HomeArchiveबेफिकिरीचे बळी!

बेफिकिरीचे बळी!

Details
बेफिकिरीचे बळी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
सीएसएमटीसमोर असलेला पादचारी पूल गुरूवारी सायंकाळी अचानक कोणाच्या ध्यानी-मनी नसताना कोसळला. ती वेळ अर्थातच गर्दीचीच होती. कोणी कामे संपवून घरी जाण्यासाठी लोकल गाडी पकडण्यासाठी पळत होते तर अन्य काही रात्रपाळीच्या कामाची वेळ गाठण्यासाठी घाईने स्टेशनामधून बाहेर पडत होते. साडेसातच्या सुमारास कोसळलेल्या या पादचारी पुलाने सहा व्यक्तींचे जीव घेतले आणि दोन-तीन डझन प्रवाशांना जखमी केले. पण पूल कोसळला याचे खरे कारण बेफिकीरी आणि “त्याला काय होतंय?” ही वृत्ती आहे हेच खरे!

महानगरपलिकेच्या काही अधिकाऱ्यांचा निगरगट्टपणा, पुलाची तपासणी करणाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि वरून धडधाकट दिसणाऱ्या पुलाविषयीचा भलताच आत्मविश्वास यामुळेच ही दुर्घटना घडली असेही म्हणता येईल. या घटनेनंतर सर्वच स्तरातून प्रशासनावर टिकेची झोड उठवली जात आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी लगेच हात झटकून टाकले आहेत की, हा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो. त्याचा रेल्वे मंत्रालयाशी संबंध नाही. पण, हा पूल नेमका कोणाच्या अखत्यारीत येतो यावरून मुंबई महापालिका व रेल्वे प्रशासनामध्ये जुंपली आहे. या टोलवाटोलवीमुळे मुंबईकर मात्र व्यथित झाला आहे. त्याला रागही आलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सीएसएमटी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी सेंट जॉर्ज रूग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. या अपघातासाठी मनपाचे कोणी अधिकारी दोषी आहेत का हे तातडीने शोधा असे आदेशच त्यांनी मनपा आयुक्तांना दिले, हेही बरेच झाले.

या घटनेतून हेही जाणवले की मुंबईत माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे! रस्त्यावरून आपल्या विचारात निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना पाहिलेल्या आणि या अपघातातून बचावलेल्या लोकांच्या मनात भीतीच्या वादळाने काहूर माजलेच असेल. त्यांच्या मनात काय सुरू असेल याचा विचार न केलेलाच बरा. अशा मानवनिर्मित अपघातात नाहक बळी जाण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा शेकडो घटना घडून गेल्या आहेत. त्यात अनेकांचे जीव गेले असून कुटुंबाच्या कुटूंब उद्ध्वस्त झाली आहेत.

30 सप्टेंबर 2017 – मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांना प्राण गमवावा लागला तर ३० जण जखमी झाले. अशी काही घटना घडली, की प्रशासनाचा पहिला प्रयत्न स्वतःची कातडी वाचविण्याचा सुरू असतो. इथेही तेच सुरू आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी जाहीर करून टाकले की, हा पुल मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो. त्याचा रेल्वे मंत्रालयाशी संबंध नाही. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून सर्वोतपरी मदत करण्यात येईल. मुंबईच्या महापौरांनी रेल्वे प्रशासनावर याची जबाबदारी टाकली. मुख्य प्रश्न सोडून यात आमची कशी चूक नाही, यात आमचा काही हात नाही, असे जनतेला ओरडून सांगण्याची वेळ का यावी हाही प्रश्नच आहे. “यांना-त्यांना आम्ही सांगितले होते, पत्रव्यवहार झाले होते..” असे म्हटले की झाले का? एकमेकांवर आरोप करून कागदी घोडे नाचवत जबाबदारी स्वीकारण्याआधीच झटकण्याचा प्रकार होतो तो संतापजनक आहे. नेहमीप्रमाणे जीव गमावलेल्या आणि कायमस्वरूपी जखमी झालेल्या लोकांच्या आयुष्याची बोली काही लाखांमध्ये लावून मोकळे झाले आहोत. त्यांनाही आता चांगले समजले आहे, की चार दिवस माध्यमांमध्ये बोंबाबोंब पाचव्या दिवशी आपण पुन्हा निवांत. दुसऱ्या घटनेची वाट पाहण्यासाठी.

पण हे किती दिवस? अजून किती बळींची वाट पाहणार आहोत? लोकांचा बळी गेल्याशिवाय कोणतीच उपाययोजना का होत नाही? माणसं मेल्याशिवाय विषयाचे गांभीर्य कधीच का समजत नाही? आधी मरा, मग बघू अशीच शासनाची भूमिका का असते? असे अनेक प्रश्न पाठ सोडायला तयार नाहीत. त्याचे उत्तर काही मिळत नाही. मागील काही महिन्यांत घडलेल्या मानवनिर्मित या काही ठळक घटना पाहा. परवा 14 मार्च 2019 मुंबई : रेल्वेचा पादचारी पुल कोसळून सहा जणांचा मृत्यू 40 व्यक्ती जखमी. (मृतांची संख्या वाढू शकते). 5 ऑक्टोबर 2018 : पुण्यात होर्डिंग पडून 4 जणांचा बळी, 10 जण जखमी. 27 सप्टेंबर 2018 : कालवा फुटून शेकडो लोकांचे संसार पुण्यात उद्ध्वस्त झाले आणि नंतर तपासाचा निष्कर्ष काय निघाला तर उंदरांनी पोखरल्यामुळे कालवा फुटला! 3 जुलै 2018 : अंधेरी स्थानकातील तीन क्रमांकाच्या पादचारी पुलाचा भाग कोसळला. एकाचा मृत्यू 4 जखमी. 17 ऑक्टोबर 2017 : सिंहगड रस्त्यावर स्लॅब कोसळून 3 मजुरांचा बळी. 30 सप्टेंबर 2017 : मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जण दगावले तर ३० जण जखमी. 3 ऑगस्ट 2016 महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळला. 7 ते 8 वाहने वाहून गेली. 25 ते 30 लोकांचा बळी. 29 जुलै 2016 बालेवाडी 14 मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 9 मजुरांचा बळी. अशी शेकडो उदाहरणे देता येतील.

हा प्रश्न केवळ पुणे-मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण देशालाच लागू पडतो. रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार, मागील चार वर्षांत देशभरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे 11 हजार 386 बळी गेले आहेत. हा गांभीर्याने विचार करायला लावणारा आकडा आहे. अशा घटना घडतात याची माहिती सर्वांना मिळते. पण यातील दोषींना योग्य शिक्षा झाल्याचे काही कानावर पडत नाही. याची कारणे बहुदा सर्वसामान्य माणसांनाही समजली आहेत. उड्डाणपुलाची कामे सुरू असताना पूल पडल्याच्या अनेक घटना देशात घडलेल्या आहेत. त्यांचे पुढे काय झाले कोणालाच माहीत नाही. हिमालय वा कसाबच्या नावाने ओळखला जाणारा हा पूल पडला यात चूक महापालिका प्रशासनाची होती की रेल्वे प्रशासनाची याने वस्तुस्थिती बदलत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाच-सहा लोकांचा नाहक जीव गेला आणि कित्येकजण जखमी झाले हे सत्य स्वीकारण्याची तयारी प्रशासनाच्या दोन्ही विभागांनी दाखवायला हवी आहे. मुंबईसारख्या ज्या शहरांमध्ये पुढच्या क्षणाचा भरवसा नाही तिथे, आपल्या सुरक्षेची जबाबदारी केवळ प्रशासनावर टाकून चालणार नाही. इथे स्थिती अशी बनलेली आहे की कोणत्याही भागात नगरसेवकांपासून महापालिकेच्या सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे ठरलेले कमीशन दिल्याशिवाय विकासकामाची एक वीटही हालत नाही. त्यामुळे ही मंडळी जनतेच्या केवळ भल्यासाठी फार काही करू शकतील अशा भ्रमात राहणे आपण सोडून दिले पाहिजे. गल्लीपासून ते वर दिल्लीपर्यंत हेच लागू आहे. अशा अपघातानंतर असे ध्यानाच येते की ते काम झालेही असते पण कुणाचे ना कुणाचे हितसंबंध आडवे आले होते, म्हणून विषय रखडला होता. त्यामुळे दोषींना शिक्षा होईल, पीडितांना न्याय मिळेल असे आजवरचा अनुभव पाहता या खोट्या आशेवर नागरिकांना राहता येणार नाही. प्रत्येक ठिकाणी लोकांनी सावध राहिले पाहिजे, सजग राहिले पाहिजे.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content