HomeArchiveनिसर्ग व अध्यात्मकलेचा...

निसर्ग व अध्यात्मकलेचा सुंदर आविष्कार – श्रीक्षेत्र तिळसेश्वर!

Details
निसर्ग व अध्यात्मकलेचा सुंदर आविष्कार – श्रीक्षेत्र तिळसेश्वर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
पालघर जिल्‍हयातील वाडा तालुका हा मूलतः भातशेतीचे उत्‍पन्‍न काढणारा भाग म्‍हणून ओळखला जातो. येथील ‘वाडा कोलम’ हा तांदळाचा प्रकार राज्‍यभर प्रसिध्‍द आहे. मात्र वाडा तालुका हा प्राचिन मंदिरे व एतिहासिक पार्श्‍वभूमी असलेला परिसर म्‍हणूनदेखील प्रसिध्‍द आहे. अशाच एका प्रसिध्‍द ऐतिहासिक स्‍थळास भेट देण्‍याचा योग नुकताच आला. वाडा तालुक्यातील वैतरणा नदीच्या काठावर तिळसेश्वर शिव मंदिर प्राचीन काळापासून अस्तित्त्वात आहे. वाडा बसस्थानकापासून 7 कि.मी. अंतरावर असलेल्‍या हया मंदिरात जाण्यायेण्यासाठी बस व खाजगी वाहनांची सुविधा आहे. वैतरणा नदी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी जत्रा भरते, महाशिवरात्री यात्रेच्‍या दिवशी ठाणे, पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ‍भाविक या ठिकाणाला भेट देतात. विविध वस्‍तू व खादयपदार्थांच्या असंख्‍य दुकानांची याठिकाणी रेलचेल असल्‍याने स्‍थानिक व आसपासच्‍या परिसरातील लोकांना चांगला रोजगारदेखील उपलब्‍ध होतो.

याठिकाणचे आणखी एक वैशिष्‍टय म्‍हणजे, मंदिरालगतच्या नदिपात्रातील डोहात असणारे “देवमासे”. तिळसेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या वैतरणा नदीच्या डोहात हे देवमासे आहेत. कुंडातील असंख्‍य देवमासे भाविकांना सहजि‍रित्‍या दृष्‍टीपथास पडतात. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी महाशिवरात्री व इतर दिवशीसुद्धा मोठी गर्दी असते. तिळसेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर असल्याने या मंदिराला माहात्म्य प्राप्त झाले आहे. या मंदिराचा संबंध भारतातील 12 ज्योतिर्लिंगांमध्ये गणल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर महादेवाशी असल्याचा पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ आहे. वैतरणा नदीच्या तीरावर उंच चढल्यावर मंदिरात जाण्यासाठी पादचारी पूल बांधल्याने मंदिराची शोभा द्विगुणित झाली आहे. येथील नदी मूळ गोदावरीच असून ती ब्रह्मगिरीतून आली आहे. येथे तिळसेश्वराची स्वयंभू पिंड आहे. पिंडीवर टाकलेले नाणे नदीतील मासे असलेल्या कुंडात पडत असे. अलीकडे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. देवाची पूजाअर्चा येथील पुजारी करतात.

सोमवारी महाशिवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा झाला. त्यादिवशी शिवभक्तांचा तिळसा येथे जनसागर लोटला होता.. येथील एका खोल कुंडांमध्ये असलेल्या माश्यांच्या चमत्कारिक आख्यायिकेमुळेच येथे हे मासे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते, मात्र हे मासे पाहण्यासाठी येणारी माणसे या माशांना खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाह्या, पाव तसेच इतर अनेक पदार्थ टाकत असतात. या पदार्थांमुळे हे पाणी घाण होते तसेच पाण्यावर तेलकट द्रावण तयार होते. त्यामुळे पाण्यातील माश्यांना ऑक्सिजन मिळण्यास अडचणी येत असल्याने श्वसनामध्ये बाधा येऊन हे मासे मारतात. तसेच पाण्यात खाद्य पदार्थाबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्या जातात. ह्या पिशव्यांची तसेच खाण्यासाठी टाकलेल्या पदार्थांनमुळे हे पाणी प्रदूषित होतेच, मात्र नंतर हे मासे ह्या पिशव्या खाद्य म्हणून खातात. 3 ते 4 वर्षापुर्वी जवळपास २५ ते ३० इतर मासे महाशिवरात्रीनंतर मृत्यूमुखी पडले होते. ह्या मेलेल्या माश्यांच्या रिपोर्टनुसार हे मासे प्लास्टिक खाल्ल्यामुळे तसेच काही माश्यांना ऑक्सीजन न मिळाल्यामुळे हे मासे मेले होते. हे मासे ‘महाशीर’ या दुर्मिळ जातीचे असून ते चीन आणि भारतात तिळसेश्वर येथे बघायला मिळतात.

तिळसेश्वर मंदिराशेजारी असलेल्या वैतरणा नदीच्या पात्रात मुबलक प्रमाणात पाणी सतत उपलब्ध असल्याने येथील लोक या पाण्याचा वापर कपडे व घरगुती वापरासाठी करतात. तसेच नदीपात्राशेजारी धार्मिक विधीदेखील करण्यात येतात. या नदीवरील पुलाला लागूनच विठ्ठल रखुमाईचे एक सुंदर मंदिर तयार करण्यात आले असून आजूबाजूला विविध फुलझाडे व भाजीपाल्याच्या शेतीमुळे तसेच मंदिराशेजारील जागेत सुशोभीकरण करण्यात आल्याने या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलते. मंदिराच्या सभामंडपात चोहोबाजूंनी संतांच्या प्रतिमा बसवण्यात आल्या असून त्याखाली दैनंदिन जीवनातील उपयुक्त त्यांच्या रचना व वचने रेखाटण्यात आली आहेत. एकंदरीत ठाणे मुंबई शहरापासून जवळपास 75 ते 80 किलोमीटर अंतरावरील तिळसेश्वर हे शिवशंभो महादेवाचे ठिकाण एक दिवसाच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण असून आपणदेखील या ठिकाणी भेट देऊन निसर्गसौंदर्य व आध्यात्मिक कलाकृतींचा आस्वाद घ्याल याची खात्री आहे.”
 
“वैभव मोहन पाटील

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content