Details
भारताच्या संरक्षणासाठी प्रभावी ‘शक्ती’केंद्र!
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
मेरे प्यारे देशवासियों.. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी देशाशी दोन शब्द बोलणार असल्याची घोषणा केली तेव्हा संपूर्ण देशाच्या काळजाचा ठोका चुकला होता. कारण मोदींच्या मन की बातचा पूर्वानुभव प्रत्येकाच्याच मनात जागा होता. पण निवडणुका तोंडावर आहेत आणि मोदी बोलणार म्हटल्यावर अनेकांनी आपापल्या परीने अर्थ काढले. अगदी सर्जिकल स्ट्राईकपासून आर्थिक क्रांतीकारक निर्णयांपर्यंत सर्व शक्यतांची उजळणी झाली. पण तासभर देशाला ताटकळत ठेवून मोदी जेव्हा माईकसमोर आले आणि जे काही बोलले त्यामुळे अवघ्या देशाची मान अभिमानाने ताठ झाली. पृथ्वीसमीप कक्षेतून भारतावर नजर ठेवणाऱ्या कोणत्याही उपग्रहाला क्षेपणास्त्राने उडवण्याची क्षमता भारताने प्राप्त केली आहे आणि अशाच एका उपग्रहाच्या तीन मिनिटांत उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राने ठिकऱ्या उडवल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.
आजवर अमेरिका, रशिया आणि चीनकडे असलेली ही क्षमता प्राप्त करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. आपल्या शास्त्रज्ञांचे, अंतराळ संशोधकांचे, संरक्षण संशोधन खात्यातील वैज्ञानिकांचे हे परिश्रम आज फलद्रुप झाले आहेत. संरक्षण सिद्धतेतील हे अत्यंत महत्त्वाचे अस्त्र भारताच्या ताफ्यात शानसे सामील झाले आहे. मोदींनी ही माहिती दिल्यावर लगेचच उलटसुलट चर्चा सुरू झाली. मोदींनी घोषणा करताना याबद्दल कुठलेही श्रेय स्वत:कडे घेतले नसले तरी त्यांना जो संदेश द्यायचा होता तो त्यांनी देशातील जनतेपर्यंत बरोब्बर पोहोचवला आहे. विरोधी पक्षांना ते अर्थातच खटकणार होतेच. मोदींनी डागलेल्या या क्षेपणास्त्रावर त्यामुळे उलटसुलट चर्चा दिवसभर सुरू होती.
जी घोषणा वैज्ञानिकांनी किंवा फार तर लष्करप्रमुखांनी करायला हवी होती त्यासाठी मोदी कशाला हवेत? मोदींनी हे सर्व निवडणुकीतील मायलेजसाठी केलंय, असा सूर विरोधी पक्षांनी लावला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही वैज्ञानिकांचे अभिनंदन करतानाच, मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत एक लघु क्षेपणास्त्र मोदींच्या दिशेने डागण्याची संधी सोडली नाही. असे असले तरी अंतराळ खाते मोदी यांच्याच अखत्यारीत येत असल्याने त्यांनी ही महत्त्वाची घोषणा करणे यात तसे वावगे काहीही नाही. गैर आहे ते इतकेच की पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार लगेचच सोशल मीडियावर खंबीर आणि निर्णयक्षम नेतृत्त्वाचे ढोल वाजायला लागले, आधीच्या सरकारने कशी परवानगी दिली नव्हती, मोदींनी आणि डोवल यांनी कसे हे एका फटक्यात घडवून आणले अशा सर्व पडद्याआडच्या घडामोडी तत्काळ खुल्या झाल्या.
उपग्रह पाडण्याचे अचूक टायमिंग साधणाऱ्या टीमला हे टायमिंग साधणे तर फारच सोपे होते. काहीही असले तरी भारताने एक निर्णायक क्षमता प्राप्त केली आहे आणि त्याबद्दल सरकारचे व मोदी यांचे अभिनंदन विरोधकांनाही पोटशूळ बाजूला ठेवून करावेच लागेल. मिशन शक्ती असे या मोहिमेचे नामकरण झाले होते. या मोहिमेसाठी आवश्यक असा उपग्रह भारताने आधीच पृथ्वीसमीप कक्षेत पाठवला होता. ए सॅट अर्थात अॅण्टी सॅटेलाइट मिसाईलने याच उपग्रहाचा अवघ्या तीन मिनिटांत अचूक वेध घेतला. विशेष म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात भारताने हे यश मिळवले आहे. आमचे हे नवे तंत्रज्ञान आणि ताकद कुठल्याही देशाच्या विरोधात नाही तर एक विकासाचा भाग म्हणून विकसित केले आहे. आमचा मूळ हेतू शांतता टिकवून ठेवणे आहे. आमच्या या यशस्वी प्रयोगाने कुठल्याही आंतरराष्ट्रीय कराराचे वा कायद्याचे उल्लंघन करण्यात आले नाही. समस्त भारतीयांना सुरक्षित ठेवणे हाच आमचा उद्देश आहे, असे सांगताना मोदी यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.
निवडणुका समोर असताना देशासमोरील विविध प्रश्नांवरून जनतेचे लक्ष पुन्हा एकदा पाकिस्तान, चीनचा धोका आणि त्याला तोंड देण्याची भारताची संरक्षणसज्जता या मुद्द्याकडे वळवले आहे. भारतीय प्रदेशातील घडामोडी, सीमाभागातील सैन्यदलांच्या हालचालींवर अमेरिका, चीन यांचे उपग्रह नेहमीच नजर ठेवून असतात. दूर अंतराळातून ही हेरगिरी सुरू असते. यामुळे भारताच्या क्षमतांविषयी संवेदनशील माहिती इतर देशांकडे पोहोचते. याच उपग्रहांचा उपयोग युद्धकाळात क्षेपणास्त्रे दूरनियंत्रित करण्यासाठीही होऊ शकतो. पण आता भारताने असे उपग्रह उडवून देण्याची क्षमता प्राप्त केली आहे. याचाच एक उपभाग म्हणजे भारताच्या दिशेने येणारे एखादे दूरनियंत्रित क्षेपणास्त्रही भारताचे हे उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र शत्रूच्या भूभागातच अचूकपणे उडवून देता येऊ शकते.
शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने रशियाविरोधात स्टार वॉरची अर्थात अंतराळातून क्षेपणास्त्र युद्ध करण्याची, रशियाचे उपग्रह निकामी करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणायला सुरूवात केली होती. चीनचेही काही उपग्रह अशा क्षमतांनी सिद्ध आहेत. या उपग्रहांना भारताचे हे उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र जागेवरच निकामी करू शकते. अमेरिका आणि चीनच्या सामरिक हालचाली या बहुतांशी उपग्रहांमार्फत होणाऱ्या संदेशवहनावर अवलंबून असतात. असे उपग्रह निकामी झाले तर या हालचाली, संदेशवहन, क्षेपणास्त्र हल्ल्याची आखणी या सगळ्या गोष्टी अडतात. पाकिस्तान वा चीनसोबत युद्धाची वेळ ओढवलीच तर भारतासाठी हे उपग्रहभेदी क्षेपणास्त्र शत्रूची वाताहात करणारे एक प्रभावी शक्तीकेंद्रच ठरणार आहे.”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान