Details
बाबासाहेब आभाळाएवढे
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीतून साकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल!” किती ठिकाणी आणि किती तरी महनीय वक्त्यांनी उच्चारलेलं हे वाक्य. जबरदस्त टाळ्या पडतात या वाक्याला. समोरची गर्दी भावूक, थरारून उठते. वक्ताही हुशारतो. आणखी जोमाने बाबासाहेबांविषयी बोलू लागतो, त्यांच्या योगदानाविषयी, कर्तृत्वाविषयी जेवढं तळमळीने सांगता येईल तेवढं सांगतो, एका क्षणाला थांबतो. समोरचा अवघा निळा जनसागर स्तब्ध आणि मग एकच आवाज उठतो.. जब तक सूरज चाँद रहेगा, बाबासाहेब तेरा नाम रहेगा.. मग दुसऱ्या दिवशी ठळक मथळे प्रत्येक दैनिकांत.. अवघी निळाई दाटली, भीमसागर एकवटला किंवा महामानवाला जनसागराची मानवंदना. ६ डिसेंबरचे सारे सार एवढेच आहे का, एवढेच समजायचे का, अवघ्या भारताला समृद्ध लोकशाहीच्या मार्गावर आणणारे घटनाकार बाबासाहेब फक्त निळ्या जनसागराचे होते का? फक्त निळे झेंडे उंचावून, माना ताणून बाबासाहेबांच्या नावाने घोषणा दिल्या की बाबासाहेब आकळतात का? त्यांनी जे विचार पेरले, जी क्रांती घडवून आणली त्याची इतकीच का मर्यादा? अनेक प्रश्नांची गर्दी मनात होत राहते आणि चैत्यभूमीवरील गर्दीत हरवलेला कुणी एक फिरस्ता या प्रश्नांच्या गुंत्यात भोवंडत राहतो.
तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे.. अणु रेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा. बाबासाहेबांचे तसेच आहे. विलक्षण, असीम कर्तृत्त्व. बाबासाहेबही आभाळा एवढेच अथांग आहेत. एका पीडित, शोषित समाजाला उत्थानाचा मार्ग दाखवतानाच सर्वात आधी देश आणि नंतरही देशच, असे म्हणणारे ते महामानव आहेत. पण समाजासाठी, देशासाठी उद्धारकाची भूमिका पार पाडणाऱ्या या विलक्षण आभाळाकडून आपण काय शिकवण घेतली असा प्रश्न विचारला तर ठोकळेबाज वाक्य तोंडावर फेकली जातात. फोटोफ्रेम, व्यक्तीपूजा आणि एका समाजापुरता या आभाळासारख्या महापुरुषाला मर्यादित, सीमीत करण्याचा खटाटोप सुरू राहातो. तो तिकडे जातीभेद, धर्मभेदाने वेष्टनांत गुरफटलेल्या समाजाला जाग आणू पाहात होता, सर्वजण त्यांच्या त्यांच्या धर्मावगुंठीत अफूची गोळी घेऊन गुंगीत होते तेव्हा क्रांतीकारी विचारशलाकांची स्फुल्लिंगे पेरीत होता, सामाजिक रिती-रुढी, परंपरा यात जखडलेल्या समाजाला मोकळे करू पाहात होता. देश घडवला जात असताना आपले अनमोल योगदान देत होता. तेव्हाही आंबेडकर नाकारले जात होतेच आणि आजही वेगळ्या अर्थाने नाकारले जात आहेत.
युरोप-अमेरिकेत उच्च शिक्षण घेतानाच तिथल्या आणि भारतातील उदारमतवादी परंपरांनी आणि चळवळींचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. त्यातून उपजलेला विवेकवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद बाबासाहेबांच्या लिखाण आणि कृतींमध्ये शेवटपर्यंत दिसतो. समाज फुटीच्या उंबरठ्यावर रेटला जात असताना बाबासाहेबांचा विवेकवाद आणि बुद्धीप्रामाण्यवाद या वारशाची आज नितांत गरज आहे. त्यातील मर्म समजून घ्यायला हवे. बाबासाहेब महामानव होते, आभाळासम होते तर त्या आभाळाची शिकवण कधी समजून घ्यायची? ‘‘मला मायभूमी कुठे आहे? हे चारच शब्द डॉ. आंबेडकरांनी उच्चारले आणि हजारो वर्षे एका विषम समाज परिस्थितीच्या पोटात घुसमटलेली भावना ज्वालामुखीसारखा स्फोट घडवून गेली. शोकाचा श्लोक व्हावा तसे हे शब्द एका नव्या समाजक्रांतीच्या आगमनाची वार्ता सांगणाऱ्या प्रचंड घंटेसारखे घणघणायला लागले..” अशा ताकदीच्या शब्दांत बाबासाहेबांच्या विचारांचं सामर्थ्य पु.ल. देशपांडे यांनी व्यक्त करून ठेवलं आहे. आज समाजात फाळणी घडवून आणली जात असताना, विचारी मनेही भरकटतील अशा मुद्द्यांचा वन्ही हेतूत: चेतवला जात असताना बाबासाहेबांसारख्या देश सर्वप्रथम मानणाऱ्या द्रष्ट्याची उणीव भासते आहे.
राजकीय स्वार्थापोटी अनेकांना बाबासाहेबांच्या नावाने उमाळे येत असतात. आजही चैत्यभूमीवर आणि इतरत्र हे सारे रितसर पार पडेल. पण त्यांना केवळ दलितांचे उद्धारक इतपतच मर्यादित ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. घटनानिर्मितीचे त्यांनी जे परिश्रम घेतले त्याचे श्रेय देतानाही हात आखडता घेतला जातो. घटनासमितीत केवळ बाबासाहेबच नव्हते आणखीही होते.. म्हणत तत्कालीन परिस्थिती लपवत सत्याचा अपलाप केला जातो. ज्याचे प्रकांड पांडित्य, शिक्षण, पदव्या, ग्रंथलेखन, पत्रकारिता, महिला, कामगार, दीनदुबळे, पीडित-शोषित यांच्यासाठी केलेले कार्य, महत्त्वाचे कायदे, कायदेविषयक सुधारणा हे सारे कधीतरी उल्लेखांपुरते समोर आणून एरव्ही लपवले जाते अशा महामानवाला अभिवादन करताना हे सर्व पुन्हा पुन्हा समोर आणण्याची गरज आहे इतकेच सांगून चालणार नाही. ज्या प्रज्ञासूर्याने वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धर्मांतरासारखा क्रांतीकारी निर्णय घेतला, महाडचा चवदार तळ्याचा क्रांतीसंगर केला, स्वतंत्र भारताची घटना लिहिताना स्त्रियांना पुरुषांच्या् बरोबरीचे अधिकार दिले, महिलांना त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यांचे स्मारक आज राजकीय स्वार्थाच्या चक्रव्युहात सापडले आहे. या स्मारकापेक्षाही कितीतरी उंच आणि कितीतरी भव्य असे बाबासाहेबांचे योगदान आहे. हे विसरता येणार नाही.”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान