Details
नाणिष्ट..
01-Jul-2019
”
देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी
[email protected]
संगमनेर. माझं आजोळ.. म्हणजे माझ्या आईचं माहेर. आठवतं तेव्हापासून आम्ही सख्खी आणि इतर भावंडं दरवर्षी उन्हाळ्यात महिनाभर तरी इथं राहत असू. सकाळी प्रवरेत डुंबणं, पोहोणं, खेळणं, दुपारी दररोज आमरस पुरी/पोळी, संध्याकाळी गंगामाई घाट, भेळ! आयुष्यभर आनंद देत आलेल्या या आठवणी! असं हे मला नेहमीच प्रिय असलेलं संगमनेर. यावेळी इथं एक नवीनच ओळख झाली.
माझे मामा, प्रख्यात भांडे व्यापारी सोमनाथ गंगाधर रासने यांचा मुलगा गोरख, म्हणजे माझा मामेभाऊ. सुरेखा ही त्याची पत्नी. त्यांना अंजली, गौरव,उत्कर्ष ही अपत्यं. आपापल्या व्यवसाय, प्रपंचात ते सुखी आहेत. यातील गौरवची नवीनच ओळख मला या भेटीत झाली. ही ओळख हरखून टाकणारी, आनंद देणारी ठरली. आतापर्यंत गौरवला मी मामेभावाचा मुलगा, भांड्याचा व्यापारी इतकंच समजत होतो. यावेळच्या निवांत भेटीत कळलं, तो एक हौशी नाणे संग्राहक आहे म्हणून. सहज म्हणून मला तो एकेक नाणं दाखवू लागला, तसतसा मलाही त्यात रस निर्माण होऊ लागला. त्याच्याबरोबर मी त्याच्या इतकाच लहान झालो!
गौरवचा नाण्यांशी संबंध येत गेला तो दुकानदारी करत असतानाच. शाळेत इतिहासाच्या पुस्तकात दिसलेली ऐतिहासिक नाणी एकदा मोड म्हणून दुकानात आली. ती गौरवची पहिली जमा. नंतर नाणी येण्याची तो वाट पाहू लागला. दरम्यान, परिसरात गौरव चांगले पैसे देऊन जुनी नाणी घेतो, ही बातमी पसरत गेली तसं त्याचं काम हलकं होऊ लागलं. नंतर जुनी, दुर्मिळ नाणी कुठे विकत मिळतात हे त्याला कळत गेले. त्यामुळे त्याच्या संग्रहात खूपच भर पडू लागली. आज गौरवकडे हजारो नाणी जमलीयत. या नाण्यांमध्ये सातवाहनकालीन, सल्तनत, मुघलकालीन, शिवकालीन, इंग्रजकालीन, स्वतंत्र भारताची नाणी, विदेशी नाणी असे असंख्य प्रकार आहेत.
नाणे संग्रहामुळे आपल्याला त्यावेळची संस्कृती, इतिहास, राजकारण, प्रशासन, लोकजीवन समजून घेण्यास मोठीच मदत होते, असे गौरव म्हणतो. आपला छन्द शास्त्रोक्त पद्धतीने जोपासला जावा म्हणून गौरव “कलेकटर्स सोसायटी ऑफ नूमिसमॅटिक अँड रेअर आयटेम्स” या संस्थेचा सदस्य झालाय. “नाणिष्ठ” गौरवच्या या छन्दात त्याच्या कुटुंबियांचं सहकार्य लाभलंय, याचा गौरव कृतज्ञेतेने उल्लेख करतो. आपला व्यवसाय, प्रपंच पाहत गौरव त्याचा छन्द जोपासतोय. गौरवची नाणी पाहत, त्यांचं वैशिष्ट्य, महत्त्व समजून घेत संध्याकाळ कधी झाली, हे कळलंच नाही. आता वेळ झाली होती, गंगामाई घाटावर जायची. त्याचा निरोप घेऊन मी प्रवरेकडे चालता झालो.
”
“देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी