HomeArchiveनिशाचं लग्न!

निशाचं लग्न!

Details
निशाचं लग्न!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ईशाचं लग्न त्यांच्या मुंबईतील अँटालिया या टुमदार घरात शाही थाटात झालं. हे लग्न पारंपरिक पद्धतीने झाल्याने लोकांना जुन्या रितीरिवाजाची आठवण झाली. लग्नात मुलीकडचे जवळचे नातेवाईक वाढप्यांच्या भूमिकेत भोजन घेणाऱ्यांना पोटभर वाढत असतात. मात्र ईशाच्या लग्नात तिचे नातेवाईक नव्हते तर चक्क महानायक अमिताभ बच्चन, अमीर खान वाढत होते. पारंपरिक पद्धतीला बाजूला ठेवून बुफे जेवणाला त्यांनी थारा दिला नाही. त्यामुळे ईशाच्या लग्नाचं आणि अंबानी कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत होते. हा सगळा कौतुक सोहळा पाहून अण्णा, हे सुप्रसिद्ध उद्योगपती असल्याने आणि राजकारणात त्यांचा दबदबा असल्याने त्यांनी त्यांच्या निशाच्या लग्न समारंभात मंत्री, खासदार, आमदार, अभिनेते यांना आमंत्रित करून त्यांच्या हातून आलेल्यांना निमंत्रितांना जेवण वाढण्यास विनंती करायचं असं मनात ठरवून निशाचं लग्न फेब्रुवारीत करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे पत्रिका छापून घेत ते आमंत्रण करण्यास निघाले…

अण्णासाहेबांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली…
मुख्यमंत्री: या.. अण्णासाहेब काय काम काढलं? नवीन कंपनी काढता काय?
अण्णा: साहेब कंपनी काढत नाही, तुमची कंपनी पाहिजे. बघा फार उपकार होतील तुमचे…
मुख्यमंत्री: काय राव तुम्ही आमची फिरकी घेता काय? माझी कोणतीच अशीच कंपनी नाही.
अण्णा: तसं नाही हो साहेब. अहो माझी मुलगी, निशा, हिचं लग्न ठरलंय. ही पत्रिका घ्या. पण, एक अट आहे, आपण आमच्या लोकांना जेवण वाढायचं!
मुख्यमंत्री: हे काय? शहरात वेटर नाहीत का? मला बोलावता आहात? छे… छे… हे भलतेसलते काही बोलू नका.
अण्णा: मुख्यमंत्री साहेब, आता लोकसभा निवडणूक आहे. तेवढं, तो एक प्रचाराचा भाग पण होऊन जाईल. कसं?
मुख्यमंत्री: (पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांसमोर तरळू लागतो…) काय म्हणता जेवण वाढायचं? ठीक आहे, तुमच्या इच्छेखातर…
अण्णा: इच्छेखातर, आमच्या निशेसाठी…!
मुख्यमंत्र्याना पटवल्यानंतर अण्णासाहेब जातात मातोश्रीवर…
उद्धव ठाकरे: राम, राम… अण्णाजी… (आयोध्याला जाऊन आल्यानंतर ते जय महाराष्ट्र”ऐवजी राम, रामने स्वागत करतात) कसं काय येणं केलं? लोकसभेला उभे राहता काय?

अण्णा: नाही होss.. आमच्या निशाचं लग्न आहे. हे घ्या निमंत्रण!

ठाकरे: व्वाss छान…! काय घेणार? थंडा का गरम?

अण्णा: ते राहू द्या.. साहेब, आपल्याला अंबानीच्या ईशाच्या लग्नात अमिताभ, अमीर कसे वाढत होते, तसे तुम्हाला आमच्या पाहुण्यांना वाढावं लागेल. जमेल ना?ठाकरे: मला इतका वेळ नाही. सध्या आमच्याकडे भाजपा पाणी भरतोय… आम्हाला काय इज्जत आहे की नाही?

अण्णा: (अण्णा तोंडावरचा घाम पुसत) ठीक आहे. पण, लग्नाला यायला मात्र विसरू नका.मातोश्री’’वरून बाहेर पडताच शेजारी असलेल्या संविधान बंगल्यावर रामदास आठवलेंकडे अण्णा पोहोचले…
आठवले: या अण्णासाहेब, तुमची कालच आठवण कार्यकर्त्यांनी केली होती… कशावरून रे?
(आठवले शेजारी उभ्या असलेल्या पीएला विचारतात आणि पीएही ताबडतोब सांगतो- साहेब, लोकसभा निवडणूक आली आहे त्यासंदर्भात…) अण्णा, लक्षात आलं असेल… (दोघंही जोरजोराने हसतात) द्या पत्रिका…
अण्णा: पण साहेब…
आठवले: बोला की? असं, प…प… काय करता, कोंबडीवाणी!
अण्णा: एक अट आहे साहेब. आमच्या पाहुण्यांना जेवण वाढावं लागेल…
आठवले: त्यात काय हजार, दोन हजार कार्यकर्ते पाठवतो लग्नाला. तुम्हाला ते मदत करतील…
अण्णा: तसे नाही साहेब. त्या अंबानीच्या ईशाच्या लग्नात अमिताभ बच्चन कसे जेवण वाढत होते तसे तुम्हाला काही पाहुण्यांना वाढावं लागेल…
आठवले: बरं जशी तुमची इच्छा! पण, टीव्ही चॅनेल आहेत ना? तरच मी वाढणार!
(आठवलेसाहेब येणार म्हटल्यावर अण्णांच्या जीवात जीव आला आणि नंतर ते जातात पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे…)
अण्णा: साहेब, मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलोय…
पृथ्वीराज: (तोंडाचा हायवे करत…) द्या की. लवकर बोला… विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या पक्षाने सरशी केल्याने आमच्यात रस्सीखेच सुरू झालीय… द्या पत्रिका.
अण्णा: साहेब, अंबानीच्या ईशाच्या लग्नात अमिताभ पाहुण्यांना जेवण वाढतोय तसं तुम्हाला काही लोकांना वाढावं लागेल?
पृथ्वीराज: पवारसाहेब येणार आहेत का? ते येणार असतील मी वाढणार नाही.
अण्णा: का, साहेब?
पृथ्वीराज: ते मध्येच पचकतील… आणि सर्वांसमोर बोलतील ‘चव्हाणसाहेब, सावकाश हाताला लकवा होईल’! त्यांचं काय खरं नाही…
अण्णा खासदार नारायण राणे यांच्याकडे जातात…
अण्णा: नमस्कार साहेब…
राणे: (अण्णांकडे नाराज नजर टाकत…) हे पाहा.. लोकसभेची तिकीट मिळविण्यासाठी मी काय तुमच्यासाठी शब्द टाकणार नाही…
अण्णा: नाही साहेब तिकीट-बिकिट नको… निशाचं लग्न आहे, पत्रिका देण्यासाठी आलोय…
राणे: केव्हा लग्ण आहे?
अण्णा : साहेब लग्न फेब्रुवारीत आहे…
राणे: काय लोकसभेच्या निवडणूक धामधुमीत? मला काही जमणार नाही… तुम्हा लोकांना काळवेळ काही कळत की नाही हाsss…
(अण्णांना ईशाची लग्नाची तारीख निवडणुकीच्या मुहूर्तावर ठेवल्याने लग्नाला कोणीही येणार नाही याचा अंदाज आल्याने त्यांची निराशा झाली… आता तर स्वतःलाच वाढपीची भूमिका करावी लागणार हे त्यांना उमगलं आणि ते गाडीत बसले… तेवढ्यात ड्रायव्हरने मॅडमचा फोन आल्याचे अण्णांना सांगितलं आणि ते मोबाईल वर मोठ्याने बोलले… बये, आपल्या ‘अन्नाला’ कोणी जागलं नाही गं…)”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content