HomeArchiveभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

Details
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

    15-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
vaibhavpatil2k5@yahoo.com
आपल्या देशात अनेक थोर पुरूषांनी जन्म घेतला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्या पासून सामाजिक कार्यात स्वततःला वाहून घेतलेल्याब अनेक महापुरूषांची नावे घेता येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील आपल्या देशाला लाभलेले असामान्या व्याक्तिमत्वे. भारतीय राज्याघटना ज्यां नी आपल्या‍ कुशाग्र बुध्दी्मत्तेचच्यात जोरावर लिहिली व जिचे आजदेखील आपण विनयशीलतेने पालन करतो त्याल राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. डॉ. बाबासाहेब ऊर्फ भीमराव यांचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत. त्यांवना चांगली पुस्तके वाचावयास आणून देत. त्या मुळेच बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते.

डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्त्वाने व कुशल नेतृत्त्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्त्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले. रंजल्या-गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या, शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि दलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून मानवतेची दिव्यज्योत निर्माण केली. त्या मुळेच ही व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती आहे.

अत्यं त सत्यपप्रिय असणाऱ्या बाबासाहेबांना भ्रष्टाचार, अनीती, अत्याचार, अन्याय यांचा प्रखर तिरस्कारर होता. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड असे ते मानत असत. ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. त्यातमुळेच तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्या चा त्यांअचा संकल्पय होता. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्कही आपल्याला कळत नाहीत ही शिकवण देत सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले. स्त्रियांना पुरूषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. दलितांना सन्मा नाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहिले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधीही त्यांषनी जोरदार लढा दिला.

जगभरातील ६५ पेक्षा अधिक देशांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षात साजरी केली जाते. बाबासाहेबांच्या १४ एप्रिल या जन्मदिवशी प्रत्येक वर्षी त्यांचे लक्षावधी अनुयायी नागपूरातील दीक्षास्थळ, दीक्षाभूमी येथेदेखील त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. याच दिक्षाभूमीविषयी थोडेसे जाणून घेऊया. नागपूर शहर व संपूर्ण महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे दीक्षाभूमी. रामदास पेठेजवळ व माता कचेरी परिसरासमोर उपराजधानी नागपूरमध्ये स्थित हे ठिकाण आहे. याला धम्मचक्र स्तूप असेही म्हटले जाते. दरवर्षी लाखो भीम अनुयायी व पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशधनाच्या कालावधीत मीदेखील दरवर्षी दिक्षाभूमीला आवर्जून भेट देतो. अत्यंत शांत, अचल व मनःशक्ती वाढवणारे हे ठिकाण आहे. बाजूला अगदी विस्तीर्ण मैदान, बोधीवृक्ष व आकर्षक प्रवेशद्वार यामुळे दिक्षाभूमीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. दीक्षाभूमी हे बौद्ध धर्मियांचे अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये डॉ. भीमराव रामजी (बाबासाहेब) आंबेडकरांनी लाखो दलित लोकांसह याच जागेवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. एकाच दिवशी तेही शांततेच्या मार्गाने घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे पहिलेच धर्मांतर होते.

दरवर्षी यादिवशी लाखो लोक इथे जमा होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहानी साजरा करतात. दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे. कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहयला मिळतो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. याच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाइटचा वापर केलेला आहे. दीक्षाभूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे. दीक्षाभूमीचा आकार हा एका भव्य बौद्ध स्तुपाप्रमाणे आहे. म्हणून याला ‘धम्मचक्र स्तूप’ असेही म्हटले जाते. भारतातील व विदेशातील, मुख्यत्वे जपान, जर्मनी, म्यानमार, श्रीलंका येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट असतात. यात बौद्ध उपासक व भिख्खू अधिक असतात. सम्राट अशोकांनी इसवीसनपूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि म्हणून बौद्ध इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. या स्थळाला राज्य सरकारने अ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिलेला असून दरवर्षी येथे पंचवीस लाखापेक्षा अधिक देशी, विदेशी बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात. नागपूर शहराच्या केंद्रस्थानी असलेले हे स्थळ मनःशांतीचे उत्तम ठिकाण आहे.

डॉ. बाबासाहेबांची शिकवण व त्यांउचे कार्य आज देशाला आदर्शवत व मार्गदर्शक असून त्यांरच्याा नावाने जगभरात उभ्याद राहिलेल्याग शैक्षणिक व सामाजिक संस्थाय तसेच वास्तू त्यांरच्याा कार्याची साक्ष आपल्यावला वेळोवेळी देत असतात. त्या‍मुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही या विश्वाला मिळालेली महान देणगीच आहे. अशा या महामानवाला विनम्र अभिवादन.”
 

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content