HomeArchiveप्रोस्टेट कॅन्सरचा धोका...

प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्याचे काही मार्ग!

Details
प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्याचे काही मार्ग!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

डॉ. सुरेश भगत, एस एल रहेजा हॉस्पिटल, माहीम
प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींमध्ये कर्कपेशींचा प्रादुर्भाव होणे. या लहानशा ग्रंथीमधून वीर्याचे पोषण करणारा स्त्राव तयार होत असतो. संशोधनांतून असे दिसून आले आहे की ६५ वर्षांवरील पुरूषांमध्ये उद्भवणाऱ्या कर्करोगातील २/३ प्रकरणे ही ”वयोवृद्ध गटातील पुरूषांमधील कर्करोग” या गटात मोडतात.

भारतातील पुरूषांमध्ये फुफ्फुसांच्या आणि तोंडाच्या कॅन्सरपाठोपाठ प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे व या रोगाच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये २२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. प्रोस्टेट ग्रंथी या मूत्राशयाच्या बरोब्बर खाली गुदाशयाच्या समोर असते व त्यातून प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजन (PSA) नावाचे एन्झाइम स्त्रवते. हा स्त्राव वीर्याचे द्रवीकरण करतो व स्पर्म्स म्हणजे शुक्रजंतू तयार होण्यास मदत करतो. प्रोस्टेट कॅन्सरच्या निदानामध्ये PSA हे एक महत्त्वाचे बायोमार्कर आहे.

एकेकाळी पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतातील प्रोस्टेट कॅन्सरचा प्रादुर्भाव कमी आहे असे म्हटले जायचे. मात्र आता शहरी लोकसंख्येमध्ये झालेले बदल, बदलती जीवनपद्धती, वाढती जागरूकता आणि औषधोपचारांची अधिक सहज उपलब्धता यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचे सहज निदान होऊ लागले आहे. प्रोस्टेट कॅन्सरला संपूर्ण प्रतिबंध करण्याची कोणतीही उपाययोजना नसली तरीही या कर्करोगाचा धोका कमी नक्कीच करता येतो. हा धोका कमी करण्यासाठी काही सूचना पुढीलप्रमाणे:

सकस आहाराची निवड करा

चरबीचे प्रमाण कमी असलेला, फळे व भाज्यांचा समावेश असलेला सकस आहार प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करू शकतो. उदा. लोण्यामध्ये पदार्थ बनविण्याऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरा. आपल्या सलाडवर चीझ टाकण्याऐवजी दाणे, बिया टाका.

फळे आणि भाज्या अधिक प्रमाणात खा

फळे व भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्वे आणि पोषक घटक असतात त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. फळे व भाज्या खाल्ल्याने पोटही लवकर भरते आणि जास्त चरबीचे पदार्थ खाण्याएवढी जागा पोटात उरत नाही.

मासे खा

सालमन आणि ट्यूनासारख्या चरबीयुक्त माशांमध्ये ओमेगा-3, फॅटीअसिड्स असतात, ज्यांचा प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी कऱण्याशी संबंध आहे. फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बियांमधूनही ओमेगा–3 मिळते.

निरोगी जीवनशैली राखा

बॉडी मास इंडेक्स (BMI) ३० किंवा त्याहून अधिक असलेल्या पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक असतो. तुम्ही लठ्ठ असाल तर व्यायाम आणि सकस आहाराच्या मदतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करा.

धोका कमी करण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे बोला (SPEAK)

तुमच्या कुटुंबात पूर्वी वडील, भाऊ किंवा इतर कुणाला प्रोस्टेट कॅन्सर झाला असेल तर तुम्हाला असलेल्या धोक्याबद्दल डॉक्टरांशी सल्लामसलत करा. वारंवार लघवीला लागणे, लघवी अनावर झाल्यासारखे वाटणे, लघवीची धार कमी होणे आणि लघवीमधून रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसू लागल्यास त्याबद्दल उघडपणे बोला.

तपासणी करा (SCREEN)

कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सरचे उदाहरण घडले असल्यास नियमितपणे पाहण्या करून घ्या.

आरोग्य जपा

सकस आहार आणि नियमित व्यायाम कर्करोगाचा प्रतिबंध करण्यास मदत करू शकतो.”
 
“डॉ. सुरेश भगत, एस एल रहेजा हॉस्पिटल, माहीम

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content