HomeArchiveनेत्रहीन पशू-पक्ष्यांना दृष्टी...

नेत्रहीन पशू-पक्ष्यांना दृष्टी देणाऱ्या डॉ. कस्तुरी!

Details
नेत्रहीन पशू-पक्ष्यांना दृष्टी देणाऱ्या डॉ. कस्तुरी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गेंडा, घोडा, साप, श्वान, तसेच इतर पशू-पक्ष्यांना दृष्टी देणारे भारतातील पहिले अद्ययावत क्लिनिक मुंबईत सुरू करण्यात असून याठिकाणी सर्वच पशू-पक्ष्यांच्या डोळ्यांवर कठिणातली कठीण शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या क्लिनिकची संकल्पना डॉ. कस्तुरी भडसावळे यांची असून महाराष्ट्रातील अनेक शासकीय उद्यानात असलेल्या प्राणी व पक्ष्यांसाठी महाराष्ट्र शासनाबरोबर काम करणे हा आपला सन्मान असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. कस्तुरी भडसावळे भारतातील एक प्रसिद्ध पशू नेत्ररोग विशेषज्ञ आहेत. मुंबईत जन्मलेल्या डॉ. कस्तुरी यांनी 2004 मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या डॉ. भडसावळे यांनी आपल्या अनुभवाची सुरूवात मुंबईतील रेसकोर्सपासून सुरू केली. शल्यचिकित्सक बनण्यासाठी त्यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदविका पूर्ण केली. दरम्यान डॉ. कस्तुरी यांच्या लक्षात आले की, भारतात पशुवैद्यकीय रूग्णालये भरपूर आहेत. मात्र, डोळ्यांची व्याधी व नेत्रहीन पशू-पक्ष्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध नाही. अनेक पशू-पक्षी जग पाहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी पशुवैद्यकीय नेत्रचिकित्सक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.

त्यांनी पशुवैद्यकीय नेत्रविज्ञानामध्ये आपले करियर करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. यामुळे पुढे डॉ. कस्तुरी यांना या क्षेत्राचा पाठपुरावा करण्यास प्रेरणा मिळाली. २००७ मध्ये त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेत पशुवैद्यकीय नेत्रचिकित्सेचे प्रशिक्षण घेतले. २००९ मध्ये डॉ. कस्तुरी ह्या आपल्या पतीसोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्या. तिथे त्यांनी चार वर्षे डोळ्यांवरील शस्त्रक्रियेचा सराव केला. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे स्वत:चे नेत्रचीकित्सा सल्ला केंद्र सुरू केले.

डॉ. कस्तुरी यांनी ३ मार्च, २०१९ रोजी चेंबूर, मुंबईमधील भारतातील पहिले पशुवैद्यकीय ओप्थामोलॉजी स्पेशालिटी क्लिनिक अँड ऑपरेशन थियेटर सुरू केले. प्राण्यांसाठी समर्पित केलेले हे भारतातील पहिले क्लिनिक आहे. भडसावळे यांनी याबाबत सल्ला, चिकित्सा, शस्त्रक्रिया यासाठी अविरत सेवा देण्याचे कार्य सुरू केले आहे. याबाबत डॉ. कस्तुरी भडसावळे म्हणतात,की, “डोळ्यांसमोरच आपण स्वतःला केवळ पाळीव प्राणीच मर्यादित करत नाही. आम्ही श्वान, घोडे आणि विदेशी पाळीव प्राणी यांचे उपचार करणार आहोत. भारतात हे पहिला पशुवैद्यकीय क्लिनिक आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये इतर अनेक खासियत आहेत आणि आम्ही भारतातील पशुवैद्यकीय क्षेत्रात क्रांती करण्याची योजना आखत आहोत. संधी मिळाल्यास आम्ही महाराष्ट्रातील शासकीय उद्याने, अभयारण्य व अभ्यारण्यातील प्राण्यांसाठी डोळ्यांवर शस्त्रक्रिया सेवा देण्यासाठी इच्छुक आहोत. हा आमचा सन्मान असेल.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content