Details
पं. जयतीर्थ मेव्हुन्डी यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर
30-Aug-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
किराणा घराण्याचे प्रतिथयश हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पं. जयतीर्थ मेव्हुन्डी यांची २०१९ या वर्षाच्या गानसरस्वती पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली आहे. पं. मेव्हुन्डी हे पं. अर्जुनसा नाकोड आणि पं. श्रीपती पडेगार (भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य) यांचे शिष्य आहेत. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, मुंबई या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरूण द्रविड यांनी हा वार्षिक पुरस्कार २०१७ साली आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ प्रस्थापित केला. त्याचे वितरण दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, मुंबई या संस्थेतर्फे होते. रूपये एक लाख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ५० वर्षे वयाखालील प्रथितयश हिंदुस्थानी शास्त्रीय गायक किंवा गायिकेला तो दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार मंजिरी असनारे आणि पं. संजीव अभ्यंकर यांना प्रदान करण्यात आला आहे.”
केएचएल न्यूज ब्युरो
“किराणा घराण्याचे प्रतिथयश हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पं. जयतीर्थ मेव्हुन्डी यांची २०१९ या वर्षाच्या गानसरस्वती पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली आहे. पं. मेव्हुन्डी हे पं. अर्जुनसा नाकोड आणि पं. श्रीपती पडेगार (भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य) यांचे शिष्य आहेत. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, मुंबई या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.”
“गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरूण द्रविड यांनी हा वार्षिक पुरस्कार २०१७ साली आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ प्रस्थापित केला. त्याचे वितरण दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, मुंबई या संस्थेतर्फे होते. रूपये एक लाख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ५० वर्षे वयाखालील प्रथितयश हिंदुस्थानी शास्त्रीय गायक किंवा गायिकेला तो दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार मंजिरी असनारे आणि पं. संजीव अभ्यंकर यांना प्रदान करण्यात आला आहे.”