HomeArchiveनोटेवर स्थान मिळवणारा...

नोटेवर स्थान मिळवणारा क्रिकेटपटू ‘फ्रँक वॉरेल’!

Details
नोटेवर स्थान मिळवणारा क्रिकेटपटू ‘फ्रँक वॉरेल’!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
अनेकांच्या विस्मृतीत गेलेला हा फ्रँक वॉरेल नावाचा क्रिकेटपटू तसा वेस्ट इंडिजचा. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी जगाला सोडून गेलेल्या या खेळाडूने ५१ कसोटी खेळल्या. मात्र, त्याची छबी देशाच्या नोटेवर छापली गेली. आपल्याकडच्या नोटांवर मतदानात नोटा येऊनही काहीच बदल नाही. क्रिकेटमधील धाव, गोलंदाजी, यष्टीरक्षण वगैरे बाबीवर खेळाडू लक्षात ठेवले जातात. पण, हा माणूस कोलकात्याच्या स्मरणात राहिला नव्हे जाणीवपूर्वक ठेवला आहे. भारत संघ १९६२ च्या काळात वेस्ट इंडिजचा दौरा करीत होता. कर्णधार नरी काँट्रॅकटर फलंदाजी करताना चार्ली ग्राफीटच्या उसळी मारलेल्या चेंडूवर भयानक पद्धतीने घायाळ झाले. त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी फ्रॅंक वॉरेलने रक्तदान केलं नि मदतीचा हात देत माणुसकी दाखवली. त्या दिवसाला एडन गार्डन रक्तदान शिबिर करून आठवण ठेवते.

विंडीज क्रिकेटच्या इतिहासात वॉरेल पहिले कृष्णवर्णीय संघनायक होते. १९६० पूर्वी गोरेच या पदावर राहत. नेतृत्त्व करतील अशी काळ्या लोकांची क्षमता नाही असंच समजलं जायचं. तेथील काही स्थानिक वृत्तपत्रांनी वॉरेल यांच्याकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कप्तानपद देण्याचा आग्रह धरला होता. अखेर १९६०-६१ च्या काळात त्यांना ते दिलं गेलं. त्यानंतर या खेळाडूने असा काही आपला ठसा उमटवला कि देश विदेशातील खेळाडूंनी खेळाडू कर्णधार म्हणून त्यांचं कौतुक केलं. पुढे क्रिकेट सोडताच काही काळात वॉरेलना जमेकात सिनेटर म्हणून निवडलं गेलं. दोन वर्षे त्या पदावर राहून आणि नंतरही त्यांनी वेस्ट इंडिज क्रिकेटच्या एकत्रीकरणासाठी खूप प्रयत्न केले. वेस्ट इंडिजमध्ये अनेक बेटांचा समावेश असल्याने तिथे एकजूट करून संघबांधणी महत्त्वाची गरज होती. असा संघबांधणीत त्यांचे योगदान स्तुतीपात्र राहिले. हे लक्षात घेऊन बार्बाडोसने आपल्या टपाल तिकिटावर नि तेथील पाच डॉलरच्या नोटेवर त्यांची छबी छापली. आता त्यांच्या नावाने ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिजदरम्यान करंडक सामनेही होतात.

कोण मोडणार हा विक्रम?

विश्वचषक स्पर्धेत फार पूर्वी म्हणजे १९८७ पर्यंत साठ षटकांचा सामना होत असे. नंतर त्यात बदल होऊन तो ५० षटकांवर आला. गेल्या दहा-पंधरा वर्षाxत २०-२० चे झटपट सामने होऊ लागले. मात्र, या तिन्ही प्रकारात जागतिक विजेतेपद मिळवणारा हिंदुस्थान हा एकमात्र देश आहे. ज्यावेळी क्रिकेट या प्रकारात बऱ्यापैकी मार खाणार देश अशी ओळख असणाऱ्या हिंदुस्थानने विश्वकपावर आपलं नाव कोरलं ते १९८३ साली कपिल देव निखंज यांच्या नेतृत्वाखाली! त्यावेळी कपिल, रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ, हे त्रिकुट गोलंदाजीत तर सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, गुंडाप्पा विश्वनाथ, सय्यद किरमानी हे फलंदाजी गाजवत होते. या कपमध्ये एका संघाविरूद्ध खेळताना भारताची अवस्था ५ बाद १७ धावा अशी होती. त्या सामन्यात फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या कपिल देव याने १७५ धावांची नाबाद खेळी केली. ती विजय मिळवणारी अविस्मरणीय तर होतीच, शिवाय त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या! काय ठोकून काढत सालटी केली चेंडूची. तेव्हाच्या गोलंदाजांसमोर शतक लावणं हा मोठाच पराक्रम असे. त्याचवेळी खरं तर ‘टीम इंडिया’ ही अस्तित्त्वात आली. त्यानंतरचे दोन्ही कप जिंकले ते एम एस धोनीच्या कर्णधारपदाच्या काळात. टी-२० जिंकला तो २००७ मध्ये आणि ५० षटकांचा २०११ साली.

तसे देशात गांगुली, राहुल द्रविड, यासह अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. यात अजून एक धडाकेबाज नाव म्हणजे व्ही व्ही एस लक्ष्मण! याच फलंदाजीत वैशिष्ट्य होतंच. या पठ्यांनं आणखी एक नोंद केली ती कोणताही वर्ल्ड कप सामना न खेळण्याची. शंभराहून अधिक कसोटी सामने त्यानं खेळले आहेत आता बोला!

जगातील थर्ड अंपायर या प्रकारचा बळी होण्याचा मान कोणाकडे तर आपल्या सचिन तेंडुलकरकडे. भारत द. आफ्रिका कसोटी सामना १४ नोव्हेंबर १९९२ रोजी खेळला जात असता दुसऱ्या दिवशी अकरा धावांवर धावबाद झाला सचिन. त्याची दाद मागता तिसऱ्या पंचांनी हा निर्णय दिला. पहिला वन डे सामना ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दरम्यान ५ जानेवारी १९७१ रोजी मेलबर्न मैदानावर खेळला गेला.

ही भागीदारी कोण मोडणार?

हिंदुस्थानी संघाच्या दोघा फलंदाजांनी केलेला विक्रम १९९९ पासून अभेद्य आहे. विश्वचषकाच्या इंग्लंडमधील कौंटी ग्राउंडवर हा विक्रम नोंदवला गेला आहे. श्रीलंकेविरूद्ध खेळताना राहुल द्रविड – सौरभ गांगुली या खेळाडूंनी लंकन गोलंदाजांना असं काही दणकून काढलंय की ३१८ धावांची सर्वोच्च भागीदारी केलं. मात्र, ही विक्रमी संख्या पार करणं किंवा जवळपास पोहोचणे अजूनतरी कोणाला शक्य झालेले नाही.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content