Details
भारतीयांनी काश्मीर पर्यटनावर बहिष्कार घालावा – डॉ. मनीषा कायंदे
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
काश्मीर प्रश्न सुटल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही हे पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने सिद्ध झाले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले असून उरीमध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्याविरोधात रशिया, भूतान, अमेरिका, कॅलिफोर्निया, अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, इस्राईलसह जगभरातील अनेक देशांनी भारतीय जवानांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. गेल्या काही काळात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या घडामोडी या सगळ्याच देशाच्या चिंतेचा विषय झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील तरूणांनी, महिला व लहान मुलांनीदेखील जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलातील व भारतीय सैन्यांच्या ताफ्यावर दगडफेक फेकण्यापर्यंत मजल मारली आहे. या मानसिकतेवर जर अंकुश ठेवायचा तर जम्मू काश्मीरमधील नागरिकांची आर्थिक रसद बंद केली पाहिजे. त्यासाठी या हल्ल्याच्या निषेधार्थ पुढील २ वर्षे सर्व भारतीयांनी काश्मीर पर्यटनावर बहिष्कार घालावा, असे आवाहन शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केले आहे.
काश्मीरमधील भौगोलिक समृद्धीने व सुंदरतेने सदैव परदेशी व देशातील पर्यटकांना आपलेसे केले आहे व अनेक पर्यटकांचा ओढा हा जम्मू-काश्मीरची अनुभूती घेण्यासाठी असतो व हीच बाब तेथील स्थानिक नागरिकांसाठी फायद्यासाठी ठरत आहे. परंतु या अर्थाजनाचा वापर जर भारताच्या व भारतीय सैनिकांच्या विरोधात होत असेल तर भारतातल्या नागरिकांनी जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर पुढील दोन वर्षांसाठी बहिष्कार घालावा. दहशतवादाविरोधात लष्कर योग्य पद्धतीने कारवाई करत असते. परंतु लष्कर व दहशतवाद्यांमध्ये जेथे चकमक घडते, तेथे आसपासच्या गावातील युवक एकत्र येतात. दगडफेक करून दहशतवाद्यांना तेथून पळून जाण्यासाठी मदत करतात.जम्मू-काश्मीरमधील ही लढाई आता फक्त भारतीय सैन्याची नसून भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे या पर्यटन बंदीसाठी आपण सर्वानीच पुढाकार घेतला पाहिजे. चीन हा आपला मित्र असल्याचे वरकरणी दिसत असले तरी संयुक्त राष्ट्र सभेमध्ये चीनने पाकिस्तानाच्या बाजूने नेहमीच कौल दिलेला आहे, हे कधी विसरता कामा नये व यासाठी “मेड इन चायना” वस्तूंवर बाहिष्कार घालून चीनची आर्थिक कोंडी करायला हवी, असेही त्या म्हणाल्या.”
“केएचएल न्यूज ब्युरो