सांभाळली नाही?”
 
 
“त्यावेळी त्यांनी अशी भूमिका घेतली की, मी आता लोकांच्या सभागृहात न जाता ज्येष्ठांच्या सभागृहात जाईन. ते राज्यसभेवर गेले व विजयसिंह मोहितेंना त्यांनी माढा लढवायला सांगितले आणि मग माढ्याचे खासदार २०१४पासून पाच वर्षे मोहिते पाटील राहिले. तिथले कार्यकर्ते सांगतात की, २०१४मध्ये स्थानिक जनतेने पवारसाहेबांना विरोध सुरू केला होता. कारण त्यांचा पाण्याचा प्रश्न खासदार पवारसाहेबांनी सोडवला नव्हता. २००४पासूनचे केंद्रात मंत्री राहूनही दुष्काळी माढ्यातील पाण्याचा मोठा प्रश्न पवारसाहेबांनी सोडवला नाही हा जनतेचा आक्षेप होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेवर जाण्याचा निर्णय झाला होता. पण जर तुम्ही राज्यसभेवर जाताय, निवृत्तीच्या गोष्टी करताय, तर मग २०१९मध्ये पुन्हा एकदा माढ्याच्या खासदारकीसाठी तुमची उमेदवारी कशी काय पुढे येत होती? हा सवाल पवारसाहेबांना केलात तर त्याचे उत्तर असे असू शकेल की, २०१९मध्ये मोहिते पाटलांची आडवाआडवी करण्याची तयारी सुरू झाली होती!”
 
 

 
 
 
“२००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या अपेक्षा होत्या. पवारसाहेबच भावी पंतप्रधान आहेत असे आर. आर. पाटील यांच्यासारखे लोकनेते सांगू लागले होते. पण त्याही निवडणुकीत स्वतः पवार व त्यांची कन्या असे लढूनही राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या दहाच्या पुढे जाऊ शकली नाही. तिकडे सोनिया गांधींच्या नेतृत्त्वात मनमोहन सिंहांचे सरकार पुन्हा सत्तेत परतले. भाजपाचीही डाळ त्यावेळी शिजली नव्हती. २००९मध्ये दबल्या गेलेल्या पवारांच्या पंतप्रधानपदाच्या आकांक्षाना पुन्हा २०१४ला धुमारे फुटले होते. पण नंतर पवारसाहेबांनी सूर बदलला व पुढच्या पिढीच्या हातात राजकारण दिले पाहिजे अशी भाषा सुरू केली. प्रत्यक्षात २००९ ते २०१४ आणि पुन्हा २०१४ ते २०१९ या कालावधीत शरद पवारांनी पुढच्या पिढीच्या हातात राजकीय सूत्रे दिली का हा प्रश्नच आहे. घरात असणाऱ्या किरकिऱ्या म्हातारीने सुनेच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालीवर डोळा ठेवावा आणि खडसावत राहवे असा सासुरवास राष्ट्रवादीमध्ये सुरू राहिला का, या प्रश्नाचे उत्तर अजितदादंनाच विचारावे लागेल.”
 
 

“अजित पवारांचा पूर्ण उदय राष्ट्रवादीमध्ये या कालावधीत होईल अशी जी अपेक्षा होती ती पूर्ण होताना दिसली नाही. अजित पवारांच्या अनेक निर्णयांमध्ये पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केले. दिल्लीच्या संदर्भात सुप्रिया सुळे तर महाराष्ट्राच्या संदर्भात अजितदादांचा शब्द अंतिम राहील अशी जी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती तीही सफल झाली नाही. विशेषतः पक्ष गेल्या पाच वर्षांत राज्यात व केंद्रात विरोधी बाकांवर पक्ष बसला तेव्हा निवृत्तीकडे जाणारी पवारसाहेबांची पावले पुन्हा एकदा पक्षाच्या दैनंदिन कामकाजात सक्रीय होताना दिसली. अजितदादांचे राज्यासंदर्भातील महत्त्व क्रमशः कमी होताना दिसले. विशेषतः २०१९च्या लोकसभा निवडणकीमध्ये अजितदादांच्या मुलाच्या उमेदवारीवरून जो घोळ पक्षात झाला त्यानंतर दादा व पवारसाहेब हे सातत्याने एकमेकांच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. ईव्हीएमवरून तेच झाले. अलिकडे झेंड्याचा वाद रंगला. दादा म्हणाले की, पक्षाच्या झेंड्याबरोबर महाराजांचा भगवा फडकवला जाईल. तेव्हा झेंडा बदलण्याचे काही ठरले नसल्याचा खुलासा करत पवारांनी फुग्याला टाचणी लावण्याचे कार्य पार पाडले. सिने कलावंत व शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्त्वाखाली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक प्रचाराची यात्रा सुरू झाली. त्यात तरूण नेत्यांपेक्षा पवारसाहेबच अधिक चमकताना दिसत आहेत. एका बाजूला सेनेतून आलेले कोल्हे तर दुसऱ्या बाजूला भाजपातून आलेले धनंजय मुंडे यांना सोबत घेत राष्ट्रवादी सोडणाऱ्यांवर पवारसाहेब तोंडसुख घेत आहेत, हा त्यातला आणखी गंमतीचा भाग. पण विजयसिंह, सचिनभाऊ अहीर, पद्मसिंह, पिचड, उदयनराजे, सोपल, भास्कर जाधव.. असे मोहरे एका मागोमाग एक सेना, भाजपात गेल्या नंतर आता तर स्वतः पवारच भीष्माचार्याच्या आवेशात मैदानात उतरताना दिसत आहेत. काय असेल या भीष्माचार्याचे भवितव्य?”

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content