HomeArchiveब्रुसेल्स मध्ये पासपोर्ट...

ब्रुसेल्स मध्ये पासपोर्ट चोरी झाला अन्..

Details
ब्रुसेल्स मध्ये पासपोर्ट चोरी झाला अन्..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

किरीट सोमय्या, माजी खासदार
[email protected]

माझे मित्र असलेले आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी रविवारी मला फोन केला. तो दिवस होता 19 मे 2019. त्यावेळी संध्याकाळचे 5 वाजले असतील. ते मला म्हणाले की, त्यांचे मित्र अवधूत पै आपल्या कुटुंबासह युरोप दौऱ्यावर गेले होते. विनोदजी म्हणाले की, किरीटजी, माझा मित्र, अवधूतने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे पासपोर्ट त्यांच्या पर्ससहित हरवले आहेत. आता अवधूत अगदीच त्रस्त झालेले आहेत.

अवधूतने विनोदजींना सांगितले होते की, विनोद, माझे पाकीट, पासपोर्ट, सर्व काही चोरीला गेलेले आहे. आता काय करावे? आम्ही सर्वजण ब्रुसेल्सला (बेल्जियम) आहोत.

मी विनोदजींना सांगितले की, मला अवधूत पै यांचा फोन नंबर पाठवा. मी तत्काळ अवधूतना फोन केला, जे ब्रुसेल्समध्ये होते. 5.09 च्या दरम्यान त्यांनी मला माहिती पाठविली.
Whatsapp वरील आमचे संभाषण याप्रमाणे..

विनोद तावडेंनी ज्यांच्याबद्दल आपणांस सांगितले तो मी अवधूत पै. मी माझ्या सर्व कुंटुबियांसोबत ब्रुसेल्समध्ये (बेल्जियम) मोठ्या संकटात सापडलो आहे. आमची ब्रुसेल्समध्ये चोरी झालेली आहे. आम्ही आमचे पासपोर्ट आणि सर्व कागदपत्रे हरवून बसलो आहोत. जर तुम्ही भारतीय दूतावासामार्फत मदत करू शकलात तर ती खूप मोठी मदत ठरेल. मी तुम्हाला सर्व कागदपत्रे Whatsapp करतो.

मुंबईस्थित अवधूत पै आपली पत्नी व मुलांसह दौऱ्यावर गेले होते. ब्रुसेल्समध्ये असताना त्यांची चोरी झाली त्यात त्यांचे पैसे, पासपोर्ट आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे हरवली. तो रविवारचा दिवस असल्याने त्यांनी काहीजणांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही ते असमर्थच राहिले. अशा परिस्थितीत एक भारतीय कुटूंब असहाय्य झाले होते. कोणी मदत करणारे नव्हते. कोणाशी संभाषण करावे? काय करावे? काहीच कळत नव्हते.

अवधूत लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील मंत्री असलेल्या विनोद तावडे यांचे मित्र असल्याने त्यांनी तत्काळ मदत मागितली. विनोदजींनी तत्काळ माझ्याशी संपर्क केला व हालचालींना सुरूवात झाली. विनोद तावडे (मुंबई) आणि अवधूत पै (ब्रुसेल्स बेल्जियम) यांच्याशी संपर्क झाल्यानंतर मी परराष्ट्र मंत्रालयातल्या आणि भारतीय वकिलातीच्या महत्त्वाच्या व्यक्ती व माझे सचिव पंकज बिश्त यांच्याशी संपर्क केल्यानंतर हालचाली सुरू झाल्या.

हा प्रसंग 19 मे, 2019 रोजी म्हणजे निवडणुकीनंतर मतमोजणीच्या आधी चार दिवस घडला होता.
लगेचच, मी सुषमा स्वराज यांचे अतिरिक्त खाजगी सचिव विजय द्विवेदी यांच्याशी संपर्क केला. विजय द्विवेदी यांनी मला लगेचच प्रतिसाद देऊन तपशील पाठविण्यास सांगितले.
विजय द्विवेदी यांच्या सोबतचे संभाषण खालीलप्रमाणे:-

प्रिय, विजयजी, डॉ. किरीट सोमय्या, खासदार आणि कामगार स्थायी समिती अध्यक्ष यांनी दर्शविल्याप्रमाणे अवधूत यांच्या परिवाराबाबत, ज्यांनी ब्रुसेल्समध्ये आपले पासपोर्ट हरवले आहेत..

Whatsapp वरील संदेश पुढीलप्रमाणे..

विजय द्विवेदी यांनी मला लगेचच प्रतिसाद देऊन तपशील पाठविण्यास सांगितले. काही वेळातच विजयने प्रतिसाद दिला. 9819955555 अवधूत पै हे ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे लुटले गेले, पासपोर्टदेखील गहाळ झालेत. रावत यांच्या वरिष्ठांनी मला खात्री दिली की पै यांची काळजी घेतली जाईल.

ब्रुसेल्स राजदूत यांच्याकडून आलेला संदेश.

मी माझे दिल्ली सचिव पंकज बिश्त यांच्याशीदेखील संवाद साधला. हा संवाद खालीलप्रमाणे:
मी अवधूत पै, विनोद तावडे यांच्या संदर्भाने, मी आणि माझ्या कुटुंबाने आमचे पासपोर्ट आणि ओळखपत्रे हरवल्याने मोठ्याच संकटात आहोत. जर आपण भारतीय दूतावासातून काही मदत मिळवून दिलीत तर फार मदत होईल. मी आपणास सर्व कागदपत्रे Whats App वर पाठविली आहोत.
 
पंकज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना तपशील पाठवला. ते विनोद तावडे, विरेंद्र सिंह रावत आणि अवधूत पै यांच्या संपर्कात होते.

विजय द्विवेदी यांनी ब्रुसेल्स, बेल्जियम येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील संबंधित अधिकारी रावत यांच्याशी संवाद साधला. पंकज यांनी रावत यांच्या दूरध्वनी क्रमांकावर मला फोन करून मला संपर्क साधण्यास सांगितले. रावत यांनी अर्ध्या तासाच्या संभाषणात मला प्रतिसाद दिला. रावतजी यांनी मला आश्वासन दिले की, पै यांना संपूर्ण सहाय्य देण्यात येईल आणि त्यांची काळजी घेतली जाईल.

दरम्यान मी अवधूत पै आणि विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला. तावडे यांच्याशी माझा संवाद खालीलप्रमाणे..
माझं परराष्ट्र मंत्रालय आणि अवधूत पै यांच्याशी बोलणे झाले.. काम होऊन जाईल..
कामातला समन्वय पूर्ण झालेला आहे. विरेंद्र सिंह रावत वाणिज्य दूतावास 0032-476-748-575 यांचं अवधूत पै यांच्याशीदेखील बोलणं झालं आहे.
काय बात आहे.. सरजी ग्रेट..

संध्याकाळी 5.27 वाजता मी तावडे यांना कळविले की मी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी आणि अवधूत पै यांच्याशी संपर्क साधला आहे.
5.57 वजता मी एकदा तावडे यांना कळविले की, कार्य पूर्ण झाले, समन्वय पूर्ण झाला..
6.03 वाजता विनोदजींनी मला “क्या बात है.. सरजी ग्रेट” असा प्रतिसाद पाठविला. भाजपाचे वरिष्ठ नेते, माझे सहकारी यांनी केलेल्या अशा प्रशंसेनंतर चांगलं काम करण्यासाठी पाठबळ मिळालं.
संध्याकाळी 7.30 वाजता विजय द्विवेदी यांनी मला ब्रुसेल्समधल्या भारतीय वाणिज्य दूतावासाकडून प्राप्त झालेला संदेश पाठविला.

ब्रुसेल्सच्या राजदूतांकडून आलेला संदेश-
“मॅडम, रावत हे त्या व्यक्तिंशी आधीच बोललेले आहेत आणि ते उद्या सकाळी कार्यालयात येतील. प्रवासासाठीचे योग्य दस्ताऐवज जारी केले आहेत.
विजय यांनी मला हा संदेश पाठवला.

संध्याकाळी 5 वाजता आमचं संभाषण सुरू झालं आणि 7.32 वाजता संपलं.
संध्याकाळी 5 वाजता अवधूत पै यांचा संदेश- ‘मला लुटले, माझा पासपोर्ट गमावला’

संध्याकाळी 7.32 वाजता ब्रुसेलच्या राजदूतांनी पै यांच्याशी संपर्क साधला. उद्या 20 मे, 2019 रोजी ते भारतीय वाणिज्य दूतावासाकडे येतील, प्रवासाचे योग्य ते दस्ताऐवज जारी केले जातील.

अशा प्रकारच्या घटना बऱ्याचदा घडतात. जेव्हा आपण परदेशात प्रवास करतो. हा दौरा कधी व्यावसायिक, वैयक्तिक, सुट्टीचा फेरफटका, नातेवाईकांना दिलेली भेट असू शकतो. कधीकधी अशा प्रवासादरम्यान त्या देशात पासपोर्ट/पर्स यांची हॉटेलमधून चोरी होऊ शकते. सार्वजनिक परिवहन, बस, रेल्वे, मेट्रोमध्ये असतानाही सामान गहाळ होण्याच्या घटना घडतात आणि आपण घाबरून जातो. अशावेळी आवश्यकता असते ती योग्य व्यक्तिशी संपर्क साधण्याची. स्थानिक पोलिस, भारतीय वाणिज्य दूतावास यांच्यासोबतच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधण्याची. तत्कालीन परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वाणिज्य दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना अशा भारतीयांची काळजी घेण्यासाठी प्रेरित केले आहे.

होय, मला मान्य आहे की, नेहमीच संस्था हव्या तशा सकारात्मक नसतात. सर्वसामान्य व्यक्तींसाठी योग्य व्यक्ती शोधणे आणि सकारात्मक प्रतिसाद मिळविणे अतिशय कठीण असते. परंतु तेथे सकारात्मक लोकदेखील आहेत.

अवधूत पै, त्यांच्या पत्नी व मुलासह दुसऱ्या दिवशी, तो दिवस होता 24 मे, 2019 च्या सकाळी भारतीय वाणिज्य दूतावास ब्रुसेल्स येथे गेले आणि काही तासांमध्ये त्यांना प्रवासासाठीची कागदपत्रे दिली. पै यांनी मला भारतीय वाणिज्य दूतावासाकडून फोन केला आणि माझे आभार मानले. “किरीटभाई तुमच्यामुळेच आम्ही भारतात परत येत आहोत. तुम्ही नेहमीच माझ्या लक्षात राहाल”
अवधूतने मला पाठविलेला संदेश खालीलप्रमाणे:

सौजन्यः किरीटनामा”
 
“किरीट सोमय्या, माजी खासदार

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content