Details
न्यू दिंडोशी एकदंत उद्यानाचे लोकार्पण
02-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतल्या दिंडोशी विधानसभेतील गोरेगाव (पूर्व) इमारत क्रमांक २० व २१ न्यू म्हाडा एकदंत कॉ. हौसिंग सोसायटीतील उद्यान, ज्येष्ठ नागरिक कट्टा व ओपन जिम आदी लोकपयोगी नागरी सुविधांचा लोकार्पण सोहळा शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते व प्रभाग क्रमांक ४१चे स्थानिक शिवसेना नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच झाला.
खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रभू यांच्या आमदार फंडातून व प्रभाग क्रमांक ४१चे शिवसेना नगरसेवक शिंदे यांच्या प्रयत्नाने या सुविधा येथील १८० सदनिकाधारकांना उपलब्ध झाल्या आहेत. यावेळी या सोसायटीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, सचिव समीर मसुरकर, डॉ. चंद्रकांत होळंबे, अनुज सच्चर, अरविंद काजवे, पत्रकार मनोहर कुंभेजकर यांनी सोसायटीच्या वतीने कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी शिवसेना पूरग्रस्त सहाय्य मदतनिधीला धनादेश सुपूर्द केला. यावेळी प्रभू यांच्या हस्ते येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा व नेहमी सोसायटीला मदत करणारे येथील ज्येष्ठ नागरिक दिलीप भुसाणे, मोहन सावंत, विद्याधर हडकर व पूर्णांदू पांडा, सोसायटीचे व्यवस्थापक मिलींद जाधव यांचादेखील सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रभाग क्रमांक ४०चे नगरसेवक अॅड. सुहास वाडकर, दिंडोशी विधानसभा समन्वयक आशा केणी, उपविभागप्रमुख भाई परब, विद्या गावडे, समन्वयक प्रशांत घोलप, विनिता विचारे, स्थानिक शाखाप्रमुख संपत मोरे, शाखाप्रमुख संदीप जाधव, स्वाती पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
”
केएचएल न्यूज ब्युरो
“मुंबईतल्या दिंडोशी विधानसभेतील गोरेगाव (पूर्व) इमारत क्रमांक २० व २१ न्यू म्हाडा एकदंत कॉ. हौसिंग सोसायटीतील उद्यान, ज्येष्ठ नागरिक कट्टा व ओपन जिम आदी लोकपयोगी नागरी सुविधांचा लोकार्पण सोहळा शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते व प्रभाग क्रमांक ४१चे स्थानिक शिवसेना नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच झाला.”
“खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रभू यांच्या आमदार फंडातून व प्रभाग क्रमांक ४१चे शिवसेना नगरसेवक शिंदे यांच्या प्रयत्नाने या सुविधा येथील १८० सदनिकाधारकांना उपलब्ध झाल्या आहेत. यावेळी या सोसायटीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, सचिव समीर मसुरकर, डॉ. चंद्रकांत होळंबे, अनुज सच्चर, अरविंद काजवे, पत्रकार मनोहर कुंभेजकर यांनी सोसायटीच्या वतीने कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी शिवसेना पूरग्रस्त सहाय्य मदतनिधीला धनादेश सुपूर्द केला. यावेळी प्रभू यांच्या हस्ते येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा व नेहमी सोसायटीला मदत करणारे येथील ज्येष्ठ नागरिक दिलीप भुसाणे, मोहन सावंत, विद्याधर हडकर व पूर्णांदू पांडा, सोसायटीचे व्यवस्थापक मिलींद जाधव यांचादेखील सत्कार करण्यात आला.”
“यावेळी प्रभाग क्रमांक ४०चे नगरसेवक अॅड. सुहास वाडकर, दिंडोशी विधानसभा समन्वयक आशा केणी, उपविभागप्रमुख भाई परब, विद्या गावडे, समन्वयक प्रशांत घोलप, विनिता विचारे, स्थानिक शाखाप्रमुख संपत मोरे, शाखाप्रमुख संदीप जाधव, स्वाती पाटील आदी यावेळी उपस्थित होते.”

