HomeArchiveभारतातील दहापैकी आठ...

भारतातील दहापैकी आठ मुलांमध्ये आढळल्या मौखिक समस्या

Details
भारतातील दहापैकी आठ मुलांमध्ये आढळल्या मौखिक समस्या

    11-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
कोलगेट पामॉलिव्ह इंडिया लिमिटेडकरीता कांटर आरएमआरबीकडून राष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, भारतातील १० पैकी ८ मुलांमध्ये मौखिक आरोग्याच्या समस्या आहेत व त्यावर लगेच इलाज करणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये आढळणार्याल काही समस्यांमध्ये प्लाक जमा होणे, दातांवरील पांढरे डाग, दिसून येणारी कीड, ‍हिरड्यांना सूज येणे, श्वासांना दुर्गंधी येणे आणि हिरड्यांतून रक्त येणे इत्यादींचा समावेश आहे. सर्वेक्षणातून हेही दिसून आले की ३ पैकी २ मुलांमध्ये कीड असून ती कीड वाढण्याचा धोका आहे. अभ्यासातून हेही दिसून आले की, १० पैकी ८ मोठ्या लोकांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर मौखिक आरोग्याच्या समस्या आहेत.
 
देशभरांतून आलेल्या निष्कर्षातून असे दिसून आले की, देशभरांतील प्रदेशानुसार मौखिक आरोग्याच्या समस्येची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे. पूर्व भारत (८९ टक्के), पश्चिम भारत (८८ टक्के), उत्तर भारत (८५ टक्के) आणि दक्षिण भारत (६४ टक्के). मौखिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त अशा मोठ्या शहरांमध्ये टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे- मुंबई (९० टक्के), कोलकाता (९३ टक्के), हैद्राबाद (८२ टक्के), दिल्ली, (७९ टक्के), चेन्नई (६८ टक्के) आणि बंगलोर (४६ टक्के).
 
 
सर्वेक्षणातून आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. ती म्हणजे मुलांचे खरे मौखिक आरोग्य आणि त्यांच्या पालकांनी केलेल्या अपेक्षा यांमध्ये मोठी तफावत आहे. असे होणे स्वाभाविक आहे कारण अधिकतर लोकांमध्ये मौखिक आरोग्याविषयी जागरूकता नाही. १०पैकी किमान ८ पालकांमध्ये असे दिसून आले की, पालकांना असे वाटते की त्यांच्या मुलांचे दात आरोग्यपूर्ण आहेत. पण, ज्यावेळी दातांची तपासणी केली जाते त्यावेळेस त्यांना असे आढळून आले की, ८० टक्के मुलांमध्ये किमान एका प्रकारची मौखिक आरोग्याची समस्या आहे. सत्य आणि पालकांचा दृष्टीकोन यांतील फरक हा सर्वाधिक प्रमाणात कोलकाता (९२ टक्के), त्यानंतर मुंबई (८८ टक्के) आणि हैद्राबाद (८० टक्के) आढळून आला.
 
 
अभ्यासातून असेही दिसून आले की, भारतातील अधिकतर मुले ही दोन वेळा दात घासणे किंवा नियमितपणे दातांची तपासणी करणे यासारख्या मुलभूत अशा मौखिक आरोग्याच्या गोष्टी करत नाहीत. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ७० टक्के मुलांमध्ये हे आढळून आले आहे की, ते दिवसातून दोनदा दात ब्रश करत नाहीत. ६० टक्क्यांहून अधिक मुलांनी मागील एक वर्षाच्या कालावधीत डेंटिस्टला भेट दिलेली नाही. त्याचबरोबर सर्वेक्षणातून हे दिसून आले की, १०पैकी ८ मुलांमध्ये दातांची समस्या रोज गोड खाण्याने निर्माण झालेली आहे. जवळजवळ ४४ टक्के मुलांमध्ये मोठ्या अशा उपचारांची गरज भासली आहे. यामध्ये रिस्टोरेशन, रूट कॅनल किंवा दात काढून टाकावा लागला आहे.
 
 
अधिकतर पालकांना हे माहित नाही की, दुधाच्या दातांची सुध्दा काळजी ही बाळाच्या तोंडात दात आल्यापासून घ्यावी लागते. हे दात लहान मुलाच्या एकंदरीत वाढीवर परिणाम करत असतात. कारण, ते ज्यावेळी पोषक घटक चावून खात असतात. त्यावेळी जबड्याची वाढही होत असते. यामुळे मजबूत दात आणि आरोग्यपूर्ण हास्याचा पाया घातला जात असतो. मोठ्या प्रमाणावर कीड आणि मौखिक आरोग्याच्या समस्येमुळे दुधाच्या दातांच्या मुळावर परिणाम होत असतो, असे इंडियन सोसायटी ऑफ पेडोडेंटिस्ट्स ॲन्ड प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री (आयएसपीपीडी)च्या सदस्या डॉ. ‍मीनाक्षी एस. खेर यांनी सांगितले.
 
 
सर्वेक्षणातून बाहेर आलेल्या निष्कर्षांविषयी चिंता व्यक्त करतांना इंडियन असोसिएशन ऑफ पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. व्ही. गोपालकृष्णन यांनी सांगितले की, या अभ्यासातून देशभरांतील मौखिक आरोग्याची समस्या अधोरेखित होते. जेणेकरून, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अनेक असे अभ्यास करण्यात आले आहेत ज्यातून मौखिक आरोग्याच्या समस्या अशाचप्रकारे अधोरेखित होत आहेत. मधुमेह, बाळाची पूर्ण वाढ न होणे आणि वजन कमी असणे तसेच ऑथोरोस्केलोसिस अशा आजारांमुळेही हे घडू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, दातांच्या समस्यांचे व्यवस्थापन आणि चांगले मौखिक आरोग्य यामुळे दात मजबूत होऊन व्यक्तीचे एकंदरीत जीवन चांगले होण्यास मदत होते.
 
 
सर्वेक्षणाची पद्धत
 
 
या सर्वेक्षणाचे आयोजन हे कांटर आयएमआरबी यांनी २०३० मोठ्या व्यक्ती आणि १०८० मुलांमध्ये करण्यात आले होते. हा गट भारतातील १२ शहरांमधून व विविध सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतील होता. या शहरांमध्ये दिल्ली, चंदिगढ, लखनौ, मुंबई, अहमदाबाद, पुणे, हैद्राबाद, चेन्नई, बंगलोर, कोलकाता, भुवनेश्वर आणि पाटना यांचा समावेश होता. या सर्वेक्षणाचे आयोजन हे प्रत्येक शहरांत आयोजित करण्यात आलेल्या कोलगेट डेंटल कँपमध्ये दोन डेंटिस्ट आणि कांटर आयएमआरबीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यातून दातांची तपासणी केल्यानंतर मौखिक आरोग्याविषयी डेंटिस्टद्वारा माहिती देण्यात आली. नंतर त्यांना त्यांच्या मौखिक आरोग्याविषयी माहिती देणार्याद डेंटल कार्डचेही वाटप करण्यात आले.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“कोलगेट पामॉलिव्ह इंडिया लिमिटेडकरीता कांटर आरएमआरबीकडून राष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, भारतातील १० पैकी ८ मुलांमध्ये मौखिक आरोग्याच्या समस्या आहेत व त्यावर लगेच इलाज करणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये आढळणार्याल काही समस्यांमध्ये प्लाक जमा होणे, दातांवरील पांढरे डाग, दिसून येणारी कीड, ‍हिरड्यांना सूज येणे, श्वासांना दुर्गंधी येणे आणि हिरड्यांतून रक्त येणे इत्यादींचा समावेश आहे. सर्वेक्षणातून हेही दिसून आले की ३ पैकी २ मुलांमध्ये कीड असून ती कीड वाढण्याचा धोका आहे. अभ्यासातून हेही दिसून आले की, १० पैकी ८ मोठ्या लोकांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर मौखिक आरोग्याच्या समस्या आहेत.”
 

“देशभरांतून आलेल्या निष्कर्षातून असे दिसून आले की, देशभरांतील प्रदेशानुसार मौखिक आरोग्याच्या समस्येची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे. पूर्व भारत (८९ टक्के), पश्चिम भारत (८८ टक्के), उत्तर भारत (८५ टक्के) आणि दक्षिण भारत (६४ टक्के). मौखिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त अशा मोठ्या शहरांमध्ये टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे- मुंबई (९० टक्के), कोलकाता (९३ टक्के), हैद्राबाद (८२ टक्के), दिल्ली, (७९ टक्के), चेन्नई (६८ टक्के) आणि बंगलोर (४६ टक्के).”
 
 
“सर्वेक्षणातून आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. ती म्हणजे मुलांचे खरे मौखिक आरोग्य आणि त्यांच्या पालकांनी केलेल्या अपेक्षा यांमध्ये मोठी तफावत आहे. असे होणे स्वाभाविक आहे कारण अधिकतर लोकांमध्ये मौखिक आरोग्याविषयी जागरूकता नाही. १०पैकी किमान ८ पालकांमध्ये असे दिसून आले की, पालकांना असे वाटते की त्यांच्या मुलांचे दात आरोग्यपूर्ण आहेत. पण, ज्यावेळी दातांची तपासणी केली जाते त्यावेळेस त्यांना असे आढळून आले की, ८० टक्के मुलांमध्ये किमान एका प्रकारची मौखिक आरोग्याची समस्या आहे. सत्य आणि पालकांचा दृष्टीकोन यांतील फरक हा सर्वाधिक प्रमाणात कोलकाता (९२ टक्के), त्यानंतर मुंबई (८८ टक्के) आणि हैद्राबाद (८० टक्के) आढळून आला.”
 
 
“अभ्यासातून असेही दिसून आले की, भारतातील अधिकतर मुले ही दोन वेळा दात घासणे किंवा नियमितपणे दातांची तपासणी करणे यासारख्या मुलभूत अशा मौखिक आरोग्याच्या गोष्टी करत नाहीत. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ७० टक्के मुलांमध्ये हे आढळून आले आहे की, ते दिवसातून दोनदा दात ब्रश करत नाहीत. ६० टक्क्यांहून अधिक मुलांनी मागील एक वर्षाच्या कालावधीत डेंटिस्टला भेट दिलेली नाही. त्याचबरोबर सर्वेक्षणातून हे दिसून आले की, १०पैकी ८ मुलांमध्ये दातांची समस्या रोज गोड खाण्याने निर्माण झालेली आहे. जवळजवळ ४४ टक्के मुलांमध्ये मोठ्या अशा उपचारांची गरज भासली आहे. यामध्ये रिस्टोरेशन, रूट कॅनल किंवा दात काढून टाकावा लागला आहे.”
 
 
“अधिकतर पालकांना हे माहित नाही की, दुधाच्या दातांची सुध्दा काळजी ही बाळाच्या तोंडात दात आल्यापासून घ्यावी लागते. हे दात लहान मुलाच्या एकंदरीत वाढीवर परिणाम करत असतात. कारण, ते ज्यावेळी पोषक घटक चावून खात असतात. त्यावेळी जबड्याची वाढही होत असते. यामुळे मजबूत दात आणि आरोग्यपूर्ण हास्याचा पाया घातला जात असतो. मोठ्या प्रमाणावर कीड आणि मौखिक आरोग्याच्या समस्येमुळे दुधाच्या दातांच्या मुळावर परिणाम होत असतो, असे इंडियन सोसायटी ऑफ पेडोडेंटिस्ट्स ॲन्ड प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री (आयएसपीपीडी)च्या सदस्या डॉ. ‍मीनाक्षी एस. खेर यांनी सांगितले.”
 
 
“सर्वेक्षणातून बाहेर आलेल्या निष्कर्षांविषयी चिंता व्यक्त करतांना इंडियन असोसिएशन ऑफ पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. व्ही. गोपालकृष्णन यांनी सांगितले की, या अभ्यासातून देशभरांतील मौखिक आरोग्याची समस्या अधोरेखित होते. जेणेकरून, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अनेक असे अभ्यास करण्यात आले आहेत ज्यातून मौखिक आरोग्याच्या समस्या अशाचप्रकारे अधोरेखित होत आहेत. मधुमेह, बाळाची पूर्ण वाढ न होणे आणि वजन कमी असणे तसेच ऑथोरोस्केलोसिस अशा आजारांमुळेही हे घडू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, दातांच्या समस्यांचे व्यवस्थापन आणि चांगले मौखिक आरोग्य यामुळे दात मजबूत होऊन व्यक्तीचे एकंदरीत जीवन चांगले होण्यास मदत होते.”
 
 
सर्वेक्षणाची पद्धत
 
 
“या सर्वेक्षणाचे आयोजन हे कांटर आयएमआरबी यांनी २०३० मोठ्या व्यक्ती आणि १०८० मुलांमध्ये करण्यात आले होते. हा गट भारतातील १२ शहरांमधून व विविध सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतील होता. या शहरांमध्ये दिल्ली, चंदिगढ, लखनौ, मुंबई, अहमदाबाद, पुणे, हैद्राबाद, चेन्नई, बंगलोर, कोलकाता, भुवनेश्वर आणि पाटना यांचा समावेश होता. या सर्वेक्षणाचे आयोजन हे प्रत्येक शहरांत आयोजित करण्यात आलेल्या कोलगेट डेंटल कँपमध्ये दोन डेंटिस्ट आणि कांटर आयएमआरबीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यातून दातांची तपासणी केल्यानंतर मौखिक आरोग्याविषयी डेंटिस्टद्वारा माहिती देण्यात आली. नंतर त्यांना त्यांच्या मौखिक आरोग्याविषयी माहिती देणार्याद डेंटल कार्डचेही वाटप करण्यात आले.”

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content