Details
पटक देंगे..
01-Jul-2019
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
अमित शाहांनी शिवसेनेला ‘पटक देंगे’ असा निर्वाणीचा इशारा दिल्याने प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे फार चिंतातुर दिसत होते. बरं बाळासाहेबांना कसे पटवायचे हा त्यांच्यासमोर खरा प्रश्न होता. ते दोघे इंद्रदेवाकडे गेले आणि नारदाला पृथ्वीतलावर पाठवून ‘पटक देंगे’ याची खबरबात आणण्याची विनवणी केली. नारदाचं नाव घेताच ते दरबारात हजर झाले आणि महाजन व मुंडे या युतीच्या शिल्पकारांना हायसे वाटले.
इंद्रदेवाने नारदाला म्हटलं.. पृथ्वीतलावर काय चाललंय? एवढा गोंधळ चालला आहे आणि तुम्ही मला काहीच सांगत नाही? तुम्ही असे करत राहिलात तर मला कंत्राटी पद्धतीवर बातमीदार ठेवावा लागेल? नारदाचे पाय लटपटू लागले..
इंद्रदेवाला मुंबईत पाच दिवस बेस्टचा संप होता. लोकांचे हाल होत होते, हीच बातमी आहे, असे समजावत असताना इंद्रदेव म्हणाले.. याचा अर्थ तुम्हाला काहीही माहीत नाही. अहो अमित शाहांनी शिवसेनेला पटक देंगे.. असा दम दिल्याने सगळेजण हमरीतुमरीवर आलेत, आणि तुम्ही काय त्या बेस्टच्या संपाचं घेऊन बसलात? चला ताबोडतोब निघा आणि जे जे नेते भेटतील त्यांच्याबरोबर बोलून माहिती घेऊन या. महाजन-मुंडे यांचा जीव भांड्यात पडला. नारदाने नारायण, नारायण म्हणत पृथ्वीतलावर प्रस्थान केले.
नारद थेट दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीतच घुसले. एका नेत्यांचे लक्ष नारदाकडे गेले आणि त्याने अमित शाहांच्या कानात नारद आल्याचे सांगितले. शाहांनी नारदाला मागच्या बाजूला एका केबिनमध्ये नेले.
शाह: बोलो, कैसे आना हुआ? ठीक आहेना, स्वर्गात? कोई नडता हो तो पटक देंगे? बोलो?
नारद: हा लक्षात आलं, ‘पटक देंगे’.. या वक्तव्याने स्वर्गात इंद्रदेवाचा गोंधळ उडाला आहे. आपण उद्धव ठाकरेंना धमकी दिली का?
शाह: मी एवढंच बोललो की, युती होणार नसेल तर ‘पटक देंगे’..!
नारद: आता लक्षात आलं, महाजन व मुंडे इंद्रदेवासमोर का उभे होते ते..
शाह: अरे बापरे, त्या दोघांनी कंप्लेंट केली माझी? आता काय खरं नाही माझं..
नारद: मी निघतो..
(नारद बाहेर येतात तेव्हा त्यांच्या कानावर एक समूहगानाचे शब्द पडतात..)
पटक देंगे हम, पटक देंगे हम, पटक देंगे हम
सेनेको इक दिन..
मनमे हाय विश्वास, मनमे हाय विश्वास
अमित भा….य!
नारद मातोश्रीवर जातात.. उद्धवजी डोक्याला हात लावून बसलेले असतात..
नारद: नारायण, नारायण..
उद्धव: नारदा तुझी ती नारायण, नारायण.. ही टोन बदल बघू..
नारद: तुमची पंढरपूर, वरळीची सभा बेस्ट झाली..
उद्धव: सभा चांगली झाली असं शुद्ध मराठीत बोलता येत नाही. या बेस्टने मला वेस्ट केलं आहे.. त्याचा दिवसरात्र त्रास होतोय..
नारद: कमाल आहे, म्हणजे अमित शाह आपल्याला पटक देंगे, म्हणाले त्याबद्दल काहीच वाटत नाही?
उद्धव: पटक देंगे म्हणाले म्हणून माझे शिवसैनिक सॉलिड चवताळले.. निवडणुकीची ते वाट बघत आहेत आणि आम्हीच आमच्या शैलीत पटकवणार त्यांना..
नारद: म्हणजे युती होणार नाही?
उद्धव: युती गेली खड्यात.. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.. (युनियनचे पदाधिकारी येतात आणि बेस्ट संप पुन्हा चिघळणार असल्याचे सांगतात.. ) कोण तो शशांक राव आपल्याला नडतोय? कालचा पोरगा तो.. सांगा त्याला ‘आमचं ऐक, नाहीतर पटक देंगे’..
नारदांनी उद्धवजींचा अवतार बघितला आणि हळूच ते बाहेर पडले..
बाहेर आदित्यराजे हातात चामड्याचा पट्टा घेऊन जमिनीवर आदळत ‘पटक, पटक, पटक देंगे हम’ असे म्हणत सराव करत होते.. काही सैनिक त्याचे मोबाईल वरून शूटिंग करत होते..
नारद आता कोणाकडे जायचे याचा विचार करत असताना त्यांना राजसाहेबांची आठवण येते आणि ते कृष्णकुंजकडे जातात..
नारद: नारायण, नारायण..
राज: हे बघ नारदा, मला वेळ नाही. घरात लग्नकार्य असल्याने मी बिझी आहे.. बोल.. लवकर बोल..
नारदः तुमच्या पृथ्वीतलावर कसलाच ताळमेळ नाही. प्रत्येक जण विवंचनेत.. मला सांगा अमितजी म्हणाले ‘पटक देंगे’ त्याबद्दल.. तुमचं काय म्हणणं आहे?
राज: मला म्हणालेss? जर मला म्हणाले असतील तर आमची संस्कृती ‘खळ कट्ट्याक’ची आहे. त्याची घटका भरत आली म्हणून ते काहीही बरगळतात.. आणि हे नारदबुवा मला वेळ नाही बोलायला आणि असल्या फालतू गोष्टीवर..
नारद: अहो, राजसाहेब बाळासाहेबांच्या शिवसेनेला पटकवण्याचा त्यांचा विचार आहे..
राज: चांगलं आहे. उद्धवचा फायदा आहे!
नारद: कसं?
राज: शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार!
नारद: व्वाsss.. हे मला सुचलच नाही.. यालाच म्हणतात ‘नवनिर्माण’..!! चला मी निघतो, मला चांगली बातमी मिळाली.. (नारद कृष्णकुंजमधून बाहेर पडतात आणि समोर अक्कलकोट स्वामींच्या मठात अरूण गवळी जाताना दिसतात.. त्यांना थांबवत..)
गवळी: ओमss.. आज माझ्याकडे?
नारद: नाही समोर राज ठाकरेंकडून येताना तुम्ही दिसलात.. मला म्हणायचं की अमित शाह सेनेला पटकविण्याची भाषा करतात, आपल्याला काय वाटते?
गवळी: हे पाहा. गिरणी संपामुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. अशावेळी सेनेला नाही तर मराठी माणसाला चॅलेंज आहे. पटकने ही कसली मुळमुळीत ढोकळा भाषा.. आमची भाषा ढगात पाठविण्याची आहे.
नारद: तुम्ही म्हणजे.. जाऊ द्या.. मला राणेसाहेबांकडे जायचे आहे.. येतो मी (गवळी जवळ उभी असलेल्या गाईला चारा घालतात व तिच्या पायावर पाणी ओतून नमस्कार करतात ‘जय गोमाते’..
राणे: आज इथे..
नारद: ते अमित शाह..
राणे: अमित शाहांचा काय निरोप आणला का?
नारद: तसं नाही.. ते युती केली नाही तर पटक देंगे म्हणतात..
राणे: आमची युती झाली.. माझा काय संबंध?
नारद: बाळासाहेबांची सेना ते पटकवणार असा अर्थ निघतो..
राणे: हे पाहा.. मला इमोशनल करू नका.. आताची सेना ही बाळासाहेबांची नाही.. (राणेसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात..) मला जुने दिवस आठवले की मी अधिक भावुक होतो.. बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे कोणाला कसे पटकावले हे मला ठाऊक आहे. अमितभाई असे का बोलले हे मला ठाऊक नाही. ते याचा खुलासा करतील. हे घ्या तिळगुळ आणि गोड गोड बोला.. (संक्रात संपल्यानंतर नारदाला तिळगुळ मिळाल्याने राज्यात बदल होतोय हे इंद्रदेवाला सांगायला हरकत नाही. गोड बातमी मिळाल्याने नारद खुश होऊन इंद्रदेवाच्या दरबाराकडे रवाना होतो..)”
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार