Details
बोरीवलीच्या वझिरा नाक्याचे श्री गणराय अंबरनाथमध्ये!
05-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ हे अंबरनाथमधील एक प्रमुख मंडळ आहे. या मंडळातर्फे गेली ६७ वर्षे नियमितपणे गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो. यंदा मंडळाचे ६८ वे वर्ष आहे. यंदा मुंबईतल्या बोरिवली येथील वझिरा नाका येथील स्वयंभू श्री गणेश देवस्थानच्या मंदिराचा देखावा उभारण्यात आला असून मूर्तीसुद्धा तशीच बसविण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती शाडूच्या मातीची असून स्थानिक मूर्तिकार नाना कडू यांनी साकारली आहे. सजावट रवी ठाकरे यांनी केली आहे.
बोरिवली पश्चिम येथील गोराई परिसरात दगडखाणींचे काम सुरू असताना साक्षात्कारामुळे स्वयंभू मूर्ती समोर आली आणि मग येथे मंदिर निर्माण करण्यात आले. अनेक वर्षांपासून हे देवस्थान नावारूपाला आले आहे. आजही हजारो भाविक नियमित या देवस्थानात दर्शन घेत असतात. अंबरनाथ शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हा देखावा यंदा उभारून अंबरनाथ आणि आसपासच्या भाविकांना वझिरा नाका येथील या स्वयंभू देवस्थानाचे दर्शन घडविले आहे. शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा आजही कायम ठेवलेला आहे. देखावा उभारताना त्यात अन्नदान, जलदान, ज्ञानदान, रक्तदान, देहदान, श्रमदान आणि लोकशाहीमधील अत्यंत महत्त्वाचे असे मतदान अशा सात दानांचे महत्त्व सांगणारा देखावाही सादर करण्यात आला आहे.
पारंपरिक सण, उत्सव साजरा करीत असतानाच सहस्त्र दुर्वा अर्पण, गणेश सहस्त्र नाम, गणेश याग आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या धर्तीवर सहस्रावर्तनेसुद्धा आयोजित करण्यात येत असतात. यात विद्यार्थी आणि महिलांचा सहभाग अधिक असतो. गेल्या काही वर्षांपासून जुन्या सदस्यांपैकी, ज्यांनी या मंडळाच्या कार्यात योगदान दिले आहे, अशा सदस्यांपैकी एका सदस्याला सहकुटुंब म्हणजे त्या कुटुंबात जितक्या व्यक्ती असतील मग त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरूष, मुलं, मुली, नातवंडं, पणतू अशा सर्वाना एकत्र बोलावून त्यांच्या सर्वांच्या हस्ते श्रींची आरती करण्याचा वेगळा प्रयत्न हे मंडळ करीत आहे. ‘नारळाच्या नवसाला पावणारा गणपती’ अशी या मंडळाची ख्याती आहे. शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत असल्यानेच दरवर्षी विविध आयोजकांकडून मंडळाला पारितोषिक देऊन या मंडळाच्या कार्याची दखल घेतली जाते.
मंडळाची यंदाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे;
अध्यक्ष: अजयराव चिरीवेल्ला; जनरल सेक्रेटरी: राजेंद्र परोळसांदे; कार्याध्यक्ष: प्रकाशचंद्र माने, शोभा शेट्टी; कोषाध्यक्ष: दत्तात्रय पटवर्धन; सह-कोषाध्यक्ष: सचिन वैद्य; उपाध्यक्ष: वृंदा पटवर्धन, अरविंद मालुसरे, एकनाथ चौधरी, जयसिंग पाटील; सेक्रेटरी: सोनल भोईर, राघवेन्द्र हेरकल; आवर्तन संयोजन समिती: हेमलता गांगल, दर्शना चिरीवेल्ला; अंतर्गत हिशेब तपासनीस: भगवान सासे; विसर्जन सोहळा प्रमुख: ह.भ.प. राम फणसे; श्रींची कायम सेवा: रविंद्र गाडगीळ; संकल्प कार्यप्रमुख: विजयन नायर.”
केएचएल न्यूज ब्युरो
अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ हे अंबरनाथमधील एक प्रमुख मंडळ आहे. या मंडळातर्फे गेली ६७ वर्षे नियमितपणे गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो. यंदा मंडळाचे ६८ वे वर्ष आहे. यंदा मुंबईतल्या बोरिवली येथील वझिरा नाका येथील स्वयंभू श्री गणेश देवस्थानच्या मंदिराचा देखावा उभारण्यात आला असून मूर्तीसुद्धा तशीच बसविण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती शाडूच्या मातीची असून स्थानिक मूर्तिकार नाना कडू यांनी साकारली आहे. सजावट रवी ठाकरे यांनी केली आहे.
“बोरिवली पश्चिम येथील गोराई परिसरात दगडखाणींचे काम सुरू असताना साक्षात्कारामुळे स्वयंभू मूर्ती समोर आली आणि मग येथे मंदिर निर्माण करण्यात आले. अनेक वर्षांपासून हे देवस्थान नावारूपाला आले आहे. आजही हजारो भाविक नियमित या देवस्थानात दर्शन घेत असतात. अंबरनाथ शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हा देखावा यंदा उभारून अंबरनाथ आणि आसपासच्या भाविकांना वझिरा नाका येथील या स्वयंभू देवस्थानाचे दर्शन घडविले आहे. शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा आजही कायम ठेवलेला आहे. देखावा उभारताना त्यात अन्नदान, जलदान, ज्ञानदान, रक्तदान, देहदान, श्रमदान आणि लोकशाहीमधील अत्यंत महत्त्वाचे असे मतदान अशा सात दानांचे महत्त्व सांगणारा देखावाही सादर करण्यात आला आहे.”
“पारंपरिक सण, उत्सव साजरा करीत असतानाच सहस्त्र दुर्वा अर्पण, गणेश सहस्त्र नाम, गणेश याग आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या धर्तीवर सहस्रावर्तनेसुद्धा आयोजित करण्यात येत असतात. यात विद्यार्थी आणि महिलांचा सहभाग अधिक असतो. गेल्या काही वर्षांपासून जुन्या सदस्यांपैकी, ज्यांनी या मंडळाच्या कार्यात योगदान दिले आहे, अशा सदस्यांपैकी एका सदस्याला सहकुटुंब म्हणजे त्या कुटुंबात जितक्या व्यक्ती असतील मग त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरूष, मुलं, मुली, नातवंडं, पणतू अशा सर्वाना एकत्र बोलावून त्यांच्या सर्वांच्या हस्ते श्रींची आरती करण्याचा वेगळा प्रयत्न हे मंडळ करीत आहे. ‘नारळाच्या नवसाला पावणारा गणपती’ अशी या मंडळाची ख्याती आहे. शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत असल्यानेच दरवर्षी विविध आयोजकांकडून मंडळाला पारितोषिक देऊन या मंडळाच्या कार्याची दखल घेतली जाते.”
मंडळाची यंदाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे;
“अध्यक्ष: अजयराव चिरीवेल्ला; जनरल सेक्रेटरी: राजेंद्र परोळसांदे; कार्याध्यक्ष: प्रकाशचंद्र माने, शोभा शेट्टी; कोषाध्यक्ष: दत्तात्रय पटवर्धन; सह-कोषाध्यक्ष: सचिन वैद्य; उपाध्यक्ष: वृंदा पटवर्धन, अरविंद मालुसरे, एकनाथ चौधरी, जयसिंग पाटील; सेक्रेटरी: सोनल भोईर, राघवेन्द्र हेरकल; आवर्तन संयोजन समिती: हेमलता गांगल, दर्शना चिरीवेल्ला; अंतर्गत हिशेब तपासनीस: भगवान सासे; विसर्जन सोहळा प्रमुख: ह.भ.प. राम फणसे; श्रींची कायम सेवा: रविंद्र गाडगीळ; संकल्प कार्यप्रमुख: विजयन नायर.”