HomeArchiveपुन्हा लोकसभेत 'जय...

पुन्हा लोकसभेत ‘जय श्रीराम’ची घोषणा!

Details
पुन्हा लोकसभेत ‘जय श्रीराम’ची घोषणा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राममंदिराच्या उभारणीसाठी सुरूवातीपासूनच आग्रही असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा संसदेत ‘जय श्रीराम’ ची घोषणा दिली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी, राममंदिर उभारणीसाठी कठोर कायदा करण्याची मागणी लोकसभेच्या शून्य प्रहरात शुक्रवारी केली. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या शेवाळे यांनी दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच भाषणात राममंदिराच्या मुद्द्याला हात घालून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

लोकसभेच्या शून्य प्रहरात खासदार शेवाळे यांनी 500 वर्षीय राम मंदिराच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले, “1528 मध्ये मुघलांनी हिंदूंचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी राममंदिर उद्ध्वस्त करून त्याचठिकाणी मशिदीसारखा ढाचा उभा केला. पण याठिकाणी कधीही नमाज केला गेला नाही. 23 डिसेंबर 1949 पासून अयोध्येतील याठिकाणी रामाच्या भजन-कीर्तनांना सुरूवात झाली. त्याचवेळी तत्कालीन जिल्हाधिकारी नायर यांनी ही वास्तू विवादास्पद ठरवून बंद केली. प्रत्यक्षात, याठिकाणी उत्खनन केले असता मंदिराचे अवशेष असल्याचे पुरावे सापडले. तरीही 70 वर्षे जगभरातील हिंदूंना न्याय मिळू शकला नाही. आज हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.”

खासदार शेवाळे पुढे म्हणाले, “गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारासह अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यावेळी राम मंदिर उभारण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली” जगभरातील हिंदूंच्या भावनेचा आदर राखत राममंदिर उभारणीचा मार्ग खुला करण्यासाठी कठोर कायदा करावा, असेही ते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content