Details
भाजप-शिवसेना युतीत काय चाललंय?
01-Jul-2019
”
विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
भारतीय जनता पक्षाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच भाषण खऱ्या अर्थाने गाजले आणि रंगलेही. ही बैठक नव्ह्रे तर एकप्रकारे मेळावाच ठरला. आगामी विधानसभेच्या निवडणुकीची या मेळाव्यास पार्श्वभूमी लाभल्याने जणू प्रचाराचा नारळच वाढवला गेला असे म्हटले तरी चालेल. मुख्यमंत्री फडणवीसांचे भाषण मंत्रमुग्ध करणारे ठरले. खरं तर त्यांचे असे भाषण प्रथमच झाले. फडणवीस भाषणासाठी प्रसिद्ध नाहीत. पण गोरेगावातील त्या भाषणाने फडणवीस यांनी ती कमतरता पुसून टाकली. त्यांच्या भाषणाला दाद द्यावीच लागेल. असो.
विधिमंडळाच्या अखेरच्या पावसाळी अधिवेशनात भाषण करताना मी पुन्हा येईन अशा काव्यमय शब्दात मुखमंत्री फडणवीसांनी प्रचंड आत्मविश्वास बोलून दाखविला. सरकारच्या कामाचा आढावा घेत-घेत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील खदखदही नकळत व्यक्त केली. कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळत नाही, हेही त्यांनी सांगून टाकले आणि त्याच कार्यकर्त्यांना त्यांनी देव मानले. कार्यकर्तेच ही आपली शक्ती आहे अशी कबुली दिली. भाजप आणि शिवसेनेच्या सत्तेत कार्यकर्ता उपाशीच राहतो हे वास्तव आहे. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात कार्यकर्ते गब्बर होतात हेही कटू सत्य आहे. वैयक्तिक कामातच रस घेणारे सरकार लोकप्रिय होऊ शकत नाही. तर राज्यातील समस्या, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, शेती आणि उद्योग यासाठी धोरणात्मक निर्णय आणि कायदे करणारे कोणतेही सरकार यशस्वी म्हणायला पाहिजे. त्यानुसार फडणवीस सरकार जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे आहे.
तासाभराच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीसांनी पक्षात जोश आणलाच, पण नेत्यांनाही खडे बोल सुनावले. त्याच मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वबळाची हाळी दिलीच. संपूर्ण २८८ मतदारसंघात कामाला लागण्याचे फर्मान त्यांनी काढले. युतीची काळजी फडणवीस करतील, असे पाटील म्हणाले. पाटलांच्या मनात मुख्यमंत्री होण्याचे मांडे होतेच. मराठा मुख्यमंत्री करायचा असेल तर त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यांचा घोडा तयार होता म्हणे. मात्र फडणवीस हे सर्वांना सोबत घेऊन आणि विकासाचा अजेन्डा राबविणारे नेते आहेत. त्यांची पहिली टर्मही यशस्वी झाली. ते लोकप्रिय नसले तरी वादग्रस्तही ठरले नाहीत, हेही त्यांचे वैशिष्ट्यच मानावे लागेल.
भाजप हा युतीतील मोठा पक्ष आहे. सध्या या पक्षाचे विधानसभेतील संख्याबळ शिवसेनेपेक्षा दुप्पट आहे. मित्रपक्ष भाजपचेच. परिणामी पुन्हा अधिक आमदार भाजपचेच असणार हे वास्तव आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री त्याच भाजपचा असणार हेही पुन्हा वास्तव आहे. मात्र युतीत प्रभावी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला हे गणित मान्य नाही. मुख्यमंत्री आमचाच असा दावा काही वाचाळ नेते करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे ते नुकसान करत नाहीत काय? ज्यावेळी शिवसेनेने कच खाल्ली. भाजपनेच शिवसेनेला वश केले. जणू काही मतभेद झाले नाहीत, संघर्ष पेटलाच नाही, असे सोयीचे नाटय़ घडवून आणले गेले. लोकांना धरसोडीच्या राजकारणात रस नसला तरी मतदानाच्यावेळी हीच जनता समजंसपणे निर्णय घेत असते.
मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री अशी गुगली मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाकली आणि शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेवर पाणी पडले. अलिकडेच राजकारणात सक्रीय झालेल्या आदित्य यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली. हे जरा अतिच झाले, अशी जनभावना आहे. मुख्यमंत्रीपद सांभाळण्यासाठी अनेक गुणांची गरज असतेच. शिवाय राज्याचा, देशाचा, प्रश्न आणि समस्यांची जाण हवी असते. सोळा तास काम करण्याची क्षमता आणि हजारो, लाखो लोकांना जिंकण्याची कलाही अंगी असावी लागते. सर्व समाजघटक, गटा-तटांचे राजकारण माहित असावे लागते. अभ्यासानी प्रकटावे लागते. मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस-आदित्य यांच्यात स्पर्धा कशी होऊ शकेल? राजकारण करतानाही काही सभ्यता पाळावी लागते. पक्षाचा कार्यक्रम म्हणून कार्यकर्त्यांना स्वप्न दाखविले ठिक आहे. पण वास्तवाचे भान सोडून कसे चालेल. युती असली तरीही मुख्यमंत्रीपदासाठी दोन समांतर यात्रा राज्यात निघतात. याचा अर्थ काय घ्यायचा? मैत्री निभावणे सोपं नसते. भाजपाचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचंड आत्मविश्वास पाहता, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ऐनवेळी युती तोडत शिवसेनेला दगा देतील, असे बोलले जातेय. भावी धोका लक्षात घेऊन शिवसेनेने स्वबळाची अप्रत्यक्ष चाचपणी सुरू केली आहे हे मात्र नक्की.”
“विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार